________________
पाप-पुण्य
असेल तर दुसऱ्या जीवांना सुख द्या आणि दु:ख पाहिजे असेल तर दुःख दया. जे अनुकूल वाटेल ते करा, ह्याचे नाव पुण्य आणि पाप. सुख पाहिजे तर सुख द्या, त्याने क्रेडीट जमा होईल आणि दुःख पाहिजे तर दुःख द्या, त्याने डेबिट जमा होईल. त्याचे फळ तुम्हाला चाखावे लागेल.
चांगले वाईट, पाप-पुण्याच्या आधारावर! कधी-कधी चांगले संयोग येतात का? प्रश्नकर्ता : चांगले पण येतात.
दादाश्री : या चांगल्या आणि वाईट संयोगांना कोण पाठवत असेल? आपल्याच पुण्य आणि पापाच्या आधारावर संयोग येऊन मिळतात. असे आहे की, या जगाला चालवणारा कोणी नाही. जर कोणी चालवणारा असता तर पाप-पुण्याची गरजच नव्हती.
प्रश्नकर्ता : या जगाला चालवणारा कोण आहे?
दादाश्री : पुण्य आणि पापाचे परिणाम. पुण्य आणि पापाच्या परिणामाने हे जग चालत आहे. कोणी भगवंत चालवत नाही. कोणी यात हस्तक्षेप करत नाही.
पुण्य प्राप्तीच्या पायऱ्या! प्रश्नकर्ता : आता पुण्य अनेक प्रकारची आहेत, तर कोण-कोणत्या प्रकारचे कार्य केले तर पुण्य म्हटले जाईल आणि पाप म्हटले जाईल?
दादाश्री : जीवमात्राला सुख देणे, त्यात फर्स्ट प्रेफरन्स (प्रथम महत्व) मनुष्य. मनुष्याचे झाले की दुसरा प्रेफरन्स पंचेद्रिय जीव. तिसऱ्या प्रेफरन्समध्ये चार इंद्रिय, तीन इंद्रिय, दोन इंद्रिय, एक इंद्रिय अशा प्रकारे त्यांना सुख देणे, ह्या मुळेच पुण्य बांधले जाते आणि त्यांना दु:ख दिल्याने पाप बांधले जाते.
प्रश्नकर्ता : भौतिक सुखं मिळतात, त्यांनी कशा प्रकारे कर्म केले असतील तेव्हा ते मिळतात?