________________
पाप-पुण्य
आधारावर आहे. समोरच्या व्यक्तीचा किंचितमात्र दोष नाही. तो निमित्त मात्र आहे. असे आपले ज्ञान सांगते, किती सुंदर गोष्ट आहे !
__ अज्ञानीला तर एखाद्याने गोड गोड बोलले तर तिथे राग येते व कडू बोलले तर द्वेष होतो. समोरची व्यक्ती गोड बोलते ते स्वत:चे पुण्य प्रकाशित होत आहे आणि समोरची व्यक्ती कडू बोलते, ते स्वतःचे पाप प्रकाशित होत आहे. म्हणून मूळ गोष्ट म्हणजे, दोन्ही ठिकाणी समोरच्या व्यक्तीला काही घेणे देणे नाही. बोलणाऱ्याला काही घेणे देणे नाही. समोरची व्यक्ती तर निमित्तच बनते. जो यशाचा निमित्त असतो त्याच्याकडून यश मिळत राहते आणि जो अपयशाचा निमित्त असेल त्याच्याकडून अपयश मिळत राहते. तो फक्त निमित्तच आहे. त्यात कुणाचा दोष नाही.
प्रश्नकर्ता : सर्व निमित्तच म्हटले जातील ना?
दादाश्री : निमित्ताशिवाय या जगात दुसरी कोणतीही गोष्ट नाहीच. जे आहे ते हे निमित्तच आहे.
त्याचा आधार आहे पुण्य आणि पापावर! प्रश्नकर्ता : कित्येक जण खोटे बोलले तरी ते सत्यात खपून जाते आणि कित्येक खरे बोलले तरीही खोट्यात खपते. हे काय पझल (कोडे) आहे?
दादाश्री : हे त्याच्या पाप आणि पुण्याच्या आधारावर घडते. त्याच्या पापाचा उदय असेल तर तो खरे बोलला तरीही त्याचे खोटे ठरवले जाते. जेव्हा पुण्याचा उदय असेल तेव्हा तो खोटे बोलला तरीही लोक त्याचे खरे ठरवतात, वाटेल तसे खोटे केले तरीही चालून जाते.
प्रश्नकर्ता : तर त्यात त्याचे काही नुकसान होत नाही का?
दादाश्री : नुकसान तर आहे, पण पुढील जन्माचे. या जन्मात तर त्याला मागील जन्माचे फळ मिळाले. आणि हे खोटे बोलले ना, त्याचे फळ त्याला पुढील जन्मात मिळेल. आता त्याने हे बीज पेरले. बाकी, ही काही अंधेर नगरी नाही की वाटेल तसे चालेल!