Book Title: Karmache Vignan
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 77
________________ ६४ कर्माचे विज्ञान असे आमंत्रित करतात अधोगतिस प्रश्नकर्ता : मनुष्याला जनावरांचाच जन्म मिळेल, हे कशाप्रकारे समजेल? दादाश्री : त्यांची सर्व लक्षणेच सांगत असतात. आताचे त्याचे जे विचार आहेत ना, ते विचारच पाशवतेचे येतात. कसे येतात? कोणाचे भोगून घेऊ, कोणाचे खाऊन टाकू. कोणाचे असे करू? मृत्युच्या वेळी फोटो सुद्धा जनावरांचाच पडतो. प्रश्नकर्ता : आंब्याची कोय जर आपण पेरली तर आंब्याचेच झाड होते, त्याचप्रमाणे जर मनुष्य मरतो तर मनुष्यातून पुन्हा मनुष्यच बनतो का? दादाश्री : होय, मनुष्यातून पुन्हा अर्थात या मेटरनीटी वॉर्डमध्ये स्त्रीच्या पोटी कुत्रा जन्माला येत नाही. समजते आहे ना! पण मनुष्यात ज्याला सज्जनतेचे विचार असतात म्हणजे मानवतेचे गुण असतील तर मग पुन्हा तो मनुष्यात येतो. आणि स्वतःच्या हक्काचे जे असेल ते दुसऱ्यास उपभोगण्यासाठी देतो तो देवगतित जातो, तो सुपर ह्युमन म्हटला जातो. स्वत:ची स्त्री भोगण्यास हरकत नाही, ते हक्काचे म्हटले जाते, पण बिनहक्काचे भोगू नये. हे असे जे भोगण्याचे विचार आहेत तेच त्याची मनुष्यातून दुसऱ्या जन्मी जनावरात जाण्याची लक्षणे आहेत. तो व्हिसा आहे. आपण जर त्याचा व्हिसा पाहून घेतला ना, तर माहिती होते. प्रश्नकर्ता : कर्माचा सिद्धांत असा आहे की, मनुष्याला त्याचे कर्म मनुष्य योनितच भोगावे लागतात? दादाश्री : नाही. कर्म तर इथल्या इथे भोगायचे आहे. पण जे विचार केलेले असतील की कोणाचे भोगून घेऊ, कोणाचे पळवून घेऊ, की कोणाचे हे करून घेऊ, असे संकल्प-विकल्प केले असतील, ते मग त्याला तिथे घेऊन जातात. केलेली कर्म तर तो इथल्या इथे भोगून घेतो. पाशवी कर्म केले असेल ते तर इथल्या इथे भोगून घेतो. त्यात हरकत नाही. डोळ्यांना दिसेल असे पाशवी कर्म केले असतील ते इथल्या इथेच भोगावे लागतात. ते कशाप्रकारे भोगतो? लोकांमध्ये निंदा होईल, लोकं

Loading...

Page Navigation
1 ... 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94