________________
पाप-पुण्य
बनतात. आणि पापाचा उदय असेल, तेव्हा मुले शत्रू बनतात. एखादा मुलगा त्याच्या बापावर दावा (खटला) दाखल करू शकतो का?
प्रश्नकर्ता : करतोच आहे.
दादाश्री : अरे, एका मुलाने त्याच्या बापावर दावा केला होता, नंतर त्याने काय केले? तर, दावा मांडल्यानंतर त्याने वकिलास सांगितले की, वडील केस हारले तर त्यात काही हरकत नाही, ते तर आता चांगले झाले. ही घ्या, तुमची तीनशे रुपये फी. पण अजून-एकदा खटला चालवा. त्यावर वकील म्हणतो, 'का आता कशासाठी? त्यावर तो म्हणाला, 'नाक कापायचे आहे. अरे मुर्खा, बापाचे नाक कापायचे आहे? तेव्हा तो म्हणतो, 'हो, त्यासाठी मी दीडशे रुपये देईन.' तर तिथे त्याने फजिती करून, नाक कापून दाखवले. अर्थात जेव्हा आपली चुक असते व पापकर्माचा उदय असतो तेव्हा मुलगाही शत्रू बनतो.
परम मित्र कोण? पुण्य चांगले असेल तर सर्वच चांगले. म्हणजे पुण्यरूपी मित्र असेल तर जिथे जाल तिथे सुख, सुख आणि सुख. हा मित्र असायला हवा. पापरूपी मित्र आला तर फटके दिल्याशिवाय रहात नाही. मग समभावे निकाल होत नाही तेव्हा ओरडावे लागते.
प्रश्नकर्ता : हे जे तुम्ही सांगितले की पुण्य कुठेही मित्राप्रमाणे काम करते...
दादाश्री : हो अगदी खराब जागेत, तुम्ही कुठल्याही जागेत फसलेले असाल, तिथे पुण्य मदतीला धावून येते.
प्रश्नकर्ता : पाप घरातही दुःख देते.
दादाश्री : पाप तर घरात तुम्ही अंथरुणावर असाल तरी मारून टाकते. अंथरुणावर सुद्धा चिंता करावयास लावते, फर्स्ट क्लास अंथरुण अंथरलेले असेल तरीही चिंता करावयास लावते. पाप सोडत नाही ना! म्हणूनच संतानी म्हटले आहे की पाप करताना घाबरा.