Book Title: Paap Punya
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 17
________________ पाप-पुण्य म्हणतात, त्यात सर्व संयोग चांगले मिळाले तर मदतच करत राहतात. बंगला बांधायचा असेल तर बंगला बांधतात, मोटार मिळते! आणि पाप खराब संयोग घेऊन आले तर बंगल्याचा लिलाव करवतात. अर्थात आपल्याच कर्माचे फळ आहे. त्यात भगवंताची कोणतीच दखल नाही! यू आर हॉल ॲन्ड सॉल रिस्पॉन्सिबल फॉर योर लाइफ! एक लाइफ नाही, तर कितीतरी लाइफ साठी भगवंताची दखल नाही यात. विनाकारण लोक भगवंताच्या मागे लागतात. प्रकार, पुण्य-पापाचे जगामध्ये आत्मा आणि परमाणु हे दोनच आहेत. कोणाला शांती दिली असेल, सुख दिले असेल तर पुण्याचे परमाणु एकत्र होतात आणि कोणाला दुःख दिले असेल तर पापाचे परमाणु एकत्र होतात. मग तेच चावतात (त्रास देतात). इच्छेनुसार होते, ते पुण्य आणि इच्छे विरुद्ध होते ते पाप. पाप दोन प्रकारचे आहेत. एक पापानुबंधी पाप, दुसरे पुण्यानुबंधी पाप आणि पुण्य दोन प्रकारची आहेत, एक पापानुबंधी पुण्य, दुसरे पुण्यानुबंधी पुण्य. पापानुबंधी पाप पापानुबंधी पाप म्हणजे आता पाप भोगत आहे आणि परत पापाचे नवीन अनुबंध बांधत आहे. कोणाला दुःख देतो आणि परत खूश होतो. पुण्यानुबंधी पाप पुण्यानुबंधी पाप अर्थात पूर्वी झालेल्या पापामुळे आता दुःख (पाप) भोगत आहे परंतु नीतीने आणि चांगल्या संस्कारांमुळे अनुबंध पुण्याचे बांधतो. प्रश्नकर्ता : तर दुःख उपकारी आहे ना? दादाश्री : नाही, ज्याला 'मी शुद्धात्मा आहे' असे भान झालेले आहे त्याच्यासाठी दुःख उपकारी आहे, नाहीतर दुःखातून दुःखच जन्माला येते. दुःखात भाव तर दुःखाचेच येतात. या काळात पुण्यानुबंधी पापवाले जीव

Loading...

Page Navigation
1 ... 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90