Book Title: Paap Punya
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 44
________________ पाप-पुण्य नाही. त्याचे कारण त्याच्या बुद्धीचा आशय. बुद्धीच्या आशयात ज्याने जसे भरून आणले असेल तसेच त्याला मिळते. बुद्धीच्या आशयात जे भरलेले असेल त्याचे दोन फोटो पडतात (1) पाप फळ आणि (2) पुण्यफळ. बुद्धीच्या आशयाचे प्रत्येकाने विभाजन केले आहे. त्या शंभर टक्यांमधून जास्त टक्के बंगला-गाडी-, मुलं-मुली आणि पत्नी या सर्वांसाठी भरलेले आहे. ते सर्व मिळवण्यासाठी पुण्य खर्च झाले आणि धर्मासाठी फक्त एकदोन टक्केच बुद्धीच्या आशयात भरले आहेत. प्रश्नकर्ता : बुद्धीचा आशय जरा सविस्तर समजवून सांगा ना, दादा. दादाश्री : बुद्धीचा आशय म्हणजे आपल्याला तर बस चोरी करूनच चालवायचे आहे. काळा बाजार करूनच चालवायचे आहे.' तर कोणी असे म्हणेल, 'आम्हाला कधीच चोरी करायची नाही.' तर कोणी असेही म्हणेल, 'की मला असे भोगून घ्यायचे आहे,' आणि ते भोगण्यासाठी एकांताची जागा सुद्धा तयार करून देतो. त्यात पुन्हा पाप-पुण्य काम करते. जे काही भोगण्याची इच्छा केली असेल ते सर्व त्याला प्राप्त होते. ध्यानी मनी नसणारे असे सुद्धा त्याला मिळते. कारण की त्याच्या बुद्धीच्या आशयामध्ये होते आणि जर पुण्याने साथ दिली तर त्याला कोणी पकडूही शकणार नाही, वाटेल तेवढा पहारा लावला असेल तरीही! आणि जेव्हा पुण्य संपते तेव्हा सहजच पकडला जातो. लहान मुलगाही त्याला शोधून काढेल की, 'ऐसा घोटाला है इधर!' दोन चोर चोरी करतात, त्यातील एक पकडला जातो आणि दुसरा मुक्तपणे सुटतो, ते काय सूचित करते? बुद्धीच्या आशयात चोरी करायची आहे, असे तर दोन्ही चोर घेऊन आले होते पण यात जो पकडला गेला त्याचे पापफळ उदयात आले आणि ते वापरले गेले. जेव्हा दुसरा जो सूटला त्याचे पुण्य त्यात वापरले गेले. अशाचप्रकारे प्रत्येकाच्या बुद्धीच्या आशयामध्ये जे असते, त्यात पाप आणि पुण्य कार्य करते. बुद्धीच्या आशयात लक्ष्मी प्राप्त करायची आहे असे भरून आणले असेल, तेव्हा त्याचे पुण्य वापरले जाईल तर पैशांचे ढीग लागतील. दुसरा बुद्धीच्या आशयात लक्ष्मी प्राप्त करायची आहे, असे घेऊन तर आला पण त्यात पुण्य कामी येण्या ऐवजी पापफळ समोर आले. तर लक्ष्मी तोंडच दाखवत नाही. अरे, हा तर अतिशय

Loading...

Page Navigation
1 ... 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90