________________
७०
कर्माचे विज्ञान
दादाश्री : नाही, प्लस-माइनस होत नाही. पण त्याचे भोगणे कमी करू शकतो. हे जग आहे ना तेव्हापासून प्लस-माइनसचा नियमच नाही. नाहीतर अक्कलवाल्या लोकांनीच फायदा उठवून घेतला असता, कारण की शंभर पुण्य केले आणि दहा पापं केली, तर दहा कमी करून माझे नव्वद पुण्य आहेत ते जमा करून घ्या, असे म्हटले असते. तर अक्कलवाल्यांना सर्वांना तर मजा येईल. हे तर सांगतात, हे पुण्य भोग आणि नंतर ही दहा पापं भोग.
प्रश्नकर्ता : दादा, आमच्याकडून अहंकाराशिवाय कोणतेही सत्कर्म झाले किंवा एखाद्या संस्थेला, हॉस्पिटल इत्यादीला पैसे दिले तर आपल्या (वाईट) कर्मानुसार जे आपल्याला भोगावे लागणार आहे ते कमी होते, ही गोष्ट खरी आहे का?
दादाश्री : नाही, कमी होत नाही. कमी-जास्त होत नाही. त्याने दुसरे कर्म बांधले जातात. दुसरे पुण्याचे कर्म बांधले जाते. पण जर आपण एखाद्याला ठोसा मारून आलो (दुःख दिले) तर त्याचे फळ तर भोगावेच लागते, नाही तर हे सर्व व्यापारी लोक ते पाप कमी करून फक्त नफाच ठेवतील. हे असे नाही. नियम खूप सुंदर आहे. एक ठोसा मारला असेल, तर त्याचे फळ मिळेल. शंभर पुण्यातून दोन पापं कमी होणार नाहीत. दोन पापही राहणार आणि शंभर पुण्यही राहणार. दोन्हीही वेगवेगळे भोगायचे.
प्रश्नकर्ता : म्हणजे हे शुभकर्म करतो आणि अशुभ कर्म करतो, ह्या दोन्हींचे फळ वेगवेगळे मिळते का?
दादाश्री : अशुभला अशुभ फळ देतोच. शुभला शुभ फळ देईल. काहीही कमी-जास्त होत नाही. भगवंताकडे कायदा कसा आहे? की तुम्ही आज शुभ कर्म केले म्हणजे शंभर रूपये दान दिले, तर ते शंभर रूपये जमा करतील आणि एखाद्याला शिवी देऊन पाच रूपयाची उधारी केली, तर ती तुमच्या खात्यामध्ये उधारी लिहतील, ते पंच्याण्णव जमा नाही करणार. ते पाच उधार पण ठेवतात आणि शंभर जमा पण करतात. खूप पक्के आहेत. नाही तर ह्या व्यापारी लोकांना पुन्हा दुःखच नाही मिळणार. असे असेल ना तर जमा-उधार करून त्यांचे जमाच राहिले असते आणि