________________
२४
पाप-पुण्य
लगेच सर्व तयार होते तो महापुण्य शाली. संकल्प करतो तीच मेहनत, बस. संकल्प करावा लागतो. संकल्पाशिवाय होत नाही. थोडी तरी मेहनत पाहिजे.
प्रश्नकर्ता : परंतु मनुष्यामध्ये असे होऊ शकत नाही.
दादाश्री : मनुष्यातही असते. का नाही होणार? मनुष्यात तर पाहिजे तितके होईल?
प्रश्नकर्ता : हे तर असे म्हटले जाते की देवलोकात असे होते.
दादाश्री : देवलोकात सारे सिद्ध होते. पण इथेही कुणा-कुणाला संकल्पसिद्धी होत असते. सर्वकाही होते. आपले पुण्य पाहिजे, पुण्य राहिले नाही, पुण्य कमी झाले आहे.
जितकी मेहनत तितके अंतराय, कारण की मेहनत का करावी लागत आहे?
अर्थात या जगात सर्वात अधिक पुण्यशाली कोण? ज्याला सहजच विचार येतो, तो निश्चित करतो आणि कितीतरी वर्षांनुवर्षांपर्यंत इच्छेशिवाय, मेहनतीशिवाय मिळतच राहील तो. दुसऱ्या नंबरवर, इच्छा असेल आणि तो पुन्हा पुन्हा निश्चित करेल आणि संध्याकाळी सहज मिळेल तो. तिसऱ्या नंबरवाल्याला इच्छा होते आणि प्रयत्न करतो आणि प्राप्त होते. चौथ्या नंबरवाल्यांना इच्छा होते आणि भयंकर प्रयत्न केल्यानंतर प्राप्त होते. पाचव्याला इच्छा होते आणि भयंकर प्रयत्न करून सुध्दा प्राप्त होत नाही. या मजूरांना कठीण मेहनत करावी लागते आणि वरून शिव्याही खाव्या लागतात तरीही पैसे मिळत नाहीत. मिळाले तरी सांगता येत नाही की घरी जाऊन खायला मिळणार की नाही. ते सर्वात अधिक प्रयत्न करतात, तरीही प्राप्ती होत नाही.
पुण्यानेच प्राप्त सत्संग! तुम्ही पुण्य केले आहे की नाही? म्हणून तर सी. ए. झालात.