Book Title: Karmache Vignan
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 10
________________ मित्र शेठला विचारतो की, 'अरे, ह्या लोकांना तु का दिलेस? हे सर्व चोर आहेत, तुझे पैसे खाऊन टाकतील.' त्यावर शेठ म्हणतो, 'या सर्वांनाच, एकेकाला मी चांगल्या प्रकारे ओळखून आहे. पण काय करु? त्या संस्थेचे चेअरमन माझे व्याही आहेत म्हणून त्यांच्या दबावामुळे द्यावे लागले, नाहीतर मी पाच रुपये पण देईल असा नाही. आता पाच लाख रुपये दान केले म्हणून बाहेर लोकांना शेठजींसाठी धन्यधन्य वाटले, पण ते शेठजींचे डिस्चार्ज कर्म होते आणि चार्ज काय केले शेठजींनी? पाच रुपये पण देणार नाही! म्हणजे तो सुक्ष्मात उलटे (नकारात्म) चार्ज करतो. त्यामुळे शेठ पुढच्या जन्मात कुणालाही पाच रुपये सुद्धा देऊ शकणार नाही! आणि दुसरा गरीब माणूस त्याच संस्थेच्या लोकांना पाच रुपयेच देतो आणि म्हणतो की, माझ्या जवळ पाच लाख असते तर ते सर्वच दिले असते! जो मनापासून देतो, तो पुढच्या जन्मी पाच लाख रुपये देऊ शकतो. असे बाहेर जे दिसते, ते फळ आहे आणि आत सुक्ष्मात बीज टाकले जाते, ते कुणालाही समजेल असे नाही. ते तर अंतर्मुख दृष्टी झाल्यानंतरच दिसते. आता हे समजले तर भाव बिघडतील का? मागच्या जन्मात, 'खाऊन पिऊन मजा करायची आहे' असे कर्म बांधून आणले ते संचित कर्म. ते संचित कर्म सुक्ष्मात स्टॉक मध्ये असते, ते फळ देण्यास सन्मूख होते तेव्हा मनुष्य जंक-फूड (कचरा) खाण्यास प्रेरित होतो आणि खाऊन टाकतो, ते प्रारब्ध कर्म आणि मग जेव्हा त्याचे पुन्हा फळ येते म्हणजे इफेक्ट चा इफेक्ट येतो तेव्हा त्याचे पोट पिळून निघते, किंवा आजारी पडतो, हे क्रियमाण कर्म. परम पूज्य दादाश्रींनी कर्माच्या सिद्धांताच्याही पुढे 'व्यवस्थित' शक्तिला 'जगतनियंता' (जगत चालविणारी) म्हटले आहे, कर्म तर 'व्यवस्थित' शक्तिचा अंश मात्र म्हटले जाईल. 'व्यवस्थित'मध्ये कर्म सामावले जाईल परंतु कर्मात 'व्यवस्थित' सामावले जात नाही. कर्म तर बीज स्वरूपात आपण सूक्ष्मात पूर्वजन्मातून बांधून आणतो ते. आता तेवढ्याने काही पुर्ण होत नाही. त्या कर्माचे फळ येते म्हणजे त्या बीजातून झाड तयार होते आणि फळ येते तोपर्यंत त्यात कित्येक संयोगांची गरज पडते. बीजास जमीन, पाणी, खत, गारवा, उष्णता, वेळ हे सर्व संयोग एकत्र आल्यावर कैरी पिकते

Loading...

Page Navigation
1 ... 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94