________________
पाप-पुण्य
२५
प्रश्नकर्ता : आतापर्यंत पाप केले नाही. पुण्यच केले आहे.
दादाश्री : हे तर असे वाटते. पापही केले आहे पण पाप कमी केले असेल, पुण्य अधिक केले असेल. म्हणून तर या सत्संगात यायला टाइम मिळाला, येथे येऊ शकलात, नाहीतर सत्संगात यायला टाइम कोणाला असतो?
पुण्य-पापाच्या परिणामाने...
प्रश्नकर्ता : पाप आणि पुण्याशी त्याचा संबंध कशाप्रकारे असतो ?
दादाश्री : हे पाप आहे ते, आता तुम्ही इथे आलात, तर तुम्ही कुणालाही ठोकर लागणार नाही अशा प्रकारे सांभाळून चालता, आणि ठोकर लागेल अशी जागा असेल, खूप गर्दी असेल, पण मनात असे विचार असतील की, कुणालाही माझ्याकडून लागले नाही तर बरे, अशा भावनेने तुम्ही इथे आलात, तर तुमच्याकडून पुण्य बांधले जाईल.
आणि गर्दी आहे म्हणून ठोकर लागूही शकते, अश्या भावनेने आलात, तर पाप बांधले जाईल.
कुणालाही आपल्याकडून किंचितमात्र दुःख झाले, तर त्यामुळे पापच बांधले जाते. आणि कुणाला सुख दिले, शांती दिली, कुणाच्या हृदयाला गारवा पोहोचवला, तर त्यामुळे फक्त पुण्य बांधले जाते.
आता हे मागील जन्मी बांधलेले पाप, ते ह्या जन्मी पुन्हा उदयास येतात. जी योजना मागील जन्मात झाली होती, ती (योजना) ह्या जन्मात फलीभूत होते.
जेव्हा पापाचा उदय येतो तेव्हा पूर्ण दिवस खराब विचार, चिंतेचे विचार येत राहतात, बाहेरही नुकसान होते, मुले आपल्या विरुद्ध होतात. भागीदाऱ्यासोबत भांडणे होतात, जेव्हा पापाचा उदय असतो तेव्हा. आणि जेव्हा पुण्याचा उदय होतो तेव्हा शत्रू असेल ना, तोही येऊन सांगेल, 'अरे चंदुभाऊ, काही काम असेल तर मला सांगा...' अरे, तू शत्रू, पण तेव्हा तर तुमच्या पुण्याचा उदय आला होता. अर्थात पुण्याच्या उदयावेळी शत्रू मित्र