Book Title: Paap Punya
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 10
________________ आणि दुसऱ्यांना दु:ख दिल्याने पाप बांधले जाते.' आता इतकीच जागृती जर पूर्ण दिवस ठेवली तर त्यातच संपूर्ण धर्म सामावला आणि अधर्म सूटला. आणि चुकूनही कोणाला दुःख दिले गेले तर त्याचे लगेचच प्रतिक्रमण करून घ्या. प्रतिक्रमण म्हणजे ज्या व्यक्तीला वाणीने, वर्तनाने अथवा मनानेही दु:ख दिले असेल तर लगेचच त्या व्यक्तीच्या आतील विराजमान आत्मा, शुद्धात्म्याजवळ माफी मागावी, हृदयापासून पश्चाताप व्हायला हवा आणि परत असे करणार नाही, असा दृढ निश्चय करायला पाहिजे. इतकेच, बस. आणि तेही मनातच, परंतु मनापासून करा, तरच त्याचे एक्ॉट (यथार्थ) फळ मिळेल. ___ परम पूज्य दादाश्री म्हणतात, 'जीवन पुण्य आणि पापाच्या उदयानुसार चालते, दुसरा कोणी चालवणारा नाही. तेव्हा मग, कुठे कोणाला दोष किंवा शाबासकी द्यायची राहिली? म्हणून पापाचा उदय असेल तेव्हा अधिक प्रयत्न न करता शांत बसून रहा आणि आत्म्याचे कर. पुण्य जेव्हा फळ देण्यासाठी समोर येत असेल तर शेकडो प्रयत्न कशासाठी? आणि पुण्य जेव्हा फळ देण्यासाठी सन्मुख नसेल तर शेकडो प्रयत्न कशासाठी? म्हणून तु धर्म कर. पुण्य-पापासंबंधी सामान्य प्रश्नांपासून ते सुक्ष्मातीसूक्ष्म प्रश्नांचीही तितकीच सरळ, संक्षिप्त आणि पूर्ण समाधानकारक उत्तरे येथे मिळतात, परम पूज्य दादाश्रींच्या आपल्या देशी शैलीमध्ये! मोक्षप्राप्तीसाठी पुण्याची आवश्यकता आहे का? जर आवश्यकता असेल तर कोणते आणि कसे पुण्य पाहिजे? पुण्य तर पाहिजेच परंतु पुण्यानुबंधी पुण्य पाहिजे. इतकेच नाही, तर मोक्षाच्या हेतूसहित पुण्य बांधलेले पाहिजे. ज्यामुळे त्या पुण्याच्या फळस्वरूप मोक्ष प्राप्तीची सर्व साधने आणि अंतिम साधन अर्थात आत्मज्ञानी भेटतील. उपरांत पुण्यानुबंधी पुण्य मोक्षाच्या हेतूसाठी असेल तर त्याचबरोबर (1) क्रोध-मान-माया-लोभ कमी झालेले पाहिजे, अर्थात कषाय मंद झालेले पाहिजे. (2) स्वत:जवळ जे आहे ते दुसऱ्यांसाठी लूटवून टाकायचे आणि

Loading...

Page Navigation
1 ... 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90