________________
पाप-पुण्य
ते अक्कलेचे की मेहनतीचे उपार्जन? गोष्ट तर समजून घ्यावी लागेल ना? अशी पोलंपोल कुठपर्यंत चालेल? आणि उपाधी तर आवडत नाही. हा मनुष्य देह उपाधीपासून मुक्त होण्यासाठी आहे. फक्त पैसे कमवण्यासाठी नाही. पैसे कशाने कमवतात? मेहनतीने कमवतात की बुद्धीने?
प्रश्नकर्ता : दोन्ही गोष्टींनी.
दादाश्री : जर पैसे मेहनतीने कमवता आले असते तर या मजूरांजवळ खूप पैसे असते. कारण की हे मजूर अधिक मेहनत करतात ना! आणि जर पैसे बुद्धीने कमावता आले असते तर हे सारे पंडित आहेतच ना. पण त्यांची चप्पल अर्धी घासलेली असते. पैसे कमवणे हा बुद्धीचा खेळ नाही व मेहनतीचे फळ सुद्धा नाही. ते तर तुम्ही पूर्वी जे पुण्य केलेले आहे, त्याचे फळस्वरूप तुम्हाला मिळते. आणि नुकसान, ते पाप केले आहे, त्याचे फळस्वरूप आहे. पुण्य आणि पापाच्या आधीन लक्ष्मी आहे. म्हणून जर लक्ष्मी पाहिजे असेल तर आपल्याला पुण्यपापाकडे लक्ष ठेवायला हवे.
__ भुलेश्वरमध्ये ज्यांची अर्धी चप्पल घासलेली आहे, अशी खूप अक्कलवाली लोकं आहेत. काही व्यक्ती महिन्याचे पाचशे कमवतात, तर कोणी सातशे कमवतात, कोणी अकराशे कमवतात. अरे, ओरडून सांगतो की मी अकराशे कमवतो. अरे, पण तुझी चप्पल अर्धीच्या अर्धीच आहे. बघा, अक्कलेचे कारखाने! आणि कमी अक्कलवाले खूप कमवतात. अक्कलवाल्याचे टाकलेले पासे सरळ पडतात की मूर्ख मनुष्याचे सरळ पडतात?
प्रश्नकर्ता : ज्याचे पुण्य असेल त्याचे सरळ पडतात?
दादाश्री : बस, त्यात तर अक्कल चालतच नाहीना! उलट अक्कलवाल्यांचे तर विपरीत असते. अक्कल तर त्याला दु:खात हेल्प करते, दुःखात सर्वकाही पुन्हा नीट कसे करायचे, अशी त्याला हेल्प करते.