________________
पाप-पुण्य
प्रश्नकर्ता : दादा, दुसरे वाचणाऱ्यांना मोक्षाच्या अन्य गोष्टी समजत नाहीत, पण या दुःखाच्या गोष्टी बाबत तर बरेच काही समजते.
दादाश्री : हे तर समजेलच, सगळ्यांना समजेल, ही दिव्यासारखी गोष्ट आहे ! अरे मोक्षाच्या गोष्टीला दूर ठेवा, पण दु:खाचे निवारण तर झाले आज! संसारी दु:खाचा अभाव तर झाला! आणि हीच मुक्तीची पहिली निशाणी आहे. दु:ख मुक्त झाले, संसारातील दु:खांपासून.
ओव्हर ड्राफ्ट वापरला अॅडव्हान्समध्ये! चार घरांचा मालक, परंतु घरात पाच रुपये नसतात आणि भावनगरच्या राजासारखा रुबाब असतो! तेव्हा ह्या अहंकाराचे काय करायचे?
प्रश्नकर्ता : दादा, पण व्यवहारात कित्येक वेळा असे घडते की मनुष्य असे सर्व ठेवतो ना, त्याला असे सर्व येऊन मिळते?
दादाश्री : मिळते, पण सर्व पाप बांधून मिळते, त्याचा नियमच असा आहे. तुझे सर्व काही खर्च करून तुझे काउंटर वेट ठेवून तु घेतो आणि आज नसेल तर तो ओव्हरड्राफ्ट घेतो. तो ओव्हरड्राफ्ट घेऊन परत मनुष्यातून जनावरात जातो. उलटसुलट करून मिळवलेले कामाचे नाही, ते तर आपल्या पुण्याने सहज मिळालेले पाहिजे.
__ अर्थात मिळते, पण सगळे ओव्हरड्राफ्ट घेतात. मनातून चोरीचे विचार जात नाहीत, खोटेपणाचे विचार, कपटचे विचार जात नाहीत, कावेबाजीचे विचार जात नाहीत. मग काय, नुसते पापच बांधत राहतात ना? हे सर्व तर व्हायलाच नको, जरी मिळाले तरी पण! म्हणून मी तर संन्यास घ्यायला तयार होतो की अशाप्रकारे दोष जर बांधले जात असतील तर संन्यास घेणे चांगले. नुसत्या भयंकर उपाधी, इतक्या तापात उकळून निघालो. अज्ञानदशेत तर खूप समजदार माणूस, एका तासातच उकळून निघतो, त्या तापाने त्याच्या मनात असे येते की अरे, आता काहीच नको. जाड बुद्धीवाल्यांना ताप कमी जाणवतो, पण सूक्ष्म बुद्धीवाल्यांना ताप सहनच कसा होईल? हे तर आश्चर्य आहे!