________________
पाप-पुण्य
नाही, नाहीतर उपाधी होते. कुणाला द्यावी? आता कुठे ठेवावी? अशी सर्व उपाधी होते!
अर्थात खूप पुण्यही कामाचे नाही. पुण्याई पण संतुलित असेल तरच चांगली. खूप पुण्याई असेल तर शरीर एवढे मोठे होते. त्याचे काय करायचे? किती किलोचे शरीर? आपल्याला उचलायचे आणि पलंगालाही उचलायचे ना? पलंगही चू चू आवाज करत राहतो.
प्रश्नकर्ता : पाप आणि पुण्याचा उदय होतो, त्याचा जीवनातील घटनांवर जो काही परिणाम होतो, त्याचे उदाहरण देऊन समजवा ना.
दादाश्री : पापाचा उदय होतो तेव्हा प्रथम तर नोकरी जाते. नंतर काय होते? पत्नी आणि मुलगा त्या स्टोरमध्ये जाण्यासाठी पैसे मागतील, तशी त्यांना पूर्वीची सवय पडलेली आहे, त्याप्रमाणे ते म्हणतील दोनशे डॉलर द्या तेव्हा मग कटकट होते. एकतर इथे नोकरी नाही आणि बिनकामाची आरडा-ओरड करत राहते, दोनशे दोनशे डॉलर खर्च करायचे आहेत? हे असे सर्व चालू होते. तेही रोजचीच कटकट, मग बायको म्हणेल, बँकेतून काढून का देत नाही. तेव्हा बँकेत थोडे तरी राहू द्यावे लागेल की नाही? इथे याचे भाडे भरावे लागेल. हे सर्व करावे लागणार की नाही? बँकेत पैसे नाही भरावे लागणार? पण पत्नी कटकट करते अगदी डोके फुटून जाईल अशी कटकट करते. ही सर्व लक्षणं तर रात्री झोपूही देत नाहीत. इथे अमेरिकेत कित्येकांना असे अनुभव होत असतील आणि ते सांगतातही की पत्नी कर्कशी आहे. भांडखोर आणि कर्कशी आहे, असे शब्द बोलतात. अरे जेवढे कडक शब्द बोलता येतील तेवढे बोलतात. सोडत नाही ना? त्याला सतत हैराण करत असते, एकतर यावेळी बिचाऱ्याची नोकरी सुटलेली असते, काही ठाव ठिकाणा नसतो, डोकं उलटेच चालत असते, आणि त्यात पुन्हा ही त्रास देते. असे घडते की नाही घडत?
प्रश्नकर्ता : घडते, घडते. दादाश्री : एखाद्या ठिकाणी घडत असेल की खूप ठिकाणी? नोकरी