________________
पाप-पुण्य
१७
आमच्या येथे बघितले जाते. रुपये नसतील तरीही शाता भोगेल आणि रुपये असतील तरीही अशाता भोगेल. अर्थात शाता किंवा अशाता वेदनीय भोगतो, ते पैशांवर आधारीत नाही.
खरं धन सुख देते! दहा लाख रुपये वडिलांनी मुलाला दिले असतील आणि वडील म्हणतील की, 'आता मी आध्यात्मिक जीवन जगेल.' तेव्हा तो मुलगा नेहमी दारूत, मांसाहारात, शेअर बाजारात, सगळ्यात तो पैसे गमवून बसतो. कारण की जे पैसे चुकीच्या मार्गाने जमा होतात, ते स्वत: जवळ रहात नाहीत. आज तर खरे धन, खऱ्या मेहनतीचे धन सुद्धा रहात नाही, तर चुकीचे धन कसे राहील? म्हणून पुण्याचे धन असायला पाहिजे, ज्यात अप्रामाणिकता नसेल. दानत चांगली स्वच्छ असेल. तसा पैसा असेल, तर ते सुख देईल. नाही तर आता दुषमकाळाचे धनही पुण्याचेच म्हटले जाते, पण पापानुबंधी पुण्याचे आहे, ते नुसते पापच बांधून घेते. त्यापेक्षा लक्ष्मीजीला म्हणा, की 'तु येऊच नकोस. इतक्या अंतरावरच रहा. त्यात आमची शोभा चांगली आहे आणि तुझीही शोभा वाढेल.' हे बंगले बांधतात, ते सगळे पापानुबंधी पुण्य उघडपणे दिसून येते. त्यात इथे कोणी असेल, हजारात एखादी व्यक्ती अशी असेल की त्याचे पुण्यानुबंधी पुण्य असेल. बाकी, हे सगळे पापानुबंधी पुण्य आहे. इतकी लक्ष्मी असू शकते का कधी काळी? नुसते पापच बांधतात, हे तर तिर्यंचगतीचे रिटर्न तिकीट घेऊन आले आहेत.
एक मिनिटही रहाता येणार नाही असा हा संसार, जबरदस्त पुण्य असेल तरीही आतील अंतरदाह कमी होत नाही. अंतरदाह निरंतर जळतच राहतो. अंतरदाह कशामुळे होतो? अंतरदाह पाप-पुण्याच्या आधीन नाही. अंतरदाह, 'राँग बिलिफ'च्या आधीन आहे. चारही बाजूंनी सगळे फर्स्ट क्लास संयोग असतील, तरीही अंतरदाह राहतोच. तो आता कसा मिटेल? पुण्यही शेवटी संपून जाईल. जगाचा नियम आहे की पुण्य संपते. तेव्हा मग काय होईल? पापाचा उदय होतो. हा तर अंतरदाह आहे, आणि पापाचा उदय होतेवेळी बाहेरचा दाह उत्पन्न होईल. तेव्हा तुझी काय दशा होणार? म्हणून सचेत होऊन जा, असे भगवंत सांगतात.