________________
पाप-पुण्य
आजपासून साठ वर्षांपूर्वी जे रूप होते, तसे रूपच नाही आता. मुंबई शांतीचे ठिकाण होते.
आता ते रूपच नाही. साठ वर्षांपूर्वी मरीन लाइन्सवर रहात असाल तर देवगतीसारखे वाटायचे. आता तर गांगरून गेलेले दिसतात तिथे ! पूर्ण दिवस वैतागलेले आणि गोंधळलेले असे तसे लोक दिसतात. त्या दिवसांत सकाळी उठून पेपर वाचायचे, तेव्हा असे वाटायचे जसे सारे देवी-देवता पेपर वाचत आहेत. कढापा नाही, अजंपा नाही. पूर्वी सकाळी 'मुंबई समाचार' पेपर येत असे. अन्य पेपर पण होते पण त्यांची नावं तर आता लुप्त झाली आहेत. मी ही मरीन लाइन्सवर उतरत असायचो. परंतु लोकांना त्या वेळी खूप शांती असायची ! इतकी हाय-हाय नव्हती. इतका लोभ नाही, इतका मोह नाही, इतकी तृष्णा नाही आणि शुद्ध तुपाची तर शंकाच करावी लागत नव्हती. आता तर शुद्ध तुप घ्यायला गेलो तरी मिळत नाही.
मलबार हिल एवढे पुण्य असेल, पण बर्फाचे डोंगर आहे हे पुण्य. मलबार हिल एवढा मोठा बर्फ असेल, परंतु दिवसेंदिवस काय होत जाईल? चोवीस तास निरंतर वितळतच जाईल. पण त्यांना स्वतःलाच माहित नाही, या मलबार हिल किंवा अशा सर्व ठिकाणी राहणाऱ्या लोकांना, टॉप क्लासच्या लोकांना माहित नाही की आपले काय होऊन राहिले आहे ? रात्रंदिवस पुण्य वितळत चालले आहे, ही तर करुणा राखण्यासारखी दशा आहे ! येथून काय खाता- खाता, काय खावे लागेल, हे माहित नाही म्हणून हे सर्व चालले आहे. पापानुबंधी पुण्य आहे. दिवसभर हाय पैसा, हाय पैसा! कुठून पैसे जमा करू, पूर्ण दिवस त्याच विचारात, कुठून विषयविकाराचे सुख भोगू, काही असे करू, तसे करू, पैसा ! हाय, हाय, हाय, हाय. आणि बघा मोठमोठे पुण्याचे डोंगर वितळत चालले आहेत. ते पुण्य संपणार आहे. परत होते तसेच, दोन्ही हात रिकामेच, मग चार पायांमध्ये जाऊनही ठिकाणा लागणार नाही. म्हणून ज्ञानींना करुणा येते की अरेरेरे! या दुःखातून सुटले तर बरे ! काही चांगले संयोग मिळाले तर बरे. बघा ना, यांना चांगला संयोग मिळाला. आणि हे शेठ कधी तिथून सुटतील आणि कधी इथे येतील, अशी आमची तर नक्कीच इच्छा आहे पण मेळ काही बसत नाही ना आणि ज्यांचा मेळ बसतो ते तर येतात सुद्धा.