________________
पाप-पुण्य
करणार? क्रेडीट असेल तर एका बाजूने शांती राहील, तर आम्ही धर्म करू शकतो.
४
प्रश्नकर्ता : कोणते कर्म केल्याने पुण्य होते आणि कोणते कर्म केल्याने धर्म होतो?
दादाश्री : हे सगळे जीव, मनुष्य, झाडे-वेली, गायी-म्हशी, नंतर पशु-पक्षी, जलचर हे सर्व जीव सुख शोधत असतात. आणि दुःख कोणालाही आवडत नाही. म्हणून तुमच्या जवळ जे सुख आहे, ते तुम्ही इतर लोकांना दिले तर तुमच्या खात्यात क्रेडीट जमा होते, आणि पुण्य बांधले जाते आणि दुसऱ्यांना दुःख दिले तर पाप बांधले जाते.
प्रश्नकर्ता : मग धर्म कशाला म्हणतात ?
दादाश्री : धर्म म्हणजे आत्मधर्म. आत्म्याचा स्वत:चा धर्म. पाप आणि पुण्य दोन्ही अहंकाराचे धर्म आहेत. अहंकार असेल तोपर्यंत पाप आणि पुण्य होतात. अहंकार गेला की पाप आणि पुण्य जातात, तेव्हा आत्मधर्म होतो. आत्म्याला जाणावे लागेल, तेव्हाच आत्मधर्म होईल.
पुण्य-पापाहून, पर रिअल धर्म
रिलेटिव धर्म काय म्हणतात ? चांगले करा आणि वाईट करू नका. चांगले केल्यामुळे पुण्य बांधले जाते आणि वाईट केल्यामुळे पाप बांधले जाते.
संपूर्ण जीवनाचे वहीखाते फक्त पुण्याने भरता येत नाही. कोणाला शिवी दिली तर पाच रुपये उधारी आणि धर्म केला तर शंभर रुपये जमा होतात. पाप-पुण्याची वजा - बेरीज होत नाही. जर असे असते तर या करोडपतींनी पाप जमा होऊच दिले नसते. पैसा खर्च करून उधारी उडवून टाकली असती. परंतु हा तर खरा न्याय आहे. याच्यात तर ज्यावेळी ज्याचा उदय होतो, तेव्हा ते सहन करावेच लागते. पुण्याने सुख मिळते आणि पापाच्या फळाचा उदय आला तर कडू लागते, फळे तर दोन्हीही चाखावीच
लागतात.