Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कथित
कर्माचे विज्ञान
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कथित
कर्माचे विज्ञान
मूळ गुजराती संकलन : डॉ. नीरूबहन अमीन
अनुवाद : महात्मागण
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
प्रकाशक
: श्री अजित सी. पटेल
दादा भगवान आराधना ट्रस्ट, दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे, उस्मानपुरा, अहमदाबाद - ३८० ०१४, गुजरात. फोन - (०७९) ३९८३०१००
©
All Rights reserved - Shri Deepakbhai Desai Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India.
No part of this book may be used or reproduced in any manner whatsoever without written permission from the holder of the copyrights.
प्रथम आवृत्ति : ३,००० ऑक्टोबर, २०१५
भाव मूल्य : ‘परम विनय' आणि
_ 'मी काहीच जाणत नाही', हा भाव!
द्रव्य मूल्य : २५ रुपये
मुद्रक
: अंबा ओफसेट पार्श्वनाथ चैम्बर्स, नव्या रिज़र्व बँके जवळ, उस्मानपुरा, अहमदाबाद-३८० ०१४. फोन : (०७९) २७५४२९६४
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
त्रिमंत्र
વર્તમાનતીર્થકરી . શ્રીસીમંધરસ્વામી नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उवज्झायाणं नमो लोए सव्वसाहूणं एसो पंच नमुक्कारो, सव्व पावप्पणासणो मंगलाणं च सव्वेसिं,
पढमं हवइ मंगलम् ॥१॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥२॥
ॐ नमः शिवाय ॥३॥ जय सच्चिदानंद
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
१. भोगतो त्याची चूक
२. एडजेस्ट एव्हरीव्हेअर
३.
जे घडले तोच न्याय
४.
संघर्ष टाळा
दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके
मराठी
१.
२.
३.
४.
५.
६. क्रोध
७.
चिंता
५.
मी कोण आहे ?
ज्ञानी पुरूष की पहचान
सर्व दुःखों से मुक्ति
कर्म का सिद्धांत
आत्मबोध
मैं कौन हूँ?
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
भूगते उसी की भूल एडजस्ट एवरीव्हेयर
टकराव टालिए
६.
७.
८.
९.
१०. हुआ सो न्याय
११. चिंता
१२. क्रोध
१३. प्रतिक्रमण
दादा भगवान कौन ?
१४.
१५. पैसों का व्यवहार
१६.
१७. जगत कर्त्ता कौन ?
१८. त्रिमंत्र
१९.
अंत:करण का स्वरूप
भावना से सुधरे जन्मोंजन्म
२०. प्रेम
८. प्रतिक्रमण
९. भावना सुधारे जन्मोजन्म १०. आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
११. पति - पत्नीचा दिव्य व्यवहार
१२. कर्माचे विज्ञान
१३. पाप-पुण्य
हिन्दी
२४. मानव धर्म
२५. सेवा-परोपकार
२६.
२७.
२८.
२९.
३०.
३१.
३२.
३३.
३४.
३५.
३६.
३७.
३८.
३९.
४०.
४१.
४२.
मृत्यु समय, पहले और पश्चात
निजदोष दर्शन से... निर्दोष
गुरु-शिष्य
पति-पत्नी का दिव्य व्यवहार
क्लेश रहित जीवन
अहिंसा
सत्य-असत्य के रहस्य
चमत्कार
पाप-पुण्य
वाणी, व्यवहार में....
कर्म का विज्ञान
आप्तवाणी - १
आप्तवाणी
आप्तवाणी
३
आप्तवाणी - ४
आप्तवाणी - ५
आप्तवाणी - ६
आप्तवाणी ७
आप्तवाणी ८
-
-
२
४३.
४४.
४५.
आप्तवाणी - १३ (पूर्वार्ध)
४६. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य (उत्तरार्ध/पूर्वार्ध)
-
२१. समझ
प्राप्त ब्रह्मचर्य
२२. माता-पिता और बच्चों का व्यवहार २३. दान
★ दादा भगवान फाउन्डेशन द्वारे गुजराती, हिन्दी आणि अंग्रेजी भाषेत सुद्धा बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहे. वेबसाइट www.dadabhagwan.org वर सुद्धा आपणही सगळी पुस्तके प्राप्त करू शकता.
★ प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि अंग्रेजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित होत आहे.
4
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कोण? जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनवर अलोट गर्दी होती. प्लेटफार्म नंबर तीनच्या रेल्वेच्या बाकावर बसलेले श्री. अंबालाल मुळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मांपासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले 'दादा भगवान' संपूर्णपणे प्रगट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भुत आश्चर्य! एका तासात विश्वदर्शन लाभले! आपण कोण? भगवंत कोण? जग कोण चालवत आहे? कर्म म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणतात? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांचे संपूर्ण निराकरण केले! आणि जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांचा संपूर्ण उलगडा झाला. अशा प्रकारे निसर्गाने विश्वाला प्रदान केले एक अद्वितीय, संपूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातचे चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कंट्राक्टचा व्यवसाय करणारे आणि तरीही पूर्ण वीतराग पुरुष.
त्यांना ज्ञान प्राप्ति झाली त्याच प्रमाणे ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोगाद्वारे त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हणतात. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढायचे! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग! शॉर्ट कट!!
ते स्वतः प्रत्येकाला 'दादा भगवान कोण?' ह्याबद्दलची फोड करून देताना म्हणायचे की, "हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत. हे तर ए.एम. पटेल आहेत. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रगट झाले आहेत ते दादा भगवान आहेत. ते चौदलोकचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात बसलेले आहेत आणि 'इथे' संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! मी स्वतः परमेश्वर नाही. माझ्या आत प्रगट झालेले 'दादा भगवान' त्यांना मी पण नमस्कार करतो."
____ व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. ह्या सिद्धांताने ते संपूर्ण जीवन जगले. त्यांनी जीवनात कधीही कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत, उलट स्वतःच्या व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवीत असत.
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मज्ञान प्राप्तिची प्रत्यक्ष लींक मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धि प्राप्त करून देणार आहे. माझ्या नंतर कोणी तरी पाहिजे की नाही! नंतर लोकांना मार्ग (दाखविणारा) हवा की नाही?
- दादाश्री परम पूज्य दादाश्रींना जे ज्ञान प्राप्त झाले, ते अद्भुत आत्मज्ञान, त्यांनी देश-विदेश परिभ्रमण करून, दुसऱ्या लोकांना सुद्धा दोन तासात प्राप्त करून दिले होते, त्याला ज्ञानविधि म्हणतात. दादाश्रींनी आपल्या जीवनकाळातच पूज्य डॉ. नीरूबहन अमीन (नीरूमा)यांना आत्मज्ञान देण्याची ज्ञानसिद्धि प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलय पश्चात् नीरूमा आतापर्यंत मुमुक्षुजनांना सत्संग आणि आत्मज्ञानाची प्राप्ति, निमित्तभावाने करत होत्या. त्याचबरोबर पूज्य दीपकभाईनांही दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धि प्रदान केली होती. पूज्य नीरूमांच्या उपस्थितीतच त्यांच्या आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कितीतरी ठिकाणी जाऊन मुमुधुंना आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, जे पूज्य नीरूमांच्या देहविलय पश्चात् आज पण चालू आहे.
ह्या आत्मज्ञान प्राप्ति नंतर हजारो मुमुक्षु संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा मुक्त राहून आत्मरमणतेचा अनुभव करत आहेत.
पुस्तकात लिहिलेली वाणी मोक्षार्थीला मार्ग दाखविण्याच्या हेतूने अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहे. परंतु मोक्ष प्राप्तिसाठी आत्मज्ञान प्राप्त करणे जरुरी आहे. अक्रम मार्ग द्वारा आत्मज्ञानाची प्राप्ति आज पण चालू आहे. त्यासाठी प्रत्यक्ष आत्मज्ञानीला भेटून आत्मज्ञानाची प्राप्ति करेल तेव्हाच हे शक्य आहे. प्रज्वलित दिवाच दुसरा दिवा प्रज्वलित करू शकतो.
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
निवेदन
परम पूज्य ‘दादा भगवान' यांच्या प्रश्नोत्तरी सत्संगात विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांच्या श्रीमुखातून अध्यात्म आणि व्यवहार ज्ञानासंबंधी जी वाणी निघाली, ती रेकॉर्ड करून, संकलन व संपादन करून पुस्तकांच्या रुपात प्रकाशित केली जात आहे. त्याच साक्षात सरस्वतीचे अद्भूत संकलन ह्या पुस्तकात झाले आहे, जे आम्हा सर्वांसाठी वरदानरुप ठरेल.
प्रस्तुत अनुवादाची वाक्यरचना मराठी व्याकरणाच्या मापदण्डा वर कदाचित खरी नाही ठरणार परंतु दादाश्रींची गुजराती वाणीचे शब्दश: मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणे करुन वाचकांना असा अनुभव व्हावा की दादाजींचीच वाणी ऐकली जात आहे. पण तरीसुद्धा दादाश्रींच्या आत्मज्ञानाचे अचूक आशय, जसे आहे तसे तर तुम्हाला गुजराती भाषेतच अवगत होईल. ज्यांना ज्ञानाचा गहन अर्थ समजून घ्यायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी ह्या हेतूने गुजराती भाषा शिकावी असा आमचा अनुरोध आहे.
अनुवादासंबंधी उणीवांसाठी आपले क्षमाप्रार्थी आहोत.
वाचकांना...
ह्या पुस्तकातील मुद्रित पाठ्यसामग्री मूळतः 'कर्मनु विज्ञान' या गुजराती पुस्तकाचे मराठी अनुवाद आहे.
+
जिथे जिथे 'चंदुभाऊ' ह्या नावाचा उल्लेख केला आहे, तिथे तिथे वाचकांनी स्वत:चे नाव समजून वाचन करावे.
पुस्तकातील कोणतीही गोष्ट जर तुम्हाला समजली नाही, तर प्रत्यक्ष सत्संगात येवून त्याचे समाधान मिळवावे अशी नम्र विनंती. दादाश्रींच्या श्री मुखातूत निघालेले काही गुजराती शब्द जसे च्या तसे ‘इटालिक्स’मध्ये ठेवले आहेत, कारण त्या शब्दांसाठी मराठीमध्ये तसेच कोणतेही शब्द उपलब्ध नाहीत की ज्यामुळे त्याचा अर्थ पूर्णपणे समजता येईल. पण तरीही त्या शब्दाचे समनाथी शब्द () कंसात लिहिलेले आहेत.
7
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
संपादकीय
अकल्पित, अनिर्धारितघटना सहसा टी.व्ही. किंवा वर्तमान पत्रातून वाचायला मिळतात जसे की, विमान कोसळून ४०० लोक ठार झाले, मोठा बॉम्ब-स्फोट झाला, आग लागली, भूकंप झाला, वादळ आले, हजारो लोक मारले गेले! कितीतरी अपघातात मारले गेले, काही आजाराने मेले, काही जन्मताच मृत्यु पावले! कित्येकांनी उपासमारीमुळे आत्महत्या केली, काही धर्मात्मा गलिच्छ वर्तन करताना पकडले गेले, कितीतरी भिकारी उपाशी मेले! पण संत, भक्त, ज्ञानींसारखे उच्च महात्मा निजानंदात जीवन जगत आहेत! दररोज दिल्लीतील घोटाळे उघडकीस येतात. अशा बातम्यांनी प्रत्येक माणसाच्या हृदयात एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते की, याचे रहस्य काय? याच्या मागे काही गुह्य कारण असेल का? निर्दोष बालक जन्मताच का अपंग झाले? हृदय द्रवित होऊन जाते, खूप विचारमंथन करूनही मनाचे समाधान होत नाही आणि शेवटी आपापली कर्म. असे मानून, असमाधानामुळे जड झालेल्या मनाने गप्प होतो. कर्म आहे असे म्हणतो, परंतु कर्म म्हणजे नेमके काय आहे? कशा प्रकारे कर्म बांधले जाते? त्याची सुरूवात कशी होते? पहिले कर्म कुठून सुरू झाले? कर्मातुन मुक्ती मिळू शकते का? कर्माचे भोग टाळले जाऊ शकतात का? भगवंत करत असतील की कर्म करवून घेत असतील? मृत्यु नंतर काय होते? कर्म कोण बांधत असेल? भोगतो कोण? आत्मा की देह?
आपली लोकं कर्म कशास म्हणतात? काम-धंदा करतो, सत्कार्य करतो, दान-धर्म करतो या सर्वांना 'कर्म केले' असे म्हणतात, ज्ञानी याला कर्म म्हणत नाहीत पण कर्मफळ म्हणतात. जे पाच इंद्रियांनी पाहू शकतो, अनुभवू शकतो ते सर्व स्थूळ आहे. ते कर्मफळ म्हणजे डिस्चार्ज (पूर्वी बांधलेले कर्म उदयास येणे) कर्म म्हटले जाते. मागच्या जन्मी जे चार्ज (नवीन कर्म बांधणे) केले होते ते आज डिस्चार्ज मध्ये आले, रुपकात आले आणि आता जे नवीन कर्म चार्ज करीत आहोत ते सुक्ष्मात होत असते व ते चार्जिंग पोईंट कुणालाही कळू शकेल असे नाही.
समजा एखाद्या शेठकडे एका संस्थेचे ट्रस्टी धर्मार्थ दान देण्यास दबाव टाकतात व शेठ पाच लाख रुपये दान म्हणून देतात. त्यानंतर त्या शेठचा
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
मित्र शेठला विचारतो की, 'अरे, ह्या लोकांना तु का दिलेस? हे सर्व चोर आहेत, तुझे पैसे खाऊन टाकतील.' त्यावर शेठ म्हणतो, 'या सर्वांनाच, एकेकाला मी चांगल्या प्रकारे ओळखून आहे. पण काय करु? त्या संस्थेचे चेअरमन माझे व्याही आहेत म्हणून त्यांच्या दबावामुळे द्यावे लागले, नाहीतर मी पाच रुपये पण देईल असा नाही. आता पाच लाख रुपये दान केले म्हणून बाहेर लोकांना शेठजींसाठी धन्यधन्य वाटले, पण ते शेठजींचे डिस्चार्ज कर्म होते आणि चार्ज काय केले शेठजींनी? पाच रुपये पण देणार नाही! म्हणजे तो सुक्ष्मात उलटे (नकारात्म) चार्ज करतो. त्यामुळे शेठ पुढच्या जन्मात कुणालाही पाच रुपये सुद्धा देऊ शकणार नाही! आणि दुसरा गरीब माणूस त्याच संस्थेच्या लोकांना पाच रुपयेच देतो आणि म्हणतो की, माझ्या जवळ पाच लाख असते तर ते सर्वच दिले असते! जो मनापासून देतो, तो पुढच्या जन्मी पाच लाख रुपये देऊ शकतो. असे बाहेर जे दिसते, ते फळ आहे आणि आत सुक्ष्मात बीज टाकले जाते, ते कुणालाही समजेल असे नाही. ते तर अंतर्मुख दृष्टी झाल्यानंतरच दिसते. आता हे समजले तर भाव बिघडतील का?
मागच्या जन्मात, 'खाऊन पिऊन मजा करायची आहे' असे कर्म बांधून आणले ते संचित कर्म. ते संचित कर्म सुक्ष्मात स्टॉक मध्ये असते, ते फळ देण्यास सन्मूख होते तेव्हा मनुष्य जंक-फूड (कचरा) खाण्यास प्रेरित होतो आणि खाऊन टाकतो, ते प्रारब्ध कर्म आणि मग जेव्हा त्याचे पुन्हा फळ येते म्हणजे इफेक्ट चा इफेक्ट येतो तेव्हा त्याचे पोट पिळून निघते, किंवा आजारी पडतो, हे क्रियमाण कर्म.
परम पूज्य दादाश्रींनी कर्माच्या सिद्धांताच्याही पुढे 'व्यवस्थित' शक्तिला 'जगतनियंता' (जगत चालविणारी) म्हटले आहे, कर्म तर 'व्यवस्थित' शक्तिचा अंश मात्र म्हटले जाईल. 'व्यवस्थित'मध्ये कर्म सामावले जाईल परंतु कर्मात 'व्यवस्थित' सामावले जात नाही. कर्म तर बीज स्वरूपात आपण सूक्ष्मात पूर्वजन्मातून बांधून आणतो ते. आता तेवढ्याने काही पुर्ण होत नाही. त्या कर्माचे फळ येते म्हणजे त्या बीजातून झाड तयार होते आणि फळ येते तोपर्यंत त्यात कित्येक संयोगांची गरज पडते. बीजास जमीन, पाणी, खत, गारवा, उष्णता, वेळ हे सर्व संयोग एकत्र आल्यावर कैरी पिकते
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________
व आंबा मिळतो. दादाश्रींनी खुपच सुंदर स्पष्टीकरण केले आहे की ही सर्व तर फळं आहे. कर्मबीज तर आत सूक्ष्मात काम करते.
अनेकांना असा प्रश्न पडतो की पहिले कर्म कशा प्रकारे बांधले गेले असेल? पहिला देह की पहिले कर्म? पहिले अंडे की पहिली कोंबडी? अशा प्रकारची गोष्ट झाली ही! खरोखर, वास्तविकेत पहिले कर्म अशी कोणतीही वस्तूच नाही ह्या जगात! कर्म आणि आत्मा अनादिकाळापासून आहेत. ज्याला आपण कर्म म्हणत असतो ते जड तत्त्वाचे आहे आणि आत्मा चेतन तत्त्व आहे. दोन्ही तत्त्वे वेगळीच आहेत. आणि तत्त्व म्हणजे सनातन वस्तू म्हटली जाते. जे सनातन असते त्याचा आदि (प्रारंभ) कसा असू शकतो? हे तर आत्मा आणि जड तत्त्वाचे संयोग झाले आणि त्यात आरोपित भाव यांचे आरोपण होतच गेले. त्याचे हे फळ येऊन उभे राहिले. संयोग वियोगी स्वभावाचे आहेत. म्हणून संयोग येतात आणि जातात. त्यामुळे निरनिराळ्या प्रकारच्या अवस्था उत्पन्न होतात आणि जातात. त्यात राँग बिलीफ (चुकीची मान्यता) उभी राहते की 'हे मी आहे आणि हे माझे आहे' त्यामुळे हे रुपी जग भास्यमान होते. हे रहस्य जर समजले तर शुद्धात्मा आणि संयोग या दोनच वस्तु आहेत जगात. परंतु एवढे न समजल्यामुळे वेगवेगळ्या स्थूळ भाषेत कर्म, नशीब, प्रारब्ध हे सर्व म्हणावे लागते. पण विज्ञान एवढेच म्हणते, मात्र जे सर्व संयोग आहेत, त्यातून पर (वेगळे) होऊन गेले तर आत्म्यातच राहू शकतो! तर मग कर्मा सारखे काहीच उरणार नाही.
कर्म कशा प्रकारे बांधली जातात? कर्ताभावाने कर्म बांधली जातात. कर्ताभाव कशाला म्हणतात? करतो कोणीतरी आणि मानतो की 'मी करतो', त्याचे नाव कर्ताभाव. कर्ताभाव कशाने होतो? अहंकाराने. अहंकार कोणास म्हणतात? जो स्वत: नाही तिथे 'मी' पणाचे आरोपण करतो, त्याचे नाव
10
Page #12
--------------------------------------------------------------------------
________________
अहंकार. आरोपित भाव त्याचे नाव अहंकार, 'मी चंदलाल आहे' असे मानतो तोच अहंकार आहे. खरोखर स्वतः चंदुलाल आहे? की चंदुलाल नाव आहे? नावाला 'मी' मानतो, शरीराला 'मी' मानतो, मी पती आहे, ह्या सर्व राँग बिलीफ (चुकीच्या मान्यता) आहेत. खरोखर तर स्वतः आत्माच आहे, शुद्धात्मा आहे पण त्याचे भान नाही, ज्ञान नाही म्हणून मी चंदुलाल, मीच देह (शरीर) आहे असे मानतो. हीच अज्ञानता आहे! आणि याच्यानेच कर्म बांधले जाते.
छुटे देहाध्यास तो नही कर्ता तू कर्म, नही भोक्ता तू तेहनो ए छे धर्मनो मर्म। - श्रीमद राजचंद्र। जो तू जीव तो कर्ता हरी, जो तू शिव तो वस्तु खरी।
- अखा भगत। 'मी चंदुलाल आहे' असे भान आहे त्याला जीवदशा म्हटले, आणि मी चंदुलाल नाही पण मी तर खरोखर शुद्धात्मा आहे ह्याचे भान, ज्ञान वर्तनात येते त्याला शिव पद म्हटले आहे. स्वत:च शिव आहे. आत्मा हाच परमात्मा आहे आणि कोणतीही संसारी क्रिया करण्याचा त्याचा स्वभाव नाही. स्वभावतः आत्मा अक्रिय आहे, असंग आहे. 'मी आत्मा आहे' आणि मी काहीच करत नाही असे निरंतर लक्षात राहते. त्याला ज्ञानी म्हटले आहे आणि त्यानंतर एक ही नवीन कर्म बांधले जात नाही. जनी डिस्चार्ज कर्म फळ देऊन संपत जातात.
मागच्या जन्मी कर्मबीज पेरतो, त्या कर्माचे फळ या जन्मात येते. तेव्हा हे फळ कोण देतो? भगवंत? नाही. निसर्ग देतो. ज्याला परम पूज्य दादाश्री सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स 'व्यवस्थित शक्ति' म्हणतात. ज्या चार्जचे डिस्चार्ज नॅचरली आणि ऑटोमॅटीकली होते. परंतु ते फळ भोगते वेळी अज्ञानतेमुळे पुन्हा आवड-नावड, राग-द्वेष केल्याशिवाय तो रहात नाही. ज्यामुळे तो नवीन बीजं टाकतो. ज्याचे फळ त्याला पुढच्या जन्मी भोगावे लागते. ज्ञानींनी नवीन बीज टाकण्याचे थांबवलेले आहे, ज्यामुळे मागचे फळ पुर्ण होऊन त्यांना मोक्षपदाची प्राप्ती होते!
कोणी आपला अपमान करतो, नुकसान करतो, तो तर निमित्त आहे,
11
Page #13
--------------------------------------------------------------------------
________________
निर्दोष आहे. कारणाशिवाय कार्यात कशाप्रकारे येईल? स्वतः अपमानित होण्याची कारणे बांधून आणली आहेत त्याचेच फळ, त्याचाच इफेक्ट येऊन उभा राहतो तेव्हा, दुसरी दिसणारी कितीतरी निमितं त्यात एकत्र व्हावी लागतात. फक्त 'बी' ने फळ नाही पिकत. पण सर्वच निमित्ते एकत्र झाली तरच बीज मधून झाड तयार होते व फळ खायला मिळते. म्हणजे हे जे फळ येते त्यात दुसऱ्या निमितांशिवाय फळ कशाप्रकारे येईल? अपमान खाण्याचे (अपमानित होण्याचे) बीज आपणच पेरले होते, त्याचे फळ अपमान मिळतो. अपमान मिळण्यासाठी इतर निमितं एकत्र यावी लागतात. आता या निमित्तांना दोषीत पाहून कषाय (क्रोध,मान,माया,लोभ) करुन मनुष्य अज्ञानतेने नवे कर्म बांधतो. परंतू जर ज्ञान हजर राहिले की समोरची व्यक्ति तर निमित्तच आहे, निर्दोष आहे, आणि हा अपमान मिळतो ते माझ्या कर्माचे फळ आहे, तर नवीन कर्म बांधले जात नाही. आणि त्यामुळे मुक्त रहाता येईल. समोरची व्यक्ति दोषीत दिसली की लगेच त्याला निर्दोष पहावे, आणि त्याला दोषीत पाहिल्या बद्दल लगेचच प्रतिक्रमण शूट एट साइट करून टाकायचे, ज्यामुळे बीज शेकले जाईल आणि परत उगणारच नाही.
दुसरी सर्व निमित्तं एकत्र येवून स्वतः टाकलेल्या बीजाचे फळ येणे आणि स्वत:ला भोगावे लागणे, ही सर्व प्रोसेस (प्रक्रिया) फक्त सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहे आणि त्यालाच दादाश्रींनी 'व्यवस्थित शक्ति' फळ देते, असे म्हटले आहे.
'ज्ञानी पुरुष' परम पूज्य श्रीदादा भगवानांनी स्वत:च्या ज्ञानात अवलोकन करुन जगाला 'कर्माचे विज्ञान' दिले आहे. जे दादाश्रींच्या वाणीत येथे संक्षिप्तमध्ये पुस्तक रुपात ठेवले आहे, जे वाचकांना जीवनात गोंधळून टाकणाऱ्या कोडयांची समाधानकारक उत्तरे देतील.
- डॉ. नीरुबहेन अमीन चे जय सच्चिदानंद.
Page #14
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
करतो की करावे लागते? दादाश्री : तुझ्यासोबत असे कधी घडते का, की तुझी इच्छा नसते तरीही तुला तसे काही करावे लागते? असे होते का कधीतरी? असे होते की नाही?
प्रश्नकर्ता : हो असे होते.
दादाश्री : लोकांनाही असे होत असेल की नाही? त्याचे कारण काय? की इच्छा नसते तरी सुद्धा करावे लागते त्याचे कारण काय? तर ते पूर्वकर्म केले होते त्याचा हा इफेक्ट (परिणाम) आला आहे. नाईलाजास्तव करावे लागते, त्याचे कारण काय?
जगातील लोक या इफेक्टलाच कॉझ (परिणामालाच कारण) म्हणतात. आणि ह्या इफेक्टला तर समजतच नाही ना! जगातले लोक याला कॉझ (कारण) म्हणतात, तर आपण सांगायचे ना की, माझी इच्छा नाही तरी पण कसे काय हे कार्य मी केले? आता ज्याची इच्छा नाही ते कर्म 'मी केले', हे तुम्ही कसे काय म्हणता? 'तुम्ही कर्म केले' असे जग कशामुळे म्हणते? त्याचे कारण हेच की दिसणाऱ्या क्रियेलाच जगातील लोक 'कर्म केले' असे म्हणतात. लोक म्हणतील ह्यानेच हे कर्म केले. तेव्हा ज्ञानी असे समजातात की हे तर परिणाम आले.
कोणी पाठविले पृथ्वीवर? प्रश्नकर्ता : आपण स्वत:च जन्माला आलो आहोत की आपल्याला कोणी पाठविणारा आहे?
Page #15
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
दादाश्री : कोणीही पाठविणारा नाही. तुमची कर्मच तुम्हाला घेऊन जातात. आणि लगेचच तेथे जन्म मिळतो. चांगली कर्म असतील तर चांगल्या ठिकाणीच जन्म मिळतो, खराब कर्म असतील तर खराब ठिकाणी जन्म मिळतो.
कर्माचा सिद्धांत काय?
प्रश्नकर्ता : कर्माची व्याख्या काय?
दादाश्री : कोणतेही कार्य करताना त्यास ' मी करतो' असा आधार देणे, ही कर्माची व्याख्या आहे.. 'मी करतो' असा आधार देतो, याला कर्म बांधणे असे म्हणतात. ‘मी करत नाही' आणि 'कोण करत आहे' हे जाणून घेतल्यावर कर्माला निराधार करतो, तेव्हा ती कर्म गळून पडतात. ( संपतात)
प्रश्नकर्ता : कर्माचा सिद्धांत म्हणजे काय?
दादाश्री : तु विहीरीत उतरुन म्हणलास की 'तु चोर आहेस' तर विहीर काय म्हणेल?
प्रश्नकर्ता : ‘तु चोर आहेस' असे आपण बोललो की तसाच प्रतिध्वनी ऐकू येतो.
दादाश्री : बस, बस. हे जर तुला आवडत नसेल, तर तु म्हणायचे की 'तु बादशाह आहेस.' म्हणजे तो तुला 'बादशाह' म्हणेल. तुला आवडत असेल तर बोल, हा आहे कर्माचा सिद्धांत ! तुला वकीली आवडत असेल तर वकीली कर. डॉक्टरकी आवडत असेल तर डॉक्टरकी कर. कर्म म्हणजे ॲक्शन. रिॲक्शन म्हणजे काय? तर तो प्रतिध्वनी आहे. रिॲक्शन प्रतिध्वनीवाले आहे. त्याचे फळ आल्याशिवाय रहात नाही.
ती विहीर काय म्हणेल? हे सर्व जग आपलेच प्रोजेक्ट (योजना, प्रकल्प) आहे. तुम्ही ज्याला कर्म म्हणत होता ना, ते आपलेच प्रोजेक्ट आहे.
प्रश्नकर्ता : कर्माचा सिद्धांत आहे की नाही?
दादाश्री : संपूर्ण जग कर्माचा सिद्धांतच आहे. बाकी दुसरे काहीच
Page #16
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
३
नाही. आणि तुमच्याच जोखिमदारीमुळे बंधन आहे. हे सर्व प्रोजेक्शन तुमचेच आहे. हा देह सुद्धा तुम्हीच घडविला आहे. तुम्हाला जे जे मिळाले ते सर्व तुम्हीच घडविलेले आहे. यात दुसऱ्या कोणाचाही हात नाही. होल अॅन्ड सोल रिस्पॉन्सिबिलिटी तुमचीच आहे सगळी, अनंत जन्मापासूनची.
आपलेच 'प्रोजेक्शन' विहीरीत जाऊन प्रोजेक्ट केले, ह्यावरुन लोक असे म्हणतील की बस, प्रोजेक्ट करण्याचीच गरज आहे. आपण जर त्यांना विचारले की तुम्ही असे कशावरून म्हणता? तेव्हा म्हणतील की विहीरीत जाऊन मी आधी असे बोललो होतो की 'तु चोर आहेस.' तेव्हा विहीर मला म्हणाली की 'तु चोर आहेस.' मग मी प्रोजेक्ट बदलले की, तु 'राजा आहेस.' तर तिने पण म्हटले 'तु राजा आहेस.' अरे पण, हा प्रोजेक्ट तुझ्या हातात आहेच कुठे? प्रोजेक्टला बदलणे ही गोष्ट तर खरी आहे, परंतु तेही तुझ्या हातात नाही. हो, ते स्वतंत्र आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. 'नाही' हे जास्त प्रमाणात आहे आणि 'आहे' हे कमी प्रमाणात आहे. असे हे परसत्तावाले जग आहे. खरे ज्ञान समजल्यानंतर स्वतंत्र आहे, तोपर्यंत स्वतंत्र नाही.
पण मग आता प्रोजेक्ट बंद कसे होईल? तर ह्यातून जोपर्यंत स्वत:चे स्वरूप सापडत नाही. अर्थात ह्या सर्वांत 'मी हे आहे की ते आहे?' तोपर्यंत भटकणे आहे. हा देह तर मी नाही. हे डोळे सुद्धा मी नाही. आत खूप सारे स्पेअरपार्टस (अवयव) आहेत. या सगळयात 'मी चंदुभाऊ आहे' (चंदुभाऊच्या जागी वाचकांनी स्वत:चे नाव समजायचे) असे अजून भान आहे. त्यामुळे हे सार काढू शकत नाही, म्हणून तो काय समजतो? हा त्याग करतो? तोच 'मी' आहे. त्यामुळे खरे तर, 'मी' कुठेही योग्य स्थानावर उभा राहिला नाही त्यांना. तो समजतो की हा तप करतो तोच 'मी' आहे. सामायिक करतो तोच मी आहे, प्रवचन देतो तोच 'मी' आहे. जोपर्यंत 'मी करत आहे' असे भान आहे तोपर्यंत नवीन प्रोजेक्ट करत राहतो. आणि जुन्या प्रोजेक्टअनुसार भोगत राहतो. कर्माचा सिद्धांत जर समजत असाल, तरच मोक्षाचा सिद्धांत समजेल.
Page #17
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
राँग बिलीफ ने कर्मबंधन तुमचे नाव काय आहे? प्रश्नकर्ता : चंदुभाऊ. दादाश्री : खरोखर चंदुभाऊ आहात? प्रश्नकर्ता : असे कसे म्हणू शकतो? सर्वांना जे वाटते तेच खरे.
दादाश्री : तर मग खरोखर चंदुभाऊ आहात, नाही का? तुम्हाला खात्री नाही का? 'माय नेम इज (माझे नाव) चंदुभाऊ असे बोलता ना?'
प्रश्नकर्ता : मला तर खात्री आहेच.
दादाश्री : माय नेम ईज चंदूभाऊ. नॉट आय. तर खरोखर तुम्ही चंदुभाऊ आहात की दुसरे कोणी आहात?
प्रश्नकर्ता : हे खरे आहे, आपण काही वेगळेच आहोत. ही तर वास्तविकता आहे.
दादाश्री : हे 'चंदुभाऊ' तर ओळखण्याचे साधन आहे, की हे देहवाले, हे भाऊ, ते चंदुभाऊ आहेत. तुम्हीही असे जाणता की या देहाचे नाव चंदुभाऊ आहे. पण तुम्ही कोण आहात? हे जाणून घ्यायला नको?
प्रश्नकर्ता : हे जाणून घ्यायला हवे. जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
दादाश्री : म्हणजे हे कशासारखे झाले की तुम्ही चंदुभाऊ नाहीत, तरीही तुम्ही आरोप करता, चंदुभाऊच्या नावाने सगळा फायदा उठवता. ह्या स्त्रीचा पती आहे. याचा मामा आहे, याचा काका आहे, असे लाभ उठवता. त्यामुळे निरंतर कर्म बांधतच राहता. जोपर्यंत तुम्ही आरोपित भावात आहात, तोपर्यंत कर्म बांधली जातात. 'मी कोण आहे?' हे नक्की झाल्यानंतर तुम्हाला कर्म बंधन होणार नाही.
अर्थात आताही कर्म बांधली जात आहेत आणि रात्री झोपेतही कर्म बांधली जातात. कारण की 'चंदुभाऊ आहे' असे मानून झोपतात. 'मी
Page #18
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
चंदुभाऊ आहे.' ही तुमची राँग बिलीफ (चुकीची मान्यता) आहे, त्याने कर्म बांधली जातात.
भगवंताने सर्वात मोठे कर्म कशास म्हटले? रात्री 'मी चंदुभाऊ आहे' असे मानून झोपून गेलात आणि मग आत्म्याला पोत्यात टाकले, ते सर्वात मोठे कर्म ! कर्तापदाने कर्मबंधन
प्रश्नकर्ता : कर्म कशाने बांधली जातात? हे आणखी थोडे सविस्तर समजावून सांगा ना...
दादाश्री : कर्म कशाने बांधली जातात, ते तुम्हांला सांगू का ? तुम्ही कर्म करीत नाही, तरीही मानता की 'मी करतो' म्हणून तुमचे बंधन जात नाही. भगवंत सुद्धा कर्ता नाही. भगवंत कर्ता असते, तर त्यांना बंधन झाले असते. अर्थात भगवंत कर्ता नाहीत आणि तुम्ही सुद्धा कर्ता नाहीत. पण तुम्ही मानतात की ‘मी करतो' त्यामुळे कर्म बांधली जातात.
कॉलेजात पास झालात, ते दुसऱ्या शक्तिच्या आधारावर आणि तुम्ही म्हणता की मी पास झालो. हा आरोपित भाव आहे. त्यामुळे कर्मबांधले जाते. वेदांताने सुद्धा स्वीकारले निरिश्वरवाद
प्रश्नकर्ता : जर दुसऱ्या कोणत्या तरी शक्तीने होत असते, तर मग कोणी चोरी केली, हा काही गुन्हा नाही. आणि कोणी दान दिले तर, तो सुद्धा गुन्हा नाही. म्हणजे हे सर्व काही सारखेच म्हटले जाईल ना !
दादाश्री : हो. सारखेच म्हटले जाईल. पण मग ते सारखे ठेवत नाहीत ना. दान देणारा अशी छाती काढून फिरतो, म्हणून तर तो बांधला गेला आणि चोरी करणारा म्हणतो, की चांगल्या चांगल्यांची चोरी करतो पण 'मला कोणी पकडूच शकत नाही', म्हणून तो मुर्ख बांधला गेला. 'मी केले' असे म्हटले नाही, तर काहीही स्पर्शत नाही (कर्म बांधले जात नाही).
प्रश्नकर्ता : अशी एक मान्यता आहे की, प्राथमिक कक्षेत आपण असे मानत असतो की, ईश्वर कर्ता आहे. पुढे जाऊन वेदांमध्येही निरिश्वरवादा शिवाय काहीच नाही. उपनिषदामध्ये पण निरिश्वरवादच आहे.
Page #19
--------------------------------------------------------------------------
________________
६
कर्माचे विज्ञान
ईश्वर कर्ता नाही. कर्माची फळे प्रत्येकाला भोगावी लागतात. तर ही कर्माची फळे जन्मोजन्मी अशीच चालू राहतात का?
दादाश्री : हो तर. नक्कीच. कर्माचे असे आहे की, या कैरीमधून झाड आणि झाडातून कैरी, परत कैरीमधून झाड आणि झाडातून कैरी.
प्रश्नकर्ता : हा तर उत्क्रांतीचा नियम झाला, हे तर होतच राहणार.
दादाश्री : नाही, हेच कर्म फळ, ही कैरी फळ रुपात आली. त्या फळामधून बी पडते आणि पुन्हा झाड होते आणि झाडामधून पुन्हा फळ येते ना! हे चालतच राहील. कर्मातून कर्मबीज पडतच राहते.
प्रश्नकर्ता : तर मग हे शुभ-अशुभ कर्म बंधन होतच राहणार, सुटणारच नाही.
दादाश्री : हो, वरचा गर खाऊन घेतो आणि कोय परत टाकली जाते. प्रश्नकर्ता : त्याने तर तिथे पुन्हा आंब्याचे झाड उत्पन्न होईल. दादाश्री : सुटकाच नाहीना!
जर तुम्ही एकीकडे ईश्वराला कर्ता मानता तर मग, दुसरीकडे तुम्ही स्वत:ला सुद्धा कर्ता का मानता? हा तर पुन्हा स्वत:ला च कर्ता मानतो! मनुष्य एकटाच असा आहे की, जो 'मी कर्ता आहे' असे भान ठेवतो. आणि जेथे कर्ता झाला तेथे आश्रितता तुटून जाते. त्याला भगवंत म्हणतात की, 'भाऊ, तूच करतोस तर, तु वेगळा आणि मी वेगळा.' मग भगवतांचे आणि तुमचे काय देणे-घेणे आहे?
स्वत:ला कर्ता मानतो म्हणून कर्मबंधन होते. स्वत:ला जर त्या कर्माचा कर्ता मानले नाही तर त्या कर्माचा विलय होतो.
हे आहे महाभजनाचे मर्म म्हणून अखा भगत म्हणतात की,
जो तु जीव तो कर्ता हरी; जो तु शीव तो वस्तु खरी!
Page #20
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
अर्थात जर 'तु शुद्धात्मा आहेस' तर गोष्ट खरी आहे. आणि जर 'तु जीव आहे;' तर वर कर्ता हरी आहे. आणि जर तु शीव आहेस' तर वस्तु खरी आहे. वर हरी नावाचा कोणी आहेच नाही. अर्थात जीव-शीव हा भेद गेला तर परमात्मा होण्याची तयारी सुरु झाली. हे सगळे भगवंताला भजतात, हा जीवा-शीवाचा भेद आहे. आणि आपल्या येथे ज्ञान मिळाल्या नंतर जीवा-शीवाचा भेद मिटून जातो.
कर्ता छूटे तो छूटे कर्म;
ए छे, महाभजननो मर्म! चार्ज (नवीन कर्म बांधणे) केव्हा होते की 'मी चंदुभाऊ आहे आणि हे मी केले.' म्हणजे जी उलट मान्यता आहे, त्यामुळे कर्म बांधले गेले. आता जर आत्म्याचे ज्ञान मिळाले तर 'तुम्ही' चंदुभाऊ नाही. चंदुभाऊ तर व्यवहाराने आहात, निश्चयाने नाही. आणि हे 'मी केले' ते व्यवहाराने. अर्थात् कर्तापण मिटले तर मग कर्म सुटून जाते. नवे कर्म बांधले जात नाहीत.
'मी कर्ता नाही' हे भान झाले, ही श्रद्धा बसली, तेव्हापासून कर्म सुटले. कर्म बांधायचे थांबले. म्हणजेच चार्ज होणे बंद झाले. हे आहे महाभजनाचे मर्म. महाभजन कशास म्हणतात? सर्व शास्त्रांचे सार त्यास महाभजन म्हणतात. हे महाभजनाचेही सार आहे.
करतो तोच भोगतो प्रश्नकर्ता : आपली शास्त्रं असे सांगतात की प्रत्येकाला कर्माप्रमाणे फळ मिळते!
दादाश्री : तो तर स्वत:च स्वत:साठी जबाबदार आहे. भगवंताने ह्यात हात घातलेलाच नाही. या जगात तुम्ही स्वतंत्रच आहात. उपरी (वरिष्ठ) कोण आहे? तुम्हाला अन्डरहॅन्ड (नोकर, हाताखालची माणसं) ची सवय आहे म्हणून तुम्हाला वरिष्ठ भेटतात, नाही तर तुमचा कोणी वरिष्ठही नाही व अन्डरहॅन्डही नाही, असे हे जग आहे! हे तर समजण्याची आवश्यकता आहे. दुसरे काही नाही.
संपूर्ण जगात सर्व ठिकाणी फिरुन आलो, अशी कोणती जागा नाही
Page #21
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
की जिथे वरिष्ठपणा असेल. भगवंत तुमचे वरिष्ठ नाहीत. तुमचे जोखिमदार तुम्ही स्वत:च आहात. सर्व जगातील लोकं मानतात की जग भगवंतांनी बनवले. पण जे पुर्नजन्माचा सिद्धांत समजतात त्यांच्याकडून असे मानले जाऊ शकत नाही, की जग भगवंताने बनविले आहे. पुनर्जन्म म्हणजे काय की 'मी करतो' आणि 'मी भोगतो.' आणि माझ्याच कर्माचे फळ मी भोगतो आहे. यात भगवंतांचा हस्तक्षेप नाहीच. स्वतः जे काही करतो ते स्वत:च्या जबाबदारीवरच करतो. कोणाच्या जबाबदारीवर आहे हे, हे समजले ना?
प्रश्नकर्ता : आजपर्यंत असे समजत होतो की भगवंतांची जबाबदारी
आहे.
दादाश्री : नाही. स्वत:चीच जबाबदारी आहे! होल ॲन्ड सोल रिस्पॉन्सिबिलिटी (संर्पूण जबाबदारी) स्वत:चीच आहे, पण मग त्या माणसाला गोळी का मारली? तो जबाबदार होता म्हणून त्याला त्याचे हे फळ मिळाले आणि हा मारणारा जेव्हा जबाबदार ठरेल, तेव्हा त्याचे फळ त्याला मिळेल. त्याची वेळ येईल तेव्हा त्याचे फळ मिळेल.
जसे, आज जर कैरी झाडाला लागली, तर आजच्या आज कैरी आणून तिचा रस काढू शकणार नाही. ते तर वेळ आल्यावर, ती मोठी होईल, पिकेल, तेव्हा रस निघेल. त्याचप्रमाणे ही गोळी लागली, पण त्या अगोदर ती पिकून तयार होते, तेव्हा ती लागते. अशीच लागत नाही. आणि मारणाऱ्याने गोळी मारली त्याची आज एवढी छोटी कैरी झाडाला लागली आहे, ती मोठी झाल्यावर पिकेल, त्यानंतरच तिचा रस निघेल.
कर्मबंधन, आत्म्याला की देहाला? प्रश्नकर्ता : तर मग आता कर्मबंधन कोणाला होते. आत्म्याला की देहाला?
दादाश्री : हा देह तर स्वतःच कर्म आहे. मग दुसरे बंधन त्याला कूठून होणार? हे तर ज्याला बंधन वाटत असेल, जो जेलमध्ये बसला असेल त्याला बंधन आहे. जेलला बंधन असते की जो जेलमध्ये बसला असेल त्याला बंधन असते? अर्थात हा देह जेल आहे आणि त्याच्या आत
Page #22
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
जो बसला आहे त्याला बंधन आहे. 'मी बांधलेला आहे, मी देह आहे, मी चंदुभाऊ आहे' असे मानतो, त्याला बंधन आहे.
प्रश्नकर्ता : म्हणजे आपल्याला असे म्हणायचे आहे की आत्मा देहाच्या माध्यमातून कर्म बांधतो, आणि देहाच्या माध्यमातून कर्म सोडतो?
___ दादाश्री : नाही, असे नाही. आत्मा तर ह्यात हात घालतच नाही. खरे तर आत्मा भिन्नच आहे, स्वतंत्र आहे. विशेषभावानेच हा अहंकार उत्पन्न झाला आहे आणि तोच कर्म बांधतो आणि तोच कर्म भोगतो. 'तुम्ही शुद्धात्मा आहात' पण बोलता की मी 'चंदुभाऊ आहे.' जिथे स्वतः नाही, तिथे आरोप करणे की 'मी आहे' त्यास अहंकार म्हणतात. परक्याच्या स्थानाला स्वत:चे स्थान मानता, हा ईगोइझम (अहंकार) आहे. हा अहंकार सुटला तर स्वत:च्या स्थानावर येऊ शकता. तेथे बंधन नाहीच.
कर्म अनादिपासून आत्म्यासोबत प्रश्नकर्ता : तर आत्म्याची कर्मरहित अशी स्थिती असेल ना? ती केव्हा असते?
दादाश्री : ज्याला एकाही संयोगाची वळगणां (बंधन, वेढा) नसेल, त्याला कर्म कधीही चिकटत नाहीत, ज्याला कोणत्याही प्रकारची वळगणां नसेल त्याला कर्माचा असा कोणत्याही प्रकारचा हिशोब नाही की जेणे करुन त्याला कर्म चिकटतील. सध्या सिद्धगतीत जे सिद्ध भगवंत आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्म चिकटत नाही. वेढा संपला की चिकटत नाही.
हे तर संसारात बंधन उभे राहिले आहे. आणि अनादी काळापासून हे कर्माचे बंधन आहे. आणि ते सर्व सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्समुळे आहे. सर्व तत्त्वं गतिमान होत असतात व तत्त्वं गतिमान झाल्यानेच हे सर्व उभे झाले आहे. ही सर्व भ्रांति उत्पन्न झाली आहे. त्यामुळे हे सर्व विशेषभाव उत्पन्न झाले आहेत. भ्रांती म्हणजेच विशेषभाव. त्याचा जो मूळ स्वभाव होता, त्यापेक्षा विशेषभाव उत्पन्न झाला आणि त्यामुळे हा सर्व बदल झाला आहे. अर्थात् आधी आत्मा कर्मरहीत होता, असे कधीच झालेले नाही. जेव्हा तो ज्ञानी पुरुषाकडे येतो, तेव्हा त्याचे कर्माचे ओझे
Page #23
--------------------------------------------------------------------------
________________
१०
कर्माचे विज्ञान
बरेचसे हलके झालेले असते, अर्थात तो हळूकर्मी (हलके कर्म असलेला) झालेला असतो. हळूकर्मी आहे, म्हणून तर ज्ञानी पुरुष भेटतात. ते भेटतात ते सुद्धा सायन्टिफीक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहे. स्वत:च्या प्रयत्नानेच जर करायला गेलो तर असे शक्य होणारच नाही. सहज प्रयत्न, सहजासहज भेटले तर काम होते. कर्म हे संयोग आहेत, आणि वियोगी त्यांचा स्वभाव आहे.
संबंध, आत्मा आणि कर्माचे... प्रश्नकर्ता : आत्मा आणि कर्म यांच्यात काय संबंध आहे?
दादाश्री : दोघांच्या मध्ये कर्तारुपी कडी नसेल तर दोन्ही वेगळे होतात. आत्मा, आत्म्याच्या जागेवर आणि कर्म कर्माच्या जागेवर वेगळे होऊन जातात.
प्रश्नकर्ता : समजले नाही बरोबर.
दादाश्री : कर्ता बनला नाही तर कर्म नाही. कर्ता आहे म्हणून कर्म आहे. तुम्ही कार्य करीत असाल, पण जर तुम्ही त्याचे कर्ता झाले नाहीत तर तुम्हाला कर्म बंधन होणार नाही. हे तर तुम्हाला 'मी केले' असे कर्तापद आहे, त्यामुळे कर्म बंधन आहे.
प्रश्नकर्ता : तर कर्मच कर्ता आहे?
दादाश्री : कर्ता हा कर्ता आहे. 'कर्म' हा कर्ता नाही. तुम्ही 'मी केले' म्हणता की 'कर्माने केले' म्हणता?
प्रश्नकर्ता : 'मी करत आहे' असे तर आत वाटतच असते ना! 'मी केले' असेच म्हणतो.
दादाश्री : हो, तो 'कर्ता.' 'मी करत आहे' असे म्हणता, म्हणून तुम्ही कर्ता बनता. बाकी 'कर्म' कर्ता नाही. 'आत्मा' पण कर्ता नाही.
प्रश्नकर्ता : कर्म एकीकडे आहे आणि आत्मा एकीकडे आहे, तर ह्या दोघांना वेगळे कसे करायचे?
Page #24
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
दादाश्री : ही कडी निघाली ना तर, दोन्ही वेगळेच आहेत. पण ही तर कर्तापदाची कडीच आहे. ह्या कडीमुळे बांधलेले आहोत असे वाटते. कर्तापद गेले, कर्तापद करणारा गेला. 'मी केले' असे म्हणणारा गेला तर झाले, संपले. मग तर दोन्ही वेगळेच आहेत.
कर्म बांधली जातात, ही तर अंतःक्रिया प्रश्नकर्ता : मनुष्यला कर्म लागू पडत असतील की नाही.
दादाश्री : निरंतर कर्म बांधतच असतो. दुसरे काहीच करत नाही. मनुष्याचा अहंकार असा आहे की तो खात नाही, पीत नाही, संसार करत नाही, व्यापार करत नाही तरीही मात्र अहमकारच करत असतो की 'मी करतो.' त्यामुळेच सर्व कर्म बांधत असतो. हे पण एक आश्चर्य आहे ना? हे प्रूव्ह (सिद्ध) होऊ शकेल असे आहे! खात नाही, पीत नाही, हे सिद्ध होऊ शकेल असे आहे. तरीही कर्म करत असतो हे पण सिद्ध होऊ शकते. आणि फक्त मनुष्यच कर्म बांधत असतात.
प्रश्नकर्ता : शरीरासाठी खात-पीत असेल, तरी सुद्धा स्वतः कर्म बांधत नसेलही ना!
दादाश्री : असे आहे ना, कोणतीही व्यक्ति जेव्हा कर्म करत असते तेव्हा डोळयांनी दिसत नाही. दिसते का तुम्हाला? हे जे डोळयांनी दिसते ना, त्यास आपल्या जगातील लोक कर्म म्हणतात. त्यांनी हे केले, ह्यांनी हे केले, ह्याने ह्याला मारले, असे कर्म बांधले. जगातील लोक असेच म्हणतात ना?
प्रश्नकर्ता : हो, जसे दिसत असते तसेच म्हणतात.
दादाश्री : कर्म म्हणजे त्यांची हालचाल (प्रवृत्ति) काय झाली, त्याला शिवी दिली तरीही कर्म बांधले, त्याला मारले तरीही कर्म बांधले, खाल्ले तरीही कर्म बांधले. झोपून गेलो, तरीही कर्म बांधले. कृती काय करतो, त्याला आपले लोक कर्म म्हणतात. पण वास्तविकतेत जे दिसते ते कर्मफळ आहे, ते कर्म नाही.
कर्म बांधले जाते तेव्हा अंतरदाह (आतील आग) जळत राहतो.
Page #25
--------------------------------------------------------------------------
________________
१२
कर्माचे विज्ञान
लहान मुलाला कडू औषध पाजले तेव्हा काय करतो? तोंड बिघडवतो ना! आणि गोड खायला दिले तर? खुश होतो. या जगात जीवमात्र राग-द्वेष करतात, हे सर्व कॉझ (कारणे) आहे, यातून हे कर्म उत्पन्न झाले आहे. जे स्वत:ला आवडते ते व जे स्वत:ला आवडत नाही ते, ही दोन्ही प्रकारची कर्म येतात. न आवडणारे कर्म चावून जातात, म्हणजे दुःख देऊन जातात. आणि आवडणारे कर्म सुख देऊन जातात. म्हणजे कॉझीझ मागच्या जन्मात झालेले आहे, ते या जन्मात फळ देतात.
कर्मबीजाचे नियम प्रश्नकर्ता : कर्म बीजाची अशी काही समज आहे की हे बीज पडेल आणि हे पडणार नाही?
दादाश्री : हो, जर तुम्ही म्हणालात की, 'हा नाष्टा किती छान बनला आहे, तो 'मी खाल्ला.' तर बीज पडले. 'मी खाल्ले' बोलण्यात अडचण नाही. 'कोण खातो', ते तुम्ही जाणले पाहिजे की मी खात नाही, खाणारा खात आहे. पण हा तर स्वतः कर्ता बनतो आणि कर्ता बनल्यामुळेच बीज पडते.
कोणी शिव्या दिल्या तरी त्याच्यावर द्वेष नाही, फूल वाहिले किंवा उचलून घेतले तर त्याच्यावर राग (आसक्ति, मोह) नाही. तर त्याला कर्म बांधले जात नाही.
प्रश्नकर्ता : राग-द्वेष होतो परंतु समजत नाही, तर त्यावर काय उपाय?
दादाश्री : त्याचे त्याला असे बक्षिस मिळते की त्यामुळे पुढील जन्मांत त्याचे भटकणे चालूच राहते.
संबंध, देह आणि आत्म्याचा... प्रश्नकर्ता : देह आणि आत्मा यांच्यातील संबंधाबाबत जास्त विस्तारपूर्वक समजवा ना?
दादाश्री : हा जो देह आहे, तो आत्म्याच्या अज्ञानतेने उत्पन्न झालेला परिणाम आहे. जे जे 'कॉझीझ' केले होते, त्याचा हा 'इफेक्ट' (परिणाम) आहे. जर कोणी तुम्हाला फूल वाहिले तर तुम्ही खुश होता, आणि जर कोणी
Page #26
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
तुम्हाला शिवी दिली तर तुम्ही चिडता. त्या चिडण्यात आणि खुश होण्यात बाह्य दर्शनाची किंमत नाही. अंतर - भावाने कर्म चार्ज होतात. ते मग पुढील जन्मात डिस्चार्ज (पूर्वी बांधलेले कर्म उदयास येतात) होतात. त्यावेळी ते 'इफेक्टिव' आहे. हे मन-वचन - काया तिन्ही 'इफेक्टिव' आहेत. 'इफेक्ट' भोगताना दूसरे नवीन कॉझीझ उत्पन्न होतात. जे पुढील जन्मात परत 'इफेक्टिव' होतात. अशाप्रकारे 'कॉझीझ' आणि 'इफेक्ट', 'इफेक्ट' आणि 'कॉझीझ' असे चक्र निरंतर चालूच राहते. म्हणून फॉरीनच्या सायन्टिस्ट लोकांनाही समजते की, अशाप्रकारे पुनर्जन्म आहे. म्हणून खूप खुश होतात की इफेक्ट एन्ड कॉझीझ आहेत हे !
१३
तर हे सर्व इफेक्ट आहेत. तुम्ही वकीली करता ते सर्व इफेक्ट आहे. इफेक्टमध्ये अहंकार करू नये की 'मी केले. ' इफेक्ट तर आपोआपच येतो. हे पाणी खाली जाते, तेव्हा ते असे म्हणत नाही की 'मी जात आहे', ते समुद्राकडे चारशे मैल असे तसे वळून जातच असते ना! आणि मनुष्य तर एखाद्याची केस जिंकून दिली तर 'मी कशी जिंकून दिली' असे बोलतो. आता त्याने त्याचा अहंकार केला, त्यामुळे त्याचे कर्म बांधले गेले, कॉझ झाले. त्याचे फळ पुन्हा इफेक्टमध्ये येईल.
कारण-कार्याचे रहस्य
इफेक्ट तुम्हाला समजले का ? आपणहून येतच असतात त्याचे नाव इफेक्ट. आपण परीक्षा देतो ना, हे कॉझ म्हटले जाईल. नंतर त्याच्या परिणामाची चिंता आपण करायची नसते. तो तर इफेक्ट आहे. परंतु संपूर्ण जग परिणामाची चिंता करत असते. खरं तर कॉझसाठी चिंता करण्यासारखे आहे!
हे विज्ञान तुला समजले का ? विज्ञान सिद्धांतिक असते. अविरोधाभास असते. तु बिझनेस केला व दोन लाख कमवले, तर ते कॉझ आहे की इफेक्ट?
प्रश्नकर्ता: कॉझीझ आहे.
दादाश्री : कशाप्रकारे कॉझीझ आहे ते मला समजवून सांग. मनासारखे करू शकतो का ?
Page #27
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
प्रश्नकर्ता : तुम्ही बिझनेस करता तेव्हा जे व्हायचे असते ते होतेच, तो इफेक्ट आहे. परंतु बिझनेस करण्यासाठी कॉझीझ तर करावे लागतात ना? तेव्हाच बिझनेस करू शकतो ना?
१४
दादाश्री : नाही, कॉझीझमध्ये इतर कोणत्याही रिलेटीव वस्तु वापरल्या जात नाहीत. बिझनेस तर शरीर चांगले असेल, डोकं चांगले चालत असेल, हे सर्व असेल तेव्हा होतो ना! सगळ्यांच्या आधारावर जे होत असेल, तो इफेक्ट आणि जो माणूस बसल्या बसल्या 'ह्याचे वाईट होईल, असे होईल.' असे करतो ते सर्व कॉझीझ, कारण की यात आधार किंवा इतर कोणत्याही वस्तुची गरज नसते.
प्रश्नकर्ता : आम्ही जो बिझनेस करत असतो, त्याला इफेक्ट म्हणतात का?
दादाश्री : इफेक्टच म्हणतात ना ! बिझनेस हा इफेक्टच आहे. परीक्षेचा परिणाम येतो, त्यात काही करावे लागते का? परीक्षेत करावे लागते, त्यास कॉझीझ म्हणतात. काहीतरी करावे लागते, परंतु तेही परिणामामध्ये काही करावे लागते का?
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : अशा प्रकारे यात काही करावे लागत नाही. हे सर्व होतच राहते. आपले शरीर वगैरे वापरले जाते आणि सर्व होतच राहते, कॉझमध्ये तर स्वत:ला करावे लागते. कर्ताभाव हे कॉज आहे. इतर सर्वकाही इफेक्ट आहे. भोक्ताभाव हे कॉज आहे.
प्रश्नकर्ता : जे भाव आहेत ते सर्व कॉझीझ, बरोबर.
दादाश्री : हो, जिथे दुसऱ्या कोणाच्याही मदतीची गरज भासत नाही. तुम्ही स्वयंपाक बनवता फर्स्ट क्लास, तो सर्व इफेक्ट आहे. आणि त्यात तुम्ही आत भाव करता की, 'मी किती छान स्वयंपाक बनवला, किती छान केला.' हा भाव तो तुमचा कॉझ. जर भाव केला नाही तर सर्व इफेक्टच आहे. ऐकू शकतो, पाहू शकतो, हे सर्व इफेक्ट्स आहेत. कॉझीझला पाहता येत नाही.
Page #28
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
१५
प्रश्नकर्ता : तर पाच इन्द्रियांनी जे होते तो सर्व इफेक्ट आहे का?
दादाश्री : हो, ते सर्व इफेक्ट आहे. संपूर्ण आयुष्यच इफेक्ट आहे. आणि त्यात आत जे भाव होत असतात ते भाव कॉझ आहे आणि भावाचा कर्ता असला पाहिजे. जगातील लोक, ते तर कर्ता आहेतच.
कर्म बांधण्याचे थांबले म्हणजे पूर्ण झाले. हे तुम्हाला समजते आहे का? तुमचे कर्म बांधण्याचे थांबले जात असेल? असे कधी तरी पाहिले का? शुभमध्ये पडाल तर शुभ बांधले जाईल, नाही तर अशुभ तर असतेच. कर्म सोडतच नाही! आणि 'स्वतः कोण आहे, हे सर्व कोण करतो' हे जाणून घेतल्यानंतर कर्म बांधले जाणारच नाही ना !
पहिले कर्म कशाप्रकारे आले?
प्रश्नकर्ता : कर्माच्या थियरीनुसार कर्म बांधली जातात आणि त्याचा परिणाम नंतर भोगावा लागतो. आताच तुम्ही अशाप्रकारे कॉझ आणि इफेक्ट बद्दल सांगितले. जर आधी कॉझ नंतर त्याची इफेक्ट असते हे जर आपण तर्कदृष्टीने विचार केला आणि मागे मागे जात राहिलो तर असा प्रश्न पडतो की, सर्वात प्रथम कॉझ कशाप्रकारे आले असेल?
दादाश्री : अनादित प्रथम असे काही नसते ना ! ही गोलाकार माळ पाहिली आहे का तुम्ही? हे सुर्यनारायण फिरतात तर त्याची सुरूवात कुठून करत असतील?
प्रश्नकर्ता : त्यांची सुरूवातच नाही.
दादाश्री : म्हणजे ह्या जगाची सुरूवात कोणत्याही जागी झालेली नाही. पूर्ण गोलच आहे. राउन्डच आहे. पण यातून सुटका आहे. याची बिगिनिंग (सुरुवात) नाही ! आत्मा आहे म्हणून सुटका होऊ शकते. परंतु त्याची बिगिनिंग नाही. सर्वच गोल आहे, प्रत्येक गोष्ट गोल आहे. कोणतीही गोष्ट चौकोनी नाही. चौकोन असेल तर त्याला आपण म्हणू शकलो असतो की ह्या कोपऱ्यापासून सुरूवात झाली आहे आणि ह्या कोपऱ्याला ती संपते. गोल आकारात तर कोपरा नसतोच ? संपूर्ण जगच गोल आहे, यात बुद्धि काम करू शकेल अशी नाही. म्हणून बुद्धिला
Page #29
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
सांगायचे, चूपचाप बस, एका कोपऱ्यात. बुद्धि पोहचू शकेल अशी नाही. ज्ञानानेच समजेल असे आहे.
१६
अंडे पहिले की कोंबडी. मूर्खा, ठेव ना बाजूला. आता हे बाजूला ठेऊन दुसरी पुढची गोष्ट कर ना ! नाही तर पुन्हा पुन्हा अंडे आणि कोंबडी व्हावे लागेल. पण हा त्याला सोडणार नाही. ज्याचे समाधान होत नाही ते सर्व गोल आहे. आपले लोक म्हणतात ना की हा भाऊ गोलगोल गोष्टी फिरवतो !
प्रश्नकर्ता : तरी सुद्धा हा प्रश्न राहतोच की जन्मा अगोदर कर्म कुठून आले? चौऱ्यांशी लाख फेरे सुरू झाले. हे पाप-पुण्य कुठून व केव्हापासून सुरू झाले.
दादाश्री : अनादिपासून.
प्रश्नकर्ता : त्याची काहीतरी सुरूवात तर असेल ना?
दादाश्री : जेव्हापासून बुद्धी सुरू झाली ना तेव्हापासून सुरूवात झाली आणि बुद्धी जेव्हा संपते तेव्हा तेथे पूर्ण होते, समजले ना? बाकी आहे तर अनादिपासून !
प्रश्नकर्ता : ही जी बुद्धी आहे ती कोणी दिली?
दादाश्री : कोण देणारा आहे? वरिष्ठ कोणीच नाही ना ! वरिष्ठ दुसरा कुणीही नाही. कोणी देणारा असेल तर मग तो वरिष्ठ झाला. वरिष्ठ ठरला म्हणजे तो कायम आपल्या माथी राहील. मग जगात मोक्ष उरणारच नाही. जेथे वरिष्ठ असेल तेथे मोक्ष असेल का?
प्रश्नकर्ता: परंतु सर्वात पहिले कोणते कर्म झाले ? ज्याच्यामुळे हे शरीर मिळाले?
दादाश्री : हे शरीर तर कोणीही दिलेले नाही. ही सर्व सहा तत्त्वे एकत्र आल्यामुळे, ते समोरासमोर जोडले गेल्यामुळे 'त्याला' ह्या सर्व अवस्था उत्पन्न झाल्या आहेत. अर्थात शरीर मिळालेले ही नाही. हे तर तसे तुम्हाला दिसते ती चुक आहे. भ्रांतीमुळे तसे दिसते. ही भ्रांती गेली ना, तर
Page #30
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
१७
काहीच उरणार नाही. हे जे तुम्ही 'मी चंदूभाऊ आहे', असे समजता त्यामुळे हे सर्व उभे राहिले आहे.
कर्म एक जन्माचे की अनेक जन्मांचे? प्रश्नकर्ता : ही सर्व जी कर्म आहेत ती एकाच जन्मात भोगून पूर्ण होत नाहीत. म्हणूनच अनेक जन्म घ्यावे लागतात ना, त्याला भोगण्यासाठी. जोपर्यंत कर्म पुर्ण होत नाहीत तोपर्यंत मोक्ष कुठे आहे?
दादाश्री : मोक्षाची गोष्टच कुठे उरली, परंतु त्या जन्माची कर्म जेव्हा पूर्ण होतात तेव्हाच तर देह सुटतो. आणि तोपर्यंत आत नवीन कर्म बांधलीच गेलेली असतात. म्हणजे मोक्षाची गोष्ट करण्यासारखी राहीलीच कुठे? जुनी, दुसरी मागची कर्म येत नाहीत. तुम्ही आता सुद्धा कर्मच बांधत आहात. आता तुम्ही ही गोष्ट करत आहात ना, त्यावेळी सुद्धा पुण्यकर्म बांधत आहात. पुण्यानुबंधी पुण्यकर्म बांधत आहात.
करतो कोण आणि भोगतो कोण? प्रश्नकर्ता : दादा, मागील जन्मात जी कर्म केली ती या जन्मात भोगावी लागतात, तर मागील जन्मात ज्या देहाने भोगले तो देह तर लाकडात जळून गेला, आत्मा तर निर्विकार स्वरूप आहे, तो आत्मा दुसरा देह घेऊन येतो, पण ह्या देहाला मागील देहाने केलेले कर्म कशासाठी भोगायचे?
दादाश्री : त्या देहाने केलेली कर्म तर तो देह भोगून झाल्यानंतरच
संपतो.
प्रश्नकर्ता : तर?
दादाश्री : हे तर (मनात) रेखाटलेले, ते मानसिक कर्म. सूक्ष्म कर्म. म्हणजे ज्याला आपण कॉझल बॉडी म्हणतो ना, कॉझीझ.
प्रश्नकर्ता : बरोबर आहे, पण त्या देहाने भाव केलेले ना? दादाश्री : देहाने भाव केलेले नाहीत. प्रश्नकर्ता : तर?
Page #31
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
दादाश्री : देहाने तर त्याचे स्वत:चे फळ भोगले ना! दोन थोबाडीत मारल्या म्हणजे देहाला फळ मिळूनच जाते. पण जे त्याच्या योजनेत होते तेच आता रूपकमध्ये आले.
प्रश्नकर्ता : हो, पण योजना कोणी केली? त्या देहाने योजना केली
ना?
दादाश्री : देहाला तर काही घेणे-देणे नाही! बस, फक्त अहंकारच करतो हे सर्व.
ह्या जन्माचे ह्या जन्मात? प्रश्नकर्ता : ह्या सर्व कर्मांची फळं आपल्याला ह्या जन्मातच भोगायची की मग पुढील जन्मातही भोगावी लागतात?
दादाश्री : मागच्या जन्मात जे कर्म केले होते, ते योजनेत होते म्हणजे कागदावर लिहिलेली योजना. ते आता रूपक रूपाने येते, फळ देण्यासाठी सन्मुख होते, तेव्हा त्यास प्रारब्ध म्हणतात. किती काळाने परिपक्व होते? तर पन्नास, पंचाहत्तर, शंभर वर्षांनी परिपक्व होत असते, तेव्हा फळ देण्यासाठी सन्मुख होते.
अर्थात मागील जन्मी कर्म बांधले, ते कित्येक वर्षांनी परिपक्व होतात, तेव्हा मग ह्या जन्मात फळ देतात आणि ते फळ देते वेळी जगातील लोक काय म्हणतात की यांनी कर्म बांधले. एका माणसाने एखाद्या व्यक्तीला दोन थोबाडीत मारल्या, त्यावर जगातील लोक काय म्हणतात, की ह्याने कर्म बांधले. कोणते कर्म बांधले? तेव्हा म्हणतात, 'दोन थोबाडीत मारल्या.' त्याला त्याचे फळ भोगावे लागेल. ते (फळ) येथे परत मिळतेच, कारण की थोबाडीत मारल्या, परंतू थोबाडीत खाणारा आज ढिला पडला, पण त्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो वैर वसूल केल्याशिवाय राहणार नाही ना! यालाच लोक म्हणतील की पहा कर्माचे फळ भोगले ना शेवटी! यालाच म्हणतात इथल्या इथे फळ भोगले.' पण आपण त्याला सांगायचे की तुझी गोष्ट खरी आहे. याचे फळ भोगायचे आहे, परंतु त्याने दोन थोबाडीत का मारल्या? ते कोणत्या आधारावर?
Page #32
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
त्याचा आधार (कारण) त्याला सापडत नाही. तो तर म्हणेल की त्यानेच मारले. हे तर त्याला उदयकर्म नाचवते. अर्थात मागे जे कर्म केले आहे, ते नाचवते त्याला.
प्रश्नकर्ता : ही जी थोबाडीत मारली ते कर्माचे फळ आहे, कर्म नाही, हे बरोबर आहे ना?
दादाश्री : होय, ते कर्म फळ आहे. म्हणजे उदयकर्म त्याच्याकडून असे करवित असते म्हणून तो दोन थोबाडीत मारतो. मग तो मार खाणारा काय म्हणतो, की 'भाऊ, अजून एक-दोन लगावून दे ना!' तेव्हा तो काय म्हणेल, 'मला काय अक्कल नाही? मूर्ख आहे का मी!' उलट रागावतो. त्याला जे मारले त्याच्यामागे कारण आहे, दोघांचा हिशोब असतो आणि त्या हिशोबाच्या बाहेर काहीच घडत नाही. अर्थात हे जग हिशोबी आहे, एक एक आणा-पईचा हिशोब आहे म्हणून घाबरण्यासारखे हे जग नाहीच, निवांतपणे झोपून जाण्यासारखे आहे. तरी सुद्धा अगदी नीडर पण होऊ नये की मला काही होणार नाही.
कर्मफळ-लोकभाषेत, ज्ञानींच्या भाषेत प्रश्नकर्ता : सर्व इथल्या इथे भोगायचे आहे असे म्हणतात, ते काय खोटे आहे का?
दादाश्री : भोगायचे इथल्या इथेच आहे पण ते या जगाच्या भाषेत. अलौकिक भाषेत याचा अर्थ काय होतो?
मागील जन्मात कर्म अहंकाराचे, मानाचे बांधलेले असेल, म्हणून या जन्मात त्याच्या सर्व बिल्डिंग बांधल्या जात असतील, तर त्यामुळे तो मानी बनतो. कशामुळे मानी बनतो? कर्माच्या हिशोबाने तो मानी बनतो. आता तो मानी झाला म्हणून त्याला जगातील लोक काय म्हणतात की, हा जो एवढा मान करतो आहे ना त्यामुळे कर्म बांधतो आहे. जगाचे लोक यास कर्म म्हणतात. परंतु भगवंताच्या भाषेत तर हे कर्माचे फळ आले आहे. फळ म्हणजे मान करायचा नसेल तरीही करावाच लागतो, होतोच.
आणि जगातील लोक ज्याला म्हणतात की हा क्रोध करतो, मान
Page #33
--------------------------------------------------------------------------
________________
२०
कर्माचे विज्ञान
करतो, अहंकार करतो, तेव्हा त्याचे फळ इथल्या इथेच भोगावे लागते. मान केल्याचे फळ इथल्या इथे कसे येते की, अपकिर्ती पसरते, अपयश येते, ते इथेच भोगावे लागते. मान करत असताना जर मनात असे वाटत असेल की, हे चुकीचे घडते आहे, असे होऊ नये. आपल्याला मान विलय करायची गरज आहे, असे भाव येत असतील तर ते नवीन कर्म बांधतो आहे. त्यामुळे पुढील जन्मात मग मान कमी होतो.
कर्माची थियरी अशी आहे. चुकीचे करत असताना जर आतील भाव बदलले गेले तर नवीन कर्म नवीन भावाप्रमाणे बांधले जाते. पण जर चुकीचे करून उलट वरून आत खुश होत असेल की, 'असे करण्यासारखेच आहे' तर मग नवीन कर्म मजबूत होते, निकाचित होते. ते मग भोगल्या नंतरच सुटका!
संपूर्ण सायन्सच समजून घेण्यासारखे आहे. वीतरागांचे विज्ञान खूप गुह्य आहे.
...की ह्या जन्माचे पुढील जन्मात? प्रश्नकर्ता : तर काय ह्या जन्मात केलेल्या कर्माचे फळ पुढील जन्मात मिळू शकते?
दादाश्री : हो, ह्या जन्मात मिळत नाही.
प्रश्नकर्ता : तर आता ह्या जन्मात आम्ही जे भोगत आहोत ते मागील जन्माचे फळ आहे का?
दादाश्री : होय, ते मागील जन्माचे आहे आणि त्याच्या सोबत नवे कर्म पुढील जन्मासाठी बांधले जात आहे. म्हणून तुम्ही नवे कर्म चांगले करायला हवे. हे तर आता बिघडलेले आहे पण पुढील बिघडू नये त्यासाठी जागृत रहायला हवे.
प्रश्नकर्ता : आता कलियुग चालू आहे. कलियुगाच्या प्रभावामुळे सध्याचा मनुष्य चांगले कर्म तर करू शकत नाही.
दादाश्री : चांगल्या कर्मांची गरज नाही.
Page #34
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
प्रश्नकर्ता : तर कशाची गरज आहे?
दादाश्री : आत सद्भावनेची गरज आहे. चांगले कर्म तर जर प्रारब्ध चांगले असेल तर होऊ शकेल. नाही तर नाही होऊ शकणार. पण चांगली भावना तर होऊ शकते, जरी प्रारब्ध चांगले नसेल तरीही.
वाईट कर्माचे फळ केव्हा? प्रश्नकर्ता : चांगले किंवा वाईट कर्माचे फळ ह्याच जन्मात किंवा पुढील जन्मात भोगावे लागते, तर तसे जीव मोक्षगती कशाप्रकारे प्राप्त करू शकतील?
दादाश्री : कर्माचे फळ नुकसान करत नाही. कर्माचे बीज नुकसान करतात. मोक्षात जाण्यासाठी कर्मबीज टाकायचे बंद झाले की कर्मफळ त्याला अडथळा निर्माण करू शकत नाही, कर्मबीज अडथळा निर्माण करतात. बीज कशामुळे अडवतात? कारण की तु बीज टाकले आहे म्हणून आता तु त्याचा स्वाद चाखून जा, त्याचे फळ तु चाखून जा. चाखल्याशिवाय जाऊ शकत नाही. अर्थात ते (कर्मबीज) अडवणारे आहेत. बाकी हे कर्मफळ अडवणारे नाहीत. फळ तर म्हणते की तु तुझ्या परीने खाऊन निघून जा.
प्रश्नकर्ता : पण आपण सांगितले होते की, एक टक्का जरी कर्म केले असेल तरी ते भोगावेच लागते?
दादाश्री : होय, भोगल्यानंतरच सुटका, भोगल्या शिवाय चालत नाही. कर्माचे फळ भोगत असतानाही मोक्ष होईल असा सुद्धा मार्ग असतो. परंतु कर्म बांधताना मोक्ष होत नाही. कारण की जर कर्म बांधले जात असतील तर त्याचे फळ खायला अजून रहावे लागेल ना!
प्रश्नकर्ता : आपण जे चांगले वाईट कर्म करतो. ते ह्याच जन्मात भोगायचे असते की पुढील जन्मात.
दादाश्री : लोक पाहतात की याने वाईट कर्म केले. याने चोरी केली, याने फसवणूक केली, याने धोका दिला, हे सर्व इथेच भोगायचे आणि या कर्मामुळेच आत राग-द्वेष उत्पन्न होतात. त्याचे फळ पुढील जन्मात भोगायचे.
Page #35
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
प्रत्येक जन्म मागील जन्माचे सार प्रश्नकर्ता : आता जी कर्म आहेत, ती अनंत जन्मांची आहेत?
दादाश्री : प्रत्येक जन्म, अनंत जन्मांच्या सार रूपाने असतो. सर्व जन्मांचे एकत्र जमा होत नाही. कारण की नियम असा आहे की परिपक्व काळात फळ पिकलेच पाहिजे, नाहीतर कितीतरी कर्म बाकी राहतील.
प्रश्नकर्ता : हे सर्व मागील जन्मासोबत जोडलेले आहे ना?
दादाश्री : हो, त्याचे असे आहे की एका जन्मात दोन कामं करू शकत नाही, कॉझीझ आणि इफेक्ट दोन्ही एकाच वेळी करू शकत नाही. कारण की, कॉझीझ आणि इफेक्ट या दोघांची मुदत एकत्र होणे हे कसे काय शक्य आहे? मुदत पूर्ण झाल्यानंतर कॉझीझ इफेक्टीव होतात. मुदत पूर्ण झाल्याशिवाय हे शक्य होत नाही. जसे की आंब्याचे झाड असते, तर त्याला मोहर आल्या नंतर एवढीशी कैरी येते. तिला पिकण्यास वेळ लागतो की नाही? आपण दुसऱ्या दिवशी ती कैरी लवकर पिकावी असा नवस जरी केला, तरी ती पिकेल का? म्हणजे आपण जे कर्म बांधत असतो त्याला परिपक्व होण्यासाठी शंभर वर्षे हवीत. तेव्हा ते फळ देण्यासाठी सन्मुख होते.
प्रश्नकर्ता : अर्थात् या जन्माचे जे कर्म आहे ते शेवटच्या जन्माचेच असतात की मागील अनंत जन्मांचे असतात?
दादाश्री : नाही, असे नसते या निसर्गाचे. निसर्ग तर खूप शुद्ध आहे. व्यापाऱ्यांना सुद्धा अशी पद्धत जमणार नाही, अशी सुंदर पद्धत आहे! आजपासून दहाव्या जन्मात जी कर्म झाली असतील त्यांचा हिशोब काढून तो नफा-तोटा पुढे खेचून आणला जातो, नवव्या जन्मात. आता त्यात सर्व कर्म येणार नाहीत तर फक्त ताळेबंधी (हिशोब) काढून कर्म येतात. नवव्यामधून आठव्यात, आठव्यामधून सातव्यात. अशा प्रकारे आत जितक्या वर्षांचे आयुष्य असेल तितक्याच वर्षाचे कर्म असतात. पण ते तश्या रूपाने आत येतात, परंतु ते एका जन्माचेच म्हटले जाईल. दोन जन्मांचे एकत्र असे म्हणू शकत नाही.
कर्म असे असतात की ते परिपक्व होण्यासाठी वेळ लागतो. काही
Page #36
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
लोकांचे पाचशे वर्षात, हजार-हजार वर्षात परिपक्व होतात. पण तरी सुद्धा वहीखात्यात ते नवीनच असतात.
प्रश्नकर्ता : कॅरी फोरवर्ड होऊन जातात?
दादाश्री : होय, वहीखात्याची गोष्ट तुम्हाला समजली? जुन्या वहीखात्याचे नवीन वहीखात्यात येतात. आणि आता तो भाऊ नवीन वहीखात्यात येणार, काहीही बाकी राहिल्याशिवाय. अर्थात हे कॉझीझ रूपाने कर्म बांधले जाते ते इफेक्टिव केव्हा होते? पन्नास-साठ - पंच्याहत्तर वर्षे निघून गेल्यानंतर ते फळ देण्यासाठी इफेक्टिव होते.
या सर्वांचा संचालक कोण?
२३
प्रश्नकर्ता : तर हे सर्व कोण चालवतो?
दादाश्री : कर्माचा नियम असा आहे की, तुम्ही जे कर्म करता त्याचा परिणाम आपोआप नैसर्गिक रित्या येतो.
प्रश्नकर्ता : हे कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते. ते कोण नक्की करतो ? कोण भोगायला लावतो ?
दादाश्री : नक्की करण्याची गरजच नाही कर्म ‘इटसेल्फ' (स्वत:च) करत राहतात. आपोआपच होत असते.
प्रश्नकर्ता : तर मग कर्माच्या नियमाला कोण चालवतो ?
दादाश्री : 2 H आणि 0 एकत्र झाल्यामुळे पाऊस पडतो, हा कर्माचा नियम
प्रश्नकर्ता : परंतु कोणीतरी बनविला असेल ना, तो नियम ?
दादाश्री : नियम कोणी बनवत नाही. बनविला तर मग तो मालक ठरेल. कुणालाही बनविण्याची गरज नाही. इटसेल्फ पझल झालेले आहे आणि ते विज्ञानाच्या नियमाने होते. त्याला आम्ही ' ओन्ली सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स' ने हे जग चालते असे म्हणतो. त्यास आम्ही गुजराती मध्ये म्हटले आहे, 'व्यवस्थित शक्ति' जी जगाला चालवते.
Page #37
--------------------------------------------------------------------------
________________
२४
आहे?
कर्माचे विज्ञान
'व्यवस्थित शक्ति' आणि कर्म
प्रश्नकर्ता : आपण जे ‘व्यवस्थित शक्ति' म्हणत आहात ते कर्मानुसार
दादाश्री : जग काही कर्माने चालत नाही. जगाला 'व्यवस्थित शक्ति' चालवते. तुम्हाला येथे कोण घेऊन आले आहे? कर्म? नाही. तुम्हाला ‘व्यवस्थित शक्ति' घेऊन आली आहे. कर्म तर तुमच्या आत पडलेलेच होते. मग ते तुम्हाला काल का नाही घेवून आले आणि आजच का घेऊन आले? 'व्यवस्थित शक्ति' काळाला एकत्र करते. भाव एकत्र करते. सर्वच संयोग एकत्र आले, त्यामुळे तुम्ही येथे आलात. कर्म तर 'व्यवस्थित' चा एक अंश आहे. हे तर संयोग जुळतात तेव्हा म्हणतो, 'मी केले' आणि संयोग जुळत नाही तेव्हा?
फळ मिळते ऑटोमेटिक
प्रश्नकर्ता : कर्माचे फळ जर कोणी दुसऱ्याने दिले तर मग ते कर्मच झाले ना?
दादाश्री : कर्माचे फळ दुसरा कोणी देतच नाही. कर्माचे फळ देणारा कोणी जन्माला आलाच नाही. इथे फक्त ढेकून मारण्याचे औषध प्यायले तर मरूनच जाणार, त्यात फळ देण्यासाठी दुसऱ्या कोणाचीही गरज लागत नाही.
फळ देणारा कोणी असता तर खूप मोठे ऑफीस बनवावे लागले असते. हे तर सायन्टिफिक पद्धतीने चालते. त्यात कोणाची गरजच नाही ! त्याचे कर्म जेव्हा परिपक्व होते तेव्हा फळ येवून उभे राहतेच. स्वत:हून, आपोआप. जसे ह्या कच्च्या कैऱ्या स्वत:हूनच पिकतात ना ! पिकतात की नाही?
प्रश्नकर्ता : हो, हो.
दादाश्री : आंब्याच्या झाडावर पिकत नाही का? ती जशी पिकते ना, तशाच प्रकारे हे कर्म परिपक्व होते. त्याची वेळ येते ना तेव्हा परिपक्व होऊन फळ देण्यास लायक बनते.
Page #38
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
प्रश्नकर्ता : मागच्या जन्मी आम्ही जी कर्म बांधली त्याचे ह्या जन्मात फळ आले, तर कर्माचा हा सगळा हिशोब कोण ठेवतो? त्याची वहीखाते कोण ठेवतो?
दादाश्री : थंडी पडते तेव्हा पाईपच्या आत जे पाणी असते त्याचा बर्फ कोण बनवतो? ते तर थंड वातावरण झाले म्हणून. ओन्ली सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स! हे सर्व कर्म-बिर्म करतात, त्याचे फळ येते तेही एविडन्स आहे. तुला भूक कशामुळे लागते? सर्व सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहे. त्याच्यामुळे हे सर्व चालते!
कर्मफळात 'ऑर्डर' चा आधार प्रश्नकर्ता : कोणत्या ऑडर (क्रम) मध्ये कर्माचे फळ येते? ज्या ऑडरमध्ये ते बांधले गेले असेल, त्याच ऑडरप्रमाणे त्याचे फळ येते? म्हणजे पहिले हे कर्म बांधले गेले, त्यानंतर हे कर्म बांधले गेले, नंतर हे कर्म बांधले गेले. पहिल्या नंबर वर हे कर्म बांधले गेले तर त्याचा डिस्चार्ज पण पहिल्या नंबरवरच येणार. नंतर दुसऱ्या नंबर वर हे कर्म बांधले गेले, तर त्याचा डिस्चार्ज, दुसऱ्या नंबरवरच येणार, असे आहे?
दादाश्री : नाही, असे नाही. प्रश्नकर्ता : तर मग कसे आहे? हे जरा समजावून सांगा.
दादाश्री : नाही, असे नाही. ते सर्व त्याच्या स्वभावाप्रमाणे सेट (मांडणी) होऊन जाते की हे दिवसा भोगण्याचे कर्म, हे रात्री भोगण्याचे कर्म, असे हे सर्व... सेट होऊन जाते. हे दुःखात भोगण्याचे कर्म, हे सुखात भोगण्याचे कर्म, असे सेट होते. अश्या प्रकारे त्याची सर्व मांडणी होते.
प्रश्नकर्ता : ही मांडणी कोणत्या आधारावर होते?
दादाश्री : स्वभावाच्या आधारावर. हे जे आपण सर्व एकत्र जमतो, ते तर सर्वांचे स्वभाव मिळते-जुळते असल्यामुळेच एकत्र जमतो, नाही तर जमणार नाही.
Page #39
--------------------------------------------------------------------------
________________
२६
कर्माचे विज्ञान
केवळ ज्ञानातच हे दिसते
प्रश्नकर्ता : हे कर्म नवे आहे की जुने आहे हे कशा प्रकारे दिसते?
दादाश्री : कर्म केले की नाही केले, हे तर कोणीही पाहू शकत नाही. हे तर भगवंत की ज्यांना केवळज्ञान आहे तेच जाणू शकतात. ह्या जगात जी कर्म तुम्हाला दिसतात, त्यात एका राई एवढे कर्म पण नवीन नाही आहे. ह्या कर्मांचे जर ज्ञाता - दृष्टा राहिलात तर नवे कर्म बांधले जाणार नाही आणि जर तन्मयाकार ( एकाकार) झालात तर नवे कर्म बांधले जातील. आत्मज्ञानी झाल्यानंतरच कर्म बांधली जात नाहीत.
ह्या जगात आत्मा दिसत नाही, कर्मही दिसत नाहीत पण कर्मफळ दिसते. लोकांना कर्मफळ येते तेव्हा त्यात गोडी वाटते म्हणून त्यात तन्मयाकार होतात, त्यामुळे भोगावे लागते.
आता कुठून आले मेले?
प्रश्नकर्ता : पुष्कळ वेळा असे होते की, आपण अशुभ कर्म बांधत असतो आणि त्यावेळी बाहेरील उदय शुभ कर्माचा असतो ?
दादाश्री : हो, असे होत असते. आता तुमचा शुभ कर्माचा उदय असेल पण आत तुम्ही अशुभ कर्म बांधत असाल.
तुम्ही बाहेर गावाहून इथे शहरात आले असाल आणि रात्री उशीर झाला असेल तर आत विचार येतो की आता आपण कुठे झोपणार? मग तुम्ही म्हणता की इथे माझा एक मित्र राहतो, तेथे आपण जाऊया. म्हणजे ते चार जण व पाचवे तुम्ही, साडे अकरा वाजता त्या मित्राच्या घरी जाऊन दरवाजा ठोठावता. तो विचारतो, कोण आहे? तेव्हा तुम्ही सांगता 'मी आहे.' तेव्हा तो म्हणतो, ‘उघडतो.' दरवाजा उघडल्यावर तो तुम्हाला काय म्हणतो? पाच जणांना बघतो, तुम्हाला एकट्याला बघत नाही, तर सोबत चार-पाच जणांना बघतो, त्यावर तुम्हाला काय म्हणेल? 'परत जा' असे म्हणेल का?
‘या या तुमचे स्वागत आहे !' आपल्याकडे तर सर्व खानदानी माणसं, ‘या या स्वागत आहे!' असे बोलुन घरात घेतात.
Page #40
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
२७
प्रश्नकर्ता : तो असे सुद्धा म्हणेल की, 'केव्हा आलात आणि केव्हा परत जाणार आहे?'
दादाश्री : नाही, खानदानी माणसं असे बोलत नसतात. ते तर 'या या स्वागत आहे तुमचे' असे बोलून बसवून घेतात, पण त्यांच्या मनात काय चाललेले असते? की आता कुठून आले मेले! हे बांधले कर्म. तसे करण्याची गरज नाही. ते आले आहेत, त्यांचा हिशोब असेपर्यंत राहणार. नंतर निघून जाणार. त्याने हा जो शहाणपणा केला की, 'आता कुठून आले मेले' ते बांधले कर्म. आता जेव्हा हे कर्म बांधले तेव्हा मला विचारुन घ्यायचे की, 'माझ्याकडून असे घडत असते, त्यावर मी काय करु?' तेव्हा मी सांगेल की, त्यावेळी कृष्ण भगवंताला मानत असाल, किंवा ज्यांना मानत असाल, त्यांचे नांव मनात स्मरुन, हे भगवंता! माझी चुक झाली, अशी चुक पुन्हा करणार नाही', अशा प्रकारे माफी मागाल तर सर्व पुसले जाईल. बांधलेले कर्म लगेचच पुसले जाईल. जो पर्यंत पत्र पोस्टात टाकले जात नाही, तो पर्यंत ते (पत्रातील मजकूर) बदलू शकतो. पोस्टात टाकले अर्थात हा देह सुटला, मग कर्म बांधले गेले. म्हणून हा देह सुटण्यापूर्वी तुम्ही ते सर्व पुसून टाकले तर ते पुसले जाईल. आता त्याने एक कर्म तर बांधले ना?
आणि पुन्हा तो तुम्हाला काय विचारतो? अरे मित्रा, जरा थोडीशी, थोडीशी...? काय विचारतो 'जरा थोडीशी'? म्हणजे चहा किंवा कॉफी असे काहीच स्पष्ट बोलत नाही, पण तुम्ही समजून जाता की, चहासाठी सांगत आहे. पण तो म्हणतो 'जरा थोडी थोडी...' तेव्हा तुम्ही सांगता, आता राहू द्या ना चहा-पाणी! खिचडी-कढी असेल तर चालेल!' तेव्हा आत स्वयंपाकघरात तुमची बायको चिडते. त्यामुळेच सर्व कर्म बांधली जातात. आता त्यावेळी निसर्गाचा नियम आहे की तो पाहुणा हिशोबानुसार आला आहे, त्यामुळे त्याच्यासाठी भाव बिघडवू नका. अशा प्रकारे जर नियमात राहिलात आणि भले जे काही तुमच्याकडे असेल, खिचडी-कढी जे काही असेल ते वाढा. पाहुणे असे म्हणत नाहीत की आम्हाला तुम्ही बासुंदी खायला द्या. खिचडी-कढी, भाजी जे काही असेल ते वाढा. पण मग हा तर स्वत:ची इज्जत जावू नये म्हणून, खिचडी-कढी वाढत नाही, तर शिरा वगैरे वाढतो. पण आत मनात मात्र शिव्या देतो. आता कुठून आले मेले! त्याचे नाव कर्म. अर्थात असे व्हायला नको.
Page #41
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
म्हणून बिघडवू नका भाव कधी प्रश्नकर्ता : पुण्यकर्म आणि पापकर्म कसे बांधले जातात?
दादाश्री : दुसऱ्यांना सुख देण्याचा भाव केल्यामुळे पुण्य बांधले जाते आणि दुःख देण्याचा भाव केल्यामुळे पाप बांधले जाते. मात्र भाव केल्यामुळेच कर्म बांधले जाते, क्रिया केल्याने नाही. क्रियेत तसे असेल किंवा नसेलही, पण आत जसे भाव असतील तसे कर्म बांधले जाते. म्हणून भाव बिघडवू नका.
कोणतेही कार्य स्वार्थ भावनेने केले तर पापकर्म बांधले जाते आणि निःस्वार्थ भावनेने केल्यावर पुण्यकर्म बांधले जाते. पण दोन्हीही कर्मच आहेत ना! पुण्य कर्माचे जे फळ आहे ते म्हणजे सोन्याची बेडी आणि पाप कर्माचे फळ आहे ते म्हणजे लोखंडाची बेडी. पण दोन्ही सुद्धा बेड्याच आहेत ना?
स्थूळकर्म : सुक्ष्मकर्म एका शेठने पन्नास हजार रूपयांचे दान दिले. तेव्हा त्याच्या मित्राने शेठजींना विचारले, 'एवढे पैसे देऊन टाकलेत?' तेव्हा शेठ म्हणाले, 'मी तर एक पैसाही देईल असा नाही. हे तर त्या मेयरच्या दबावामुळे द्यावे लागले.' तर हयाचे फळ तिथे काय मिळेल? पन्नास हजार दान दिले ते स्थूळकर्म. त्याचे फळ त्याला इथल्या इथे मिळून जाते. ते म्हणजे लोक त्या शेठची 'वाह वाह' करून स्तुती करतात. किर्तीचे गुणगान गातात. परंतु शेठने आत, सूक्ष्मकर्मात काय चार्ज केले? तर, 'एक पैसाही देईल असा मी नाही.' त्याचे फळ त्याला पुढील जन्मात मिळेल, तेव्हा पुढील जन्मात शेठ एका पैशाचेही दान देऊ शकणार नाही. आता एवढी सुक्ष्म गोष्ट कोणाला समजेल?
त्या ठिकाणी दुसरा कोणी गरीब असेल, त्याच्याकडे सुद्धा हेच लोक दान मागण्यास गेले असतील, तेव्हा तो गरीब माणूस काय म्हणतो की, 'माझ्या जवळ आता पाचच रूपये आहेत ते सगळेच तुम्ही घ्या. पण आता जर माझ्या जवळ पाच लाख रूपये असते तर ते सर्वच दिले असते.' असे
Page #42
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
तो हृदयापासून सांगतो. आता या गरीबाने पाचच रूपये दान दिले. ते डिस्चार्जमध्ये कर्मफळ आले. पण आत सुक्ष्मात काय चार्ज केले? पाच लाख रूपये देण्याचे, म्हणून तो पुढील जन्मात पाच लाख देऊ शकेल, कर्म डिस्चार्ज होईल तेव्हा.
एक माणूस नेहमी दान देत असेल, धर्माची भक्ति करत असेल, मंदिरात पैसे देत असेल, संपूर्ण दिवस धर्म करत असेल, त्याला जगातील लोक काय म्हणतील की, हा धर्मिष्ठ आहे. आता त्या माणसाच्या मनात काय विचार येत असतात की, कशाप्रकारे (पैसा) जमा करू व कशाप्रकारे उपभोग घेऊ! त्याच्या मनात मात्र बिनहक्काची लक्ष्मी लुटण्याची खुप इच्छा होत असते. बिनहक्काचे विषय विकार भोगून घेण्यासाठी सुद्धा तो तयारच असतो!
म्हणून भगवंत त्याचा एकही पैसा जमा करीत नाहीत. त्याचे काय कारण आहे? त्याचे कारण हेच की, दान-धर्म-क्रिया ही सर्व स्थूळकर्म आहेत. ह्या स्थूळकर्माचे फळ इथल्या इथेच मिळत असते. लोक तर या स्थूळकर्मांनाच पुढील जन्माचे कर्म मानतात. पण त्याचे फळ तर इथल्या इथेच मिळत असते परंतु सुक्ष्मकर्म जे आतमध्ये बांधले जात आहे, त्याची तर लोकांना खबरच नसते. त्याचे फळ पुढील जन्मात मिळते.
आज एखाद्या माणसाने चोरी केली, चोरी केली हे स्थूळकर्म आहे. त्याचे फळ त्याला ह्या जन्मातच मिळते. जसे की, त्याला अपयश मिळते, पोलीसवाला मारतो वगैरे, ते सर्व फळ त्याला इथल्या इथेच मिळणार...
म्हणजे आज जे स्थूळकर्म दिसतात, स्थूळ आचार दिसतात ते 'तिथे' कामी येणार नाही... 'तिथे' तर सुक्ष्मभाव काय आहे? सुक्ष्मकर्म काय आहेत? एवढेच 'तिथे' उपयोगी पडते. आज हे जग संपूर्ण स्थूळकर्मावरच एडजस्ट झालेले आहे.
हे साधु-संन्यासी सर्वजण त्याग करतात, तप करतात, जप करतात, परंतू ही सर्व तर स्थूळकर्म आहेत. त्यात सुक्ष्मकर्म कुठे आहे? हे जे दिसते त्यात पुढील जन्मासाठी सुक्ष्मकर्म नाहीत. ते जे स्थूळकर्म करतात, त्याचे यश त्यांना इथेच मिळून जाते.
Page #43
--------------------------------------------------------------------------
________________
३०
कर्माचे विज्ञान
क्रियेने नाही पण ध्यानानेच चार्जिंग आचार्य महाराज प्रतिक्रमण करतात, सामायिक करतात, व्याख्यान देतात, प्रवचन करतात, पण तो तर त्यांचा आचार आहे, हे स्थूळकर्म आहे. पण आत काय चालू आहे ते पहायचे आहे. आत जे चार्ज होते, ते 'तिथे उपयोगी पडेल. आता जे आचार पालन करतात, ते डिस्चार्ज आहे. संपूर्ण बाह्याचार (बाह्य आचरण) डिस्चार्ज स्वरूपच आहे. तेथे हे लोक म्हणतात की 'मी सामायिक केले, ध्यान केले, दान केले.' तर त्याचे यश तुला इथेच मिळेल. त्यात पुढील जन्माचे काय घेणे-देणे? भगवंत अशी काही कच्ची माया नाही की तुझ्या अश्या घोटाळ्याला चालवून घेतील. बाहेर सामायिक करत असेल आणि आत काहीतरी भलतेच करत असेल.
एक शेठ सामायिक करण्यासाठी बसले होते, तेव्हा बाहेर कोणीतरी दरवाजा ठोठावला. शेठाणीने जाऊन दरवाजा उघडला. तर एक भाऊ आला होता. त्याने शेठाणीला विचारले 'शेठ कुठे गेले आहेत?' तेव्हा शेठाणीने उत्तर दिले 'उकिरड्यावर.' आत बसलेल्या त्या शेठने ते ऐकले व त्यांनी तपास केला तर खरोखर मनाने शेठजी उकिरड्यावरच गेलेले होते! मनात तर खराब विचारच चालू होते, ते सुक्ष्मकर्म आणि बाहेर सामायिक करत होते ते स्थूळकर्म. भगवंत अशा घोटाळ्यांना खपवून घेत नाहीत. आत सामायिक रहात असेल आणि बाहेर सामायिक होत नसेलही तरी, त्याच्या 'तिथे' चालेल. हे बाहेरचे देखावे 'तिथे' चालतील असे नाही.
आत फिरवा भाव असे स्थूळकर्म म्हणजे तुला एकदम राग आला, तेव्हा तुला रागवायचे नसते पण तरी सुद्धा राग येतो. असे होते की नाही होत?
प्रश्नकर्ता : होय, असे होते.
दादाश्री : आता जो राग आला, त्याचे फळ इथल्या इथे ताबडतोब मिळते. लोक म्हणतात की 'जाऊ द्या ना त्याला, तो तर आहेच खुप रागीट.' त्यावर कोणी तर त्याला समोरून थोबाडीत मारतो सुद्धा. म्हणजे अपयशाचे किंवा अश्या दुसऱ्या प्रकारे त्याला इथल्या इथे लगेचच फळ मिळते. म्हणजे
Page #44
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
राग येणे हे स्थूळकर्म आहे, आणि राग आला त्यात आजचा तुझा भाव काय आहे की रागावलेच पाहिजे. तर तो पुढच्या जन्माचा पुन्हा रागाचा हिशोब आहे आणि तुझा आजचा भाव आहे की रागवले नाही पाहिजे. तुझ्या मनात नक्की असेल की रागवायला नकोच, तरी सुद्धा रागावले जात असेल तर तुला पुढील जन्मासाठी बंधन राहिले नाही.
३१
या स्थूळकर्मात तुला राग आला, तर त्याचा तुला या जन्मात मार खावा लागेल. तरी सुद्धा तुला बंधन होणार नाही. कारण सुक्ष्मकर्मात तुझा निश्चय आहे की रागवायला नकोच आणि कोणी माणूस कोणावरही रागवत नसेल, परंतु मनात बोलत असेल की ह्या लोकांवर रागावले तरच सरळ होतील अशी ही माणसं आहेत. त्यामुळे तो पुढच्या जन्मात पुन्हा रागीट बनतो ! अर्थात बाहेर जो क्रोध करतो, ते स्थूळकर्म आहे आणि त्यावेळी आत जे भाव होतात, ते सुक्ष्मकर्म आहे. हे जर समजले तर स्थूळकर्माला काहीही बंधन राहणार नाही! म्हणून हे सायन्स मी नव्या पद्धतीने समोर ठेवले आहे. आतापर्यंत स्थूळकर्माने बंधन आहे अशी मान्यता जगातील लोकांच्या डोक्यात ठासून बसवली गेली आहे आणि त्यामुळे लोक सारखे घाबरत
राहतात.
या ज्ञानाने संसारासहित मोक्ष
आता घरात बायको असेल, लग्न केलेले असेल आणि मोक्षाला जायचे असेल, तर मनात येत राहते की मी लग्न केलेले आहे, तर आता मी मोक्षाला कसे काय जाऊ शकेल? अरे बाबा, बायको नडत नाही, तुझी सुक्ष्मकर्म नडतात. हे तुझे स्थूळकर्म जरा सुद्धा नडत नाही. हे मी उघड करून दिले आहे आणि हे विज्ञान खुले केले नसते, तर आत भीती, भीती आणि भीतीच वाटत राहिली असती. आत सतत अजंपो (बेचैनी, अशांती) राहते. ते साधू म्हणतात की आम्ही मोक्षाला जाऊ. अरे, तुम्ही मोक्षाला कसे काय जाणार आहात? काय सोडले पाहिजे, ते तर तुम्हाला माहित नाही. तुम्ही तर स्थूळ सोडले. डोळ्यांनी दिसते, कानांना ऐकू येते ते सोडले. त्याचे फळ तर या जन्मातच मिळेल. हे विज्ञान नवीनच प्रकारचे आहे, हे तर अक्रम विज्ञान आहे. ज्यामुळे या लोकांना सर्व प्रकारची फेसीलिटी
Page #45
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
(सुविधा) झाली आहे. बायकोला सोडून पळून जाता येते का? अरे बायकोला सोडून पळून जायचे आणि आपला मोक्ष होणार, हे शक्य आहे का? कोणाला दुःख देऊन आपला मोक्ष होणार, हे शक्य आहे का?
म्हणून बायको-मुलांच्या प्रति असलेली सर्वच कर्तव्ये पूर्ण करावी आणि पत्नी जे जेवण वाढेल, ते निवांतपणे जेवा ते सर्व स्थूळ आहे. हे समजून घ्या. स्थूळच्या मागे तुमचा अभिप्राय असा असायला नको की ज्यामुळे सुक्ष्ममध्ये चार्ज होईल. त्यासाठी मी तुम्हाला आज्ञारूपी पाच वाक्ये दिली आहेत. आतमध्ये असा अभिप्राय रहायला नको की हे करेक्ट आहे. मी जे करतो, जे उपभोगतो, ते करेक्ट आहे. आत असा अभिप्राय असायला नको. बस एवढाच तुमचा अभिप्राय बदलला की सर्वच बदलून गेले.
अशाप्रकारे वळवा मुलांना मुलांमध्ये वाईट गुण असले तर आई-वडील त्यांना रागवतात, आणि सांगत फिरतात की 'माझा मुलगा असा आहे, नालायक आहे, चोर आहे.' अरे, तो असे करतो, तर जे केले त्यास बाजूला ठेव. पण आता त्याचे भाव बदल ना! त्याचे आतील अभिप्राय बदल ना! त्याचे भाव कसे बदलावयाचे ते आई-वडीलांना जमत नाही. कारण की सर्टिफाइड आई-वडील नाहीत आणि आई-वडील होऊन बसले आहेत! मुलाला चोरी करण्याची वाईट सवय लागली असेल तर आई-वडील त्याला सारखे रागवत असतात. मारत राहतात. अशाप्रकारे आई-वडील नेहमी एक्सेस (गरजेपेक्षा जास्त) बोलतात. एक्सेस बोललेले हेल्प करत नाही. मग मुलगा काय करतो? तो मनात नक्की करतो की 'वाटेल ते बोलू दे', मी तर असेच करणार. तर अशाप्रकारे आई-वडील मुलांना आणखीन जास्त चोर बनवतात. द्वापार, त्रेता आणि सत् युगात जी हत्यारं होती, त्याचा वापर आजच्या कलियुगातील लोक करु लागले. मुलाला वळवायची पद्धत वेगळी आहे. त्याचे भाव बदलायचे आहेत. त्याच्यावर प्रेमाने हळूवार हात फिरवून त्याला सांगावे की, 'ये बेटा, भले तुझी आई ओरडली, ती ओरडेल, पण तु ज्याप्रकारे कोणाची चोरी केली तशी कोणी तुझ्या खिशातून चोरी केली तर तुला सुख वाटेल का?' त्यावेळी तुला कसे दुःख होईल? तर तसेच समोरच्या व्यक्तिलाही दुःख होत
Page #46
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
नसेल का? याप्रमाणे संपूर्ण थियरी मुलाला समजवावी लागते. एकदा त्याच्या मनात पक्के ठसायला हवे की हे चुकीचे आहे. तुम्ही त्याला सारखे मारत राहता, त्यामुळे तर मुलगा जिद्दी बनतो. अर्थात फक्त पद्धतच बदलावयाची आहे. संपूर्ण जग फक्त स्थूळकर्मालाच समजले आहे. सुक्ष्मकर्माला समजलेच नाही. सुक्ष्माला समजले असते तर ही दशा झाली नसती.
३३
चार्ज आणि डिस्चार्ज कर्म
प्रश्नकर्ता: स्थूळकर्म आणि सूक्ष्मकर्माचे कर्ता वेगवेगळे आहेत का?
दादाश्री : दोन्हीचे कर्ता वेगळे आहेत. हे जे स्थूळकर्म आहेत, ते डिस्चार्ज कर्म आहे. ह्या बॅटऱ्या असतात, त्यांना चार्ज केल्यानंतर त्या डिस्चार्ज होत राहतात ना? आपल्याला डिस्चार्ज करायचे नसले तरी सुद्धा डिस्चार्ज होतच राहते ना?
प्रश्नकर्ता : होय.
दादाश्री : अश्याच प्रकारे हे स्थूळकर्म पण डिस्चार्ज कर्म आहे आणि आत जे नवीन चार्ज होत आहे ते सुक्ष्मकर्म आहे. ह्या जन्मात जे चार्ज होत आहे ते पुढच्या जन्मी डिस्चार्ज होत राहतील आणि ह्या जन्मात मागच्या जन्माची बॅटरी डिस्चार्ज होत राहिली आहे, एक मनाची बॅटरी, एक वाणीची बॅटरी आणि एक देहाची बॅटरी. या तिन्ही बॅटऱ्या आता डिस्चार्ज होतच राहिल्या आहेत आणि आत नवीन तीन बॅटऱ्या भरल्या जात आहेत. हे बोलतो आहे, ते तुला असे वाटेल की, 'मी' च बोलत आहे. पण नाही, ही तर रेकॉर्ड बोलत आहे. ही वाणीची बॅटरी डिस्चार्ज होत राहिली आहे. मी बोलतच नाही आणि संपूर्ण जगातील लोक काय म्हणतील की, 'मी कशी गोष्ट केली, मी कसे बोललो!' हे सगळे कल्पित भाव आहेत, इगोइझम (अहंकार) आहे, फक्त हा इगोइझम गेला तर मग दुसरे काय उरले? हा इगोइझम हीच अज्ञानता आहे आणि हीच भगवंताची माया आहे. कारण की करतो दुसरा कोणीतरी आणि स्वत:ला असे एडजस्टमेंट होते (वाटते) की 'मीच करत आहे. '
Page #47
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
हे सुक्ष्मकर्म जे आत चार्ज होतात, ते नंतर कॉम्प्युटर मध्ये जातात. एक व्यष्टि कॉम्प्युटर आहे आणि दुसरे समष्टि कॉम्प्युटर आहे. सुक्ष्मकर्म प्रथम व्यष्टि कॉम्प्युटरमध्ये जातात आणि तेथून मग समष्टि कॉम्प्युटर मध्ये जातात. नंतर समष्टि काम करत राहते. रियली स्पिकींग, म्हणजे खरोखर 'मी चन्दुभाऊ आहे' असे बोलणे त्यानेच कर्म बांधली जातात. 'मी कोण आहे' एवढेच जरी समजले तर तेव्हापासूनच सर्व कर्मातून सुटला. अर्थात हे विज्ञान सरळ आणि सोपे ठेवले आहे, नाहीतर करोडो उपायांनी सुद्धा एब्सोल्युट होता येइल असे नाही. आणि हे तर पुर्णपणे एब्सोल्युट थियरम आहे.
३४
कर्म-कर्मफळ-कर्मफळ परिणाम
प्रश्नकर्ता : मागच्या जन्मी चार्ज झालेली जी कर्म आहेत, ते या जन्मी डिस्चार्जरूपे येतात. तर या जन्माची जी कर्म आहे, ते या जन्मीच डिस्चार्जरूपाने येतात की नाही ?
दादाश्री : नाही.
प्रश्नकर्ता : तर केव्हा येतात?
दादाश्री : मागच्या जन्मातील जे कॉझीझ आहेत ना ते ह्या जन्माचा इफेक्ट आहे. या जन्माचे कॉझीझ पुढील जन्माचे इफेक्ट आहेत.
प्रश्नकर्ता : पण कित्येक कर्म असेही असतात ना की, जे इथल्या इथे भोगावे लागतात. एक वेळा, आपण असे सांगितले होते.
दादाश्री : हे तर या जगातील लोकांना असे वाटते. जगातील लोकांना काय वाटते? 'हं... बघ, हॉटेलमध्ये खूप खात होता ना त्यामुळे पोटात मुरड पडली.' हॉटेलात नेहमी खात होता, म्हणून त्याने हे कर्म बांधले. त्यामुळे ही पोटात मुरड पडली, असे म्हणतात. तेव्हा 'ज्ञानी' काय सांगतात की तो हॉटेलमध्ये का खात होता? त्याला असे हॉटेलमध्ये खायचे कोणी शिकवले? हे कसे घडले ? संयोग उभे झाले. पूर्वी जी योजना केली होती त्या योजनेचा आता परिणाम आला म्हणून तो हॉटेलमध्ये गेला.
Page #48
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
हॉटेलात जाण्याचे सर्व संयोग एकत्र होतात. त्यामुळे आता सुटायचे असेल तरी सुटू शकत नाही. त्याच्या मनात येते की, अरे ! असं का बरं होत असेल?
३५
तेव्हा येथील भ्रांतिवाल्यांना असे वाटते की, हे काम केले म्हणून हे झाले. भ्रांतिवाले असे समजतात की इथेच कर्म बांधतो आणि इथेच भोगतो. ते असे समजतात. पण ह्याचा शोध घेतला नाही की, त्याला जायचे नसूनही तो कसे बरे जातो? त्याला तर जायचे नसते तरी कोणत्या नियमानुसार तो जातो, तो तर हिशोब आहे.
तर आम्ही अजून अधिक शिकवतो की विनाकारण ह्या मुलांना सारखे मारू नका, ती मुले पुन्हा तसे भाव करणार नाहीत, असे करा. पुन्हा योजना आखणार नाही असे करा. चोरी करणे वाईट आहे... हॉटेलात खाणे हे वाईट आहे... असे ज्ञान त्याला उत्पन्न होईल असे करा. म्हणजे पुढच्या जन्मात पुन्हा असे होणार नाही. हे तर मुलांना मारत च राहतात आणि मुलांना सांगतात, 'बघ हं ! तुला जायचे नाही', तेव्हा त्याचे मन उलटे फिरते की, त्यांना बोलू दे, पण मी तर जाणारच, बस. उलट तो हट्टाला पेटतो आणि त्यामुळेच तर ही उलटी कर्म बांधली जातात ना! आई - वडीलच उलटे
करायला भाग पाडतात.
प्रश्नकर्ता : पूर्वी भाव केले होते म्हणून तो हॉटेलात गेला, आता हॉटेलात गेला, मग तेथे खाल्ले आणि नंतर पोटात मुरड पडली, हे सर्व डिस्चार्ज आहे?
दादाश्री : तो हॉटेलात गेला हे डिस्चार्ज आहे आणि पोटात मुरड पडली तेही डिस्चार्ज आहे. डिस्चार्ज स्वत:च्या ताब्यात राहत नाही, कंट्रोल राहत नाही. आऊट ऑफ कंट्रोल होते.
एक्झेक्ट कर्माची थिअरी कशाला म्हणतात हे जर समजले, तर तो माणूस पुरूषार्थ धर्माला समजू शकेल. जगातील लोक ज्याला कर्म म्हणतात, त्यास कर्माची थिअरी, कर्मफळ असे म्हणतात. हॉटेलमध्ये खाण्याचा भाव होतो. मागील जन्मी कर्म बांधले होते, त्या आधारावर खातो. म्हणजे तिथे
Page #49
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
त्यास कर्म म्हटले जाते. त्या कर्माच्या आधारे या जन्मात हॉटेलमध्ये खाखा करतो. त्यास कर्मफळ आले असे म्हटले जाईल. आणि ही पोटात मुरड पडली, त्यास जगातील लोक कर्मफळ आले असे मानतात. परंतु कर्माची थियरी काय म्हणते की जी पोटात मुरड पडली हा कर्मफळाचा परिणाम आला.
__ वेदांतच्या भाषेत हॉटेलमध्ये खाण्यासाठी आकर्षित होतो ते मागील बांधलेल्या संचित कर्माच्या आधारे आहे. आज हॉटेलात जाण्याची अजिबात इच्छा नाही तरीही हॉटेलात जाऊन खाऊन येतो ते प्रारब्ध कर्म आणि त्याचा पुन्हा या जन्मातच परिणाम येतो आणि पोटात मुरड पडते हे क्रियमाण कर्म.
हॉटेलात खाताना मजा येते त्यावेळीही बीज टाकतो आणि पोटात मुरड पडते तेव्हा ते भोगताना सुद्धा पुन्हा बीज टाकतो. अर्थात कर्मफळाच्या वेळी आणि कर्मफळ परिणामाच्यावेळी, अश्या प्रकारे दोन बीज टाकतो.
संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म प्रश्नकर्ता : हे सर्व मागील जन्माच्या संचितकर्मावर आधारित आहे का?
दादाश्री : असे आहे ना की, संचितकर्म आणि असे इतर सर्व शब्द समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे संचितकर्म, हे कॉझीझ आहेत
आणि प्रारब्धकर्म हे संचित कर्माचा इफेक्ट आहे आणि इफेक्टचे फळ लगेच मिळते, ते क्रियमाणकर्म आणि संचित कर्माचे फळ पन्नास-साठ-शंभर वर्षानंतर त्याचा काळ परिपक्व होतो तेव्हा मिळते.
संचित कर्माचे हे फळ आहे. संचितकर्म फळ देते वेळी संचित म्हटले जात नाही. फळ देते वेळी त्यास प्रारब्धकर्म म्हटले जाते. हेच संचितकर्म जेव्हा फळ देण्यास तयार होतात, तेव्हा ते प्रारब्धकर्म म्हटले जाते. संचित म्हणजे पेटीत ठेवलेली थप्पी. ही जी थप्पी बाहेर काढतो, ते प्रारब्ध. म्हणजे प्रारब्धाचा अर्थ काय आहे की, जे फळ देण्यास सन्मुख झाले ते प्रारब्ध आणि फळ देण्यास सन्मुख झाले नाही, अजून तर कितीतरी
Page #50
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
३७
काळानंतर फळ देईल, तो पर्यंत ते सर्व संचित. संचित सर्व पडून राहिलेले असतात. हळू हळू कालांतराने जसे जसे परिपक्व होत असतात, तस तसे ते फळ देतात.
आणि क्रियमाण तर डोळ्यांनी दिसते, पाच इन्द्रियांनी अनुभवता येते ते क्रियमाणकर्म. अश्या तीन प्रकारे कर्म ओळखली जातात. लोक म्हणतात बघा ना याने तर दोन थोबाडीत मारल्या. थोबाडीत मारणाऱ्याला पाहतात, थोबाडीत खाणाऱ्याला पाहतात, ते क्रियमाण कर्म आहे. आता क्रियमाणकर्म म्हणजे काय? फळ देण्यास जे सन्मुख झाले, ते हे फळ. त्या व्यक्तिला असे फळ आले की दोन थोबाडीत मारल्या गेल्या आणि मार खाणाऱ्याला असे फळ आले की त्याने दोन थोबाडीत खाल्ल्या. आता या क्रियमाणाचे पुन्हा फळ येते. कारण त्या ज्या दोन थोबाडीत मारल्या होत्या ज्यामुळे तो मनात खूणगाठ बांधतो की जेव्हा माझ्या तावडीत सापडेल, त्यावेळी बघून घेईल. म्हणून मग तो नंतर त्याचा बदला घेतो. त्यामुळे पुन्हा असे नवीन बीज पडतच जातात. नवीन बीज तर आत टाकतच जातो. बाकी संचित तर फक्त असेच पडून राहिलेला, स्टॉकमध्ये ठेवलेला माल आहे. पुरूषार्थ ही वस्तु वेगळी आहे. क्रियमाण तर प्रारब्धाचा रिजल्ट आहे, प्रारब्धाचे फळ
आहे.
प्रश्नकर्ता : या पुरुषार्थाला तुम्ही कर्मयोग म्हणता का?
दादाश्री : कर्मयोग समजून घेतले पाहिजे. कर्मयोग जो भगवंतांनी लिहिलेला आहे आणि लोक ज्याला कर्मयोग म्हणतात, ह्या दोन्हींमध्ये आकाश-पाताळ एवढा फरक आहे.
पुरूषार्थ म्हणजे कर्मयोग खरे, पण कसा कर्मयोग? ऑन पेपर योजना, हे कर्मयोग म्हटले जाते. हे कर्मयोग जे झाले, त्याचा मग हिशोब बांधला गेला, त्याच्या फळास संचित म्हटले जाईल आणि संचित जे आहे ते सुद्धा योजनेतच आहे, पण जेव्हा फळ देण्यास सन्मुख होते तेव्हा प्रारब्ध म्हटले जाते. आणि प्रारब्ध जेव्हा फळ देते तेव्हा क्रियमाण उभे रहाते. पुण्य असेल तर चांगले क्रियमाण होतात, पाप येते तेव्हा उलटे क्रियमाण होतात. (मनाविरूद्ध घडते)
Page #51
--------------------------------------------------------------------------
________________
३८
कर्माचे विज्ञान
अजाणतेपणी केलेल्या कर्माचे फळ मिळते का?
प्रश्नकर्ता : जाणून-बुजून केलेल्या गुन्ह्यांचा दोष किती लागतो? आणि अजाणतेपणी केलेल्या चूकांचा दोष किती लागत असेल? अजाणतेपणी केलेल्या चूकांना माफी मिळते ना?
दादाश्री : कोणी असा वेडा नाही की जो असेच माफ करून टाकेल. तुमच्या अजाणतेपणी एखादा व्यक्ति मारला गेला तर कोणी काही रिकामा बसलेला नाही की जो माफ करण्यास येईल. अजाणतेपणी जर विस्तवावर हात पडला तर काय होईल?
प्रश्नकर्ता : जळून जाईल. दादाश्री : ताबडतोब फळ, अजाणतेपणी करा किंवा जाणून बुजून
करा.
प्रश्नकर्ता : अजाणतेपणी केलेल्या दोषांना अशाप्रकारे भोगावे लागते, तर जाणून-बुजून केल्यानंतर किती भोगावे लागेल?
दादाश्री : हो, म्हणून हेच मी तुम्हाला समजवू इच्छितो की, अजाणतेपणी केलेले कर्म, ते कशाप्रकारे भोगायचे? तेव्हा म्हणे, एका माणसाने खूप पुण्यकर्म केले असतील. राजा बनण्याचे पुण्य कर्म केले असतील, पण ते अजाणतेपणी केले होते, समजपुर्वक केलेले नव्हते. लोकांचे पाहून-पाहून त्याने सुद्धा असे कर्म केले. त्यामुळे तो समजल्या शिवाय राजा बनेल, असे कर्म बांधतो. आता तो पाच वर्षाच्या वयात राजगादीवर बसतो. वडील वारले म्हणून, आणि वयाच्या ११ व्या वर्षापर्यंत, म्हणजे सहा वर्षांपर्यंत त्याला राज्य करायचे होते, म्हणून वयाच्या ११ व्या वर्षी तो गादीवरून उतरला. आणि दुसरा माणूस जो वयाच्या २८ व्या वर्षी राजा बनला आणि वयाच्या ३४ व्या वर्षी राज्य सुटले. त्यांच्यापैकी कुणी अधिक सुख उपभोगले? सहा वर्ष दोघांनी राज्य केले.
प्रश्नकर्ता : जो वयाच्या २८ व्या वर्षी आला आणि ३४ व्या वर्षी गेला त्याने.
Page #52
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
:
दादाश्री : त्याने जाणतेपणी पुण्य बांधले होते, त्यामुळे ते जाणतेपणी भोगले. आणि त्या मुलाने अजाणतेपणी पुण्य बांधले होते त्यामुळे अजाणतेपणी भोगले. अर्थात, अजाणतेपणी पाप बांधले गेले, तर अजाणतेपणाने भोगले जाते. आणि अजाणतेपणी पुण्य केले तर अजाणतेपणी भोगले जाते. त्यात मजा येत नाही. हे लक्षात येत आहे ना?
३९
अजाणतेपणी केलेल्या पापा बद्दल मी तुम्हाला समजावतो. या बाजूने दोन झुरळे जात होती, मोठी-मोठी झुरळं आणि ह्या बाजूने दोन मित्र जात होते. तेव्हा त्यातील एका मित्राचा पाय झुरळावर पडला, आणि त्यात ते झुरळ चिरडले गेले आणि दुसऱ्या मित्राने झुरळाला पाहताच त्याला ठेचून ठेचून मारले. दोघांनी काय काम केले?
प्रश्नकर्ता : झुरळांना मारले.
दादाश्री : निसर्गाच्या नियमाप्रमाणे दोघे खुनी मानले जाणार. त्या झुरळांच्या कुटूंबियांनी तक्रार केली की आमच्या दोघांच्या पतींना ह्या मुलांनी मारून टाकले. दोघांचा गुन्हा सारखाच आहे. दोघेही गुन्हेगार खूनी म्हणूनच पकडले गेले. खून करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. पण आता ह्या दोघांना याचे फळ काय मिळते? तेव्हा काय, तर त्या दोघांना दोन थोबाडीत आणि चार शिव्या, अशी सजा झाली. आता ज्याच्याकडून हे सर्व अजाणतेपणी घडले होते, तो माणूस दुसऱ्या जन्मी मजूर बनला होता, आणि त्याला कोणीतरी दोन थोबाडीत मारल्या व चार शिव्या दिल्या. तर त्याने थोडे पुढे जाऊन झटकून दिले. आणि तो दुसरा माणूस पुढील जन्मात गावाचा सरपंच बनला होता, खूप मोठा, अत्यंत चांगला माणूस. त्याला कोणीतरी दोन थोबाडीत मारल्या व चार शिव्या दिल्या, ज्यामुळे तो कितीतरी दिवसांपर्यंत झोपू शकला नाही. किती दिवस भोगले! ह्याने तर जाणूनबुजून मारले होते, आणि मजुराने अजाणतेपणी मारले होते. अर्थात हे सर्व समजून करा. जे पण कराल ना, ती जबाबदारी स्वत: :चीच आहे. यू आर् होल एन्ड सोल रिस्पॉन्सिबल. गॉड इज नॉट रिस्पॉन्सिबल एट ऑल. (तुम्हीच संपूर्णपणे जबाबदार आहात, भगवंत यत्किंचितही जबाबदार नाही)
Page #53
--------------------------------------------------------------------------
________________
४०
कर्माचे विज्ञान
प्रारब्ध भोगल्या नंतरच सुटका प्रश्नकर्ता : मुख्य तर आपलीच कर्म नडतात?
दादाश्री : तर मग दुसरे कोण? दुसरा कोणी करणारा नाही. बाहेरचे कोणी करणारे नाहीत. तुमचीच कर्म तुम्हाला त्रास देतात. शहाणी बायको करुन आणली आणि नंतर ती वेडी झाली. तर ते कोणी केले? ते तर पतीच्याच कर्माच्या उदयाने वेडी होते. म्हणून आपण मनात असे समजून जायचे की माझेच भोग आहेत, माझाच हिशोब आहे आणि मला तो हिशोब फेडून टाकायचा आहे. फसलो रे बाबा फसलो!
स्वतः भोगल्याशिवाय सुटका नाही. प्रारब्ध तर आम्हाला सुद्धा भोगावे लागतेच, सर्वांनाच, महावीर प्रभू सुद्धा भोगत होते. भगवान महावीरांना तर देवलोक त्रास द्यायचे, तेही भोगत होते. मोठ-मोठे देवलोक ढेकूण टाकत होते.
प्रश्नकर्ता : ते त्यांना प्रारब्ध भोगावे लागले ना?
दादाश्री : सुटकाच नाही ना! ते स्वतः समजायचे की जरी हे देवलोक करत असले तरी प्रारब्ध तर माझेच आहे.
कोणत्या कर्माने देहाला दुःख? प्रश्नकर्ता : कोणत्या कर्माच्या आधारावर शरीराचे रोग होतात?
दादाश्री : लुळा-पांगळा होतो ना! हो, हे सर्व काय झाले आहे? ते कशाचे फळ आहे? आपण जर कानाचा दुरूपयोग केला तर कानाला नुकसान होते. डोळ्यांचा दुरूपयोग केला तर डोळे जातात. नाकाचा दुरूपयोग केला तर नाक जाते, जीभेचा दुरूपयोग केला तर जीभ खराब होते. मेंदूचा दुरूपयोग केला तर मेंदू खराब होतो. पायाचा दुरूपयोग केला तर पाय तुटतो, हाताचा दुरूपयोग केला तर हात तुटतो. अर्थात ज्याचा दुरुपयोग केला जातो त्याचे फळ येथे भोगावे लागते.
निर्दोष मुलांनी का भोगायचे? प्रश्नकर्ता : पुष्कळ वेळा असे पाहण्यात येते की, लहान मुलं
Page #54
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
जन्मतः अपंग वगैरे असतात. पांगळे असतात. कितीतरी लहान मुले कुतुबमिनार आणि हिमालय दर्शनाच्या दुर्घटनेत मरून जातात. तर या छोट्या-छोट्या मुलांनी काय पाप केले असेल, म्हणून त्यांच्या सोबत असे घडले?
दादाश्री : पाप केलेच होते, त्याचा हिशोब चुकता झाला. म्हणून दिड वर्षाचा झाल्याबरोबर, आई-वडील आणि सर्वांसोबतचा हिशोब पुर्ण झाला म्हणून निघून गेला. हिशोब चुकता केला पाहिजे. हे हिशोब चुकते करण्यासाठी तर येतात.
प्रश्नकर्ता : आई-वडीलांनी केलेल्या दुष्कृत्याचे फळ देण्यासाठी ते मुल आले होते का?
दादाश्री : आई-वडीलांसोबत जो हिशोब नियोजित आहे, जेवढे दुःख द्यायचे असेल तेवढे दुःख देऊन जातो आणि सुख द्यायचे असेल तर सुख देऊन जातो. जर एक-दोन वर्षाचा होऊन मरुन जातो, तर तो थोडेसेच दुःख देऊन जातो. आणि जर-बावीस वर्षाचा लग्न करून मरतो तर जास्त दुःख देतो. असे घडते की नाही?
प्रश्नकर्ता : असे तर घडते, बरोबर आहे.
दादाश्री : म्हणजे हे दु:ख देण्यासाठी असते आणि कित्येक तर वयाने मोठे होऊन सुख देतात. शेवटपर्यंत, संपूर्ण आयुष्य सुख देतात. हे सर्व सुख आणि दुःख देण्यासाठीच सर्वांचे एकमेकांशी संबंध जोडले गेले आहेत. हे रिलेटीव संबंध आहेत.
आजच्या कुकर्माचे फळ ह्या जन्मातच? प्रश्नकर्ता : हे जे कर्माचे फळ येते, जसे उदाहरणार्थ आपण एखाद्याच्या विवाहात विघ्न आणले. तर मग पुन्हा असेच फळ आपल्याला पुढील जन्मी मिळते का? आपला विवाह होत असताना तोच मनुष्य विघ्न निर्माण करेल का? अशा प्रकारे कर्माचे फळ असते का? अशाच प्रकारे आणि तेवढ्याच डिग्रीचे?
Page #55
--------------------------------------------------------------------------
________________
४२
कर्माचे विज्ञान
दादाश्री : नाही, ह्याच जन्मात मिळते. विवाहात विघ्न आणता, हे तर प्रत्यक्षासारखेच म्हटले जाईल आणि प्रत्यक्षाचे फळ इथेच मिळते.
प्रश्नकर्ता : आपण एखाद्याच्या विवाहात विघ्न आणले, त्या अगोदरच आपला विवाह झालेला असेल, तर मग कुठून फळ मिळेल?
दादाश्री : नाही, हे असेच अशाच प्रकारचे फळ मिळेल, असे नाही. तुम्ही त्याचे जे मन दुखवले, तसेच तुमचे मन दुखवण्याचा मार्ग मिळेल. हे तर कोणाला मुली नसतील तर त्याला कशा प्रकारे फळ मिळेल? लोकांच्या मुलींच्या विवाहात अडचणी आणेल आणि स्वत:ला मुली नसतील तरी ह्या जन्मातच कर्माचे फळ मिळते. ह्या जन्मातच फळ मिळाल्या शिवाय राहत नाही. असे आहे ना, परोक्ष कर्माचे फळ पुढील जन्मात मिळते आणि प्रत्यक्ष कर्माचे फळ ह्या जन्मातच मिळते.
प्रश्नकर्ता : परोक्ष शब्दाचा अर्थ काय? दादाश्री : ज्याची आपल्याला जाणीव होत नाही असे कर्म.
प्रश्नकर्ता : एखाद्या माणसाचे दहा लाख रूपयांचे नुकसान करण्याचा मी भाव केला असेल तर माझे पुन्हा असेच नुकसान होणार का?
दादाश्री : नाही, नुकसान नाही. ते तर दुसऱ्या रूपात तुम्हाला तेवढेच दुःख होईल. जेवढे दुःख तुम्ही त्याला दिले तेवढेच दुःख तुम्हाला मिळेल. मग मुलगा पैसे खर्च करून तुम्हाला दु:खी करेल किंवा अश्या कोणत्याही प्रकारे तेवढेच दु:ख तुम्हाला होईल. तो सर्व हा हिशोब नाही, बाहेरचा हिशोब नाही. म्हणून येथे हे सर्व भिकारी बोलतात ना, रस्त्यात एक भिकारी बोलत होता, 'हे जे आम्ही भीक मागत आहोत, ते तर आम्ही जे तुम्हाला दिलेले तेच तुम्ही आम्हाला परत करत आहात.' तो तर असे उघडपणे बोलतो, 'तुम्ही जे देतात ते आम्ही दिलेले आहे तेच देतात आणि नाही तर आम्ही तुम्हाला देऊ.' असे बोलतात. दोघांपैकी एक तर होईल! नाही, असे नाही. तुम्ही कोणाच्या हृदयाला गारवा पोहोचवला असेल, तर तुमचे हृदयही गार होईल. तुम्ही जर त्याला दुखवले तर तुम्ही सुद्धा दुखावले जाणार, बस एवढेच. हे सर्व कर्म शेवटी राग-द्वेषात जातात. राग-द्वेषाचे
Page #56
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
४३
फळ मिळते. रागाचे (मोह-आसक्तीचे) फळ सुख आणि द्वेषाचे फळ दुःख मिळेल.
प्रश्नकर्ता : हे जे आपण सांगितले की रागाचे फळ सुख आणि द्वेषाचे फळ दु:ख तर ही परोक्ष फळाची गोष्ट आहे की प्रत्यक्ष फळाची?
दादाश्री : निव्वळ प्रत्यक्ष. असे आहे की, रागाने पुण्य बांधले जाते आणि पुण्याने लक्ष्मी मिळाली. आता लक्ष्मी मिळाली परंतु वापरताना पुन्हा दुःख देऊन जाते. म्हणजे हे सगळे सुख जे तुम्ही उपभोगता, हे लोन वर घेतलेले सुख आहे. म्हणून जर परत पेमेन्ट करणार असाल तरच हे सुख घ्या. हो, तरच ह्या सुखाचा स्वाद घ्या नाहीतर स्वाद घेऊ नका. आता तुमची फेडण्याची, पुन्हा पेमेन्ट करण्याची शक्ती नाही म्हणून स्वाद घेणे बंद करून टाका. हे तर सर्व लोनने घेतलेले सुख आहे. कोणत्याही प्रकारचे सुख हे लोनवर घेतलेले सुख आहे.
पुण्याचे फळ सुख, पण सुखही लोनवरचे आणि पापाचे फळ दुःख, दुःखही लोनवरचे. अर्थात् हे सर्व लोनवरील आहे. म्हणून सौदा करायचा नसेल तर करू नका. म्हणून तर पाप आणि पुण्य हेय अर्थात (त्याग करण्या योग्य) मानले आहे.
प्रश्नकर्ता : ह्या अगोदर दिलेले आहे आणि आता परत घेतले, म्हणजे हिशोब चुकता झाला. म्हणून त्याला तर लोनवर घेतलेले असे म्हटले जाणार नाही ना?
दादाश्री : आता जे सुख उपभोगत आहात, ते सर्व परत आलेले नाहीत, तरीही उपभोगत आहात, तर पेमेन्ट करावे लागेल. आता पेमेन्ट कशाप्रकारे करावे लागेल? आंब्यांचा छान रस खाल्ला त्या दिवशी आपल्याला आनंद झाला आणि सुख उत्पन्न झाले. दिवस आनंदात गेला. पण दुसऱ्या वेळी आंबा खराब निघाला, तर तेव्हा तेवढेच दुःख होईल. पण जर यात सुख घेतले नाही, तर ते दुःख येणार नाही.
प्रश्नकर्ता : यात मूर्छा नसेल तर? दादाश्री : तर मग आंबा खाण्यात हरकत नाही.
Page #57
--------------------------------------------------------------------------
________________
४४
कर्माचे विज्ञान
जमवा सासूसोबत सुमेळ प्रश्नकर्ता : सासूसोबत माझा खूप संघर्ष होत असतो. त्यापासून कसे
सुटायचे?
दादाश्री : एकूण एक कर्माची मुक्ति व्हायला हवी. सासू त्रास देत असेल तेव्हा प्रत्येक वेळी कर्मापासून मुक्ति मिळाली पाहिजे. तर त्यासाठी आपण काय केले पाहिजे? सासूला निर्दोष पाहिले पाहिजे, की यात सासूचा काय दोष? माझ्या कर्माच्या उदयामुळे त्या मला भेटल्या आहेत. त्या बिचाऱ्या तर निमित्त आहेत. तर त्या कर्माची मुक्ति झाली, आणि जर सासूचे दोष पाहिले म्हणजे कर्म वाढले, त्यात मग कोण काय करु शकेल? जर समोरच्याचे दोष दिसले तर कर्म बांधली जातात आणि स्वत:चे दोष दिसले तर कर्म सुटतात
__ आपले कर्म बांधले जाणार नाही अशाप्रकारे आपण रहावे. या जगापासून दूर रहावे. हे कर्म बांधले गेले होते म्हणून तर एकत्र जमले आहेत. आपल्या घरात एकत्र कोण जमले आहेत? ज्यांच्यासोबत कर्माचा हिशोब बांधला गेला आहे तेच सर्व एकत्र जमलेले आहेत. आणि मग ते आपल्याला बांधून मारतात सुद्धा! आपण नक्की केलेले असेल की मला त्याच्यासोबत बोलायचे नाही. तरीही समोरची व्यक्ति तोंडात बोटं घालून बोलायला भाग पाडते. अरे, बोटं घालून कशासाठी बोलायला लावतो? याचेच नाव वैर! सर्व मागील वैर! असे कुठेतरी पाहिले आहेस का?
प्रश्नकर्ता : सर्व ठिकाणी तेच पहावयास मिळते ना!
दादाश्री : म्हणूनच मी सांगितले ना की, तिथून बाजूला व्हा आणि माझ्याजवळ या. हे जे मी प्राप्त केले आहे ते मी तुम्हाला देईल, तुमचे (मोक्षचे) काम होऊन जाईल, आणि सुटका होईल. नाहीतर सुटका होणे शक्य नाही.
__ आम्ही कोणाचे दोष काढत नाही, पण नोंद घेतो की, पहा हे जग काय आहे? सर्व प्रकारे मी या जगाला पाहिले, खूप प्रकारे पाहिले. कोणी दोषीत दिसते ही अजून आपली चुक आहे. कधी ना कधी तर निर्दोष
Page #58
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
पहावेच लागेल ना? आपल्या हिशोबानेच आहे हे सर्व. एवढे थोडक्यात जरी समजलात, तरी खूप उपयोगी पडेल.
४५
जिथे आपले चिकट (प्रगाढ ) असेल तेथे आपल्याला चिकट कर्मांचा उदय येईल. आणि ते आपला चिकटपणा सोडवण्यासाठी येतात. सगळाच आपला हिशोब आहे. कोणी शिवी दिली तर तो काय अव्यवहार आहे? व्यवहार आहे. 'ज्ञानी' तर कोणी शिवी दिली तर स्वत: राजी होतात की, बंधनातून मुक्त झालो, तेव्हा अज्ञानी धक्का मारतो ( भांडतो) आणि नवे कर्म बांधतो. समोरचा माणूस शिव्या देतो, तो तर आपल्याच कर्माचा उदय आहे, समोरचा तर निमित्त मात्र आहे. अशी जागृती राहिली तर नवीन कर्म बांधले जाणार नाही. प्रत्येक कर्म त्याच्या निर्जरेचे निमित्त घेऊन आलेले असते. कोणा-कोणाच्या निमित्ताने निर्जरा ( आत्मप्रदेशापासून कर्मांचे वेगळे होणे) होईल हे नक्की असते. उदयकर्मात राग- -द्वेष करायचे नाही, त्याचे नाव धर्म.
स्वतः नेच पाडले अंतराय ?
प्रश्नकर्ता : आपण सत्संगला येत असतो तेव्हा एखादा माणूस अडचण उभी करतो. तर ती अडचण आपल्या कर्मामुळे आहे का?
दादाश्री : होय, तुमची चुक नसेल तर कोणी तुमचे नाव घेणार नाही. तुमच्या चूकांचाच परिणाम आहे. स्वत:नेच बांधलेले अंतराय कर्म आहेत. केलेल्या कर्मांचे सर्व हिशोब भोगायचे आहेत.
प्रश्नकर्ता : ही चुक आपण मागच्या जन्मी केली होती का?
दादाश्री : होय, मागच्या जन्मात.
प्रश्नकर्ता : आताचे माझे वर्तन त्यांच्यासोबत चांगले आहे. तरीही ते म्हणतात की, माझे वर्तन खराब आहे, तर हे मागील जन्माचे आहे का?
दादाश्री : मागील जन्माचे कर्म म्हणजे काय ? योजना रूपी केलेले असते. म्हणजे मनाच्या विचाराने कर्म केलेले असते. ते आता रूपकमध्ये येते आणि आपल्याला ते कार्य करावे लागते. करायचे नसेल तरीही करावेच
Page #59
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
लागते. आपली सुटकाच होऊ शकत नाही. असे कार्य करावे लागते ते मागील योजनाच्या आधारावर करत असतो आणि मग त्याचे फळ पुन्हा भोगावे लागते.
पति-पत्नीचा संघर्ष ढेकूण चावतात, ते तर बिचारे खूप चांगले आहेत पण हा नवरा बायकोला चावतो, बायको नवऱ्याला चावते, हे अतिशय दुःखदायी असते. चावतात की नाही?
प्रश्नकर्ता : चावतात.
दादाश्री : तर हे चावायचे बंद करायचे आहे. ढेकूण चावतात, ते तर चावून निघून जातात बिचारे. आत तृप्त झाले तर निघून जातात. पण पत्नी तर नेहमीच चावत असते. एक जण तर मला सांगत होता की, माझी पत्नी तर मला सापीण सारखी चावते! तर मेल्या, मग लग्न कशाला केले त्या सापीणसोबत? तर हा स्वतः साप नाही का? मुर्खा! अशीच काय सापीण येते? साप असेल तरच सापीण येईल ना!
प्रश्नकर्ता : त्याच्या कर्मात लिहिले असेल म्हणून त्याला भोगावेच लागते. म्हणून ती (पत्नी) चावते, त्यात पत्नीची चुक नाही!
दादाश्री : बस, म्हणजे हे कर्माचे दुःख भोगणे आहे सर्व. म्हणून अशी पत्नी मिळते, असा पती मिळतो, अशी सासू मिळते. नाहीतर या जगात किती चांगल्या चांगल्या सासवा असतात. चांगले पति असतात! पत्नी किती छान असते, आणि आपल्यालाच असे वाकडे का भेटलेत?
हा तर पत्नीसोबत भांडत राहतो. अरे, तुझ्या कर्माचा दोष. म्हणजे आपले लोक निमित्ताला चावायला धावतात. पत्नी, तर निमित्त आहे. निमित्ताला कशासाठी चावतोस? निमित्ताला चावल्यामुळे कोणाचे भले झाले आहे का कधी? वाईट गतीत जातात सर्व. तर लोकांची काय गती होईल, हे सांगितले जात नाही म्हणून तर भीत नाहीत. जर सांगितले ना की, चार पाय आणि वरून शेपूट मिळेल तर लगेच सरळ होतील.
Page #60
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
४७
प्रश्नकर्ता : पति-पत्नी दोघे भांडत असतील, तर याच्यात कोणाचे कर्म खराब समजावे?
दादाश्री : दोघांपैकी जो कंटाळतो त्याचे. प्रश्नकर्ता : यात तर कोणी कंटाळतच नाही, ते तर भांडतच राहतात. दादाश्री : तर मग दोघांचे. नासमजीमुळे हे सर्व होत असते.
प्रश्नकर्ता : आणि जर ही समज आली तर काही दुःखच नाही ना मग!
दादाश्री : हे समजले तर काही दु:खच नाही. हे तर असे आहे की एका मुलाने जर दगड मारला, तर त्याला मारायला धावतो आणि त्याच्यावर खूप रागावतो. रागावतो की नाही? आणि जर डोंगरावरून दगड डोक्यावर पडला आणि रक्त निघाले तर? तर कोणावर रागवेल?
प्रश्नकर्ता : कोणावरच नाही.
दादाश्री : अशाप्रकारे हे आहे. नेहमी जो मारणारा आहे तो निमित्तच आहे, हे तर भान नाही म्हणूनच हा रागावतो! असे जर त्याला निमित्त समजले तर दुःखच नाही!
सुख देऊन सुख घ्या जसे आपण बाभुळीचे झाड लावतो आणि त्याच्यातून आंब्यांची आशा ठेवली तर चालणार नाही ना? जसे पेरतो, तसे फळ मिळते. आपण जसे जसे कर्म केले आहे, तसे फळ आपल्याला भोगायचे आहेत. कोणाला शिवी दिली असेल तर त्या दिवसापासून त्याच्या लक्षातच असते की, केव्हा मला भेटेल आणि केव्हा मी त्याला परत करेन. लोक बदला घेतात, म्हणून असे कर्म करू नका की ज्यामुळे लोक दु:खी होतील. आपल्याला जर सुख हवे असेल तर सुख द्या.
जर कोणी आपल्याला दोन शिव्या दिल्या तर काय करायला हवे? त्या जमा करून घ्याव्यात. पूर्वी आपण दिली आहे, ती परत करुन गेला.
Page #61
--------------------------------------------------------------------------
________________
४८
कर्माचे विज्ञान
जर आवडत असेल तर अजून दोन-पाच शिव्या द्या आणि जर आवडत नसेल तर देऊ नका, नाही तर तो जेव्हा परत करेल तेव्हा सहन होणार नाही. म्हणून तो जे काही देईल ते जमा करून घ्यावे.
ह्या जगात अन्याय होत नाही. अगदी एक क्षणभर सुद्धा न्यायाच्या बाहेर हे जग गेले नाही. म्हणून तुम्ही जर पद्धतशीर रहाल तर तुमचे कोणी नाव घेणार नाही. हो, कोणी दोन शिव्या देण्यासाठी आले, तर घ्याव्या आणि घेऊन जमा करून टाकायच्या आणि सांगायचे की हा हिशोब पूर्ण झाला.
क्लेश, ते नाही उदयकर्म जाणले कोणास म्हटले जाईल, तर घरात मतभेद होत नाही, मनभेद होत नाही, क्लेश-कलह (भांडण-तंटे) होत नाहीत. हे तर महिन्यात एखाद्या दिवशी भांडण होते की नाही होत घरात? मग यास जीवन कसे म्हणावे? यापेक्षा तर आदिवासी चांगल्या प्रकारे जीवन जगतात.
प्रश्नकर्ता : पण उदयकर्माच्या आधीन असेल, तर क्लेश-कलह होणारच ना?
दादाश्री : नाही, क्लेश उदयकर्माच्या आधीन नाही. पण अज्ञानामुळे होत असतात. क्लेश झाल्याने नवे कर्मबीज पडतात. उदयकर्म क्लेशवाले नसतात. अज्ञानतेमुळे स्वत:ला येथे कसे वागायचे, ते समजत नसल्यामुळे क्लेश होत असते.
माझा एक खास मित्र असेल, तो मरण पावला अशी बातमी जर कोणी मला येथे आणून दिली, तर लगेचच हे काय झाले, ज्ञानाने मला त्याचे पृथ:करण होऊन जाते, म्हणून मग मला क्लेश होण्याचे काही कारणच रहात नाही ना! हे तर अज्ञान गोंधळात घालते की माझा मित्र मरून गेला, आणि तेच सर्व क्लेश करवते!
अर्थात क्लेश म्हणजे अज्ञानता. अज्ञानतेने सर्व क्लेश निर्माण होतात. अज्ञानता गेली तर क्लेश बंद होतात.
हे सर्व काय आहे, हे जाणून घ्यायला हवे. साधारणपणे आपल्या
Page #62
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
घरात एक माठ असतो, तो जर मुलाने फोडला तर कोणी क्लेश करत नाही आणि काचेचे एवढे छोटेसे भांडे असेल, ते जर फोडून टाकले तर? नवरा काय म्हणतो बायकोला? तू ह्या मुलाला सांभाळत नाहीस, अरे मेल्या, मग माठासाठी का नाही बोललास? तेव्हा म्हणतो, तो तर डिवॅल्य होता. त्याची किंमतच नव्हती. किंमत नसेल तर आपण क्लेश करत नाही आणि किंमत असेल त्यासाठी क्लेश करत असतो ना! दोन्हीही वस्तु तर उदयकर्माच्या आधीन फुटत असतात ना! पण पहा, आपण माठासाठी क्लेश करत नाही!
एका माणसाचे दोन हजार रूपये हरवले, तर त्याला मानसिक चिंताउपाधी होते. दुसऱ्या एका माणसाचे हरवले तर तो म्हणेल, 'हा कर्माचा उदय असेल तर झाले आता.' म्हणजे अशी समज असेल तर निकाल लावेल, नाही तर क्लेश निर्माण होतो. पूर्वजन्माच्या कर्मात क्लेश नसतात. क्लेश तर आताच्या अज्ञानतेचे फळ आहे.
कित्येक माणसांचे दोन हजार जातात, तरी त्यांना काही फरक पडत नाही. असे घडते की नाही? कोणतेही दुःख उदयकर्माच्या आधीन नसते. सर्व दु:ख आपल्या अज्ञानतेचे आहे.
कित्येक माणसांनी वीमा उतरवलेला नसतो, आणि त्यांचे गोदाम जळून जाते, त्यावेळी ते शांत राहू शकतात, आतून पण शांत राहू शकतात, बाहेर आणि आत दोन्ही प्रकारे आणि कित्येक माणसं तर, आत दुःख आणि बाहेर पण दुःख दाखवतात. ही सर्व अज्ञानता, असमंजसपणा आहे. ते गोदाम तर जळणारच होते. त्यात काही नवीन नाहीच. मग तु डोके फोडून जरी मेलास, तरीही त्यात बदल होणार नाही.
प्रश्नकर्ता : अर्थात् कोणत्याही वस्तुच्या परिणामाला चांगल्या प्रकारे स्वीकारले पाहिजे?
दादाश्री : होय, पॉझिटिव घ्यावे, पण ते ज्ञान असेल तर पॉझिटिव घेईल. अन्यथा बुद्धी तर निगेटिवच पाहते. संपूर्ण जग दु:खी आहे. मासे तडफडतात तसे तडफडत आहे. याला जीवन कसे म्हटले जाईल? समजून
Page #63
--------------------------------------------------------------------------
________________
५०
कर्माचे विज्ञान
घेण्याची आवश्यकता आहे, जीवन जगण्याची कला जाणून घेण्याची गरज आहे. सर्वांचाच मोक्ष होत नाही पण जीवन जगण्याची कला, ही तर असायला पाहिजे ना!
अमंगल पत्र, पोस्टमनचा काय गुन्हा? दुःख सर्व नासमजूतीमुळेच आहे, या जगात ! स्वतः उभे केलेले आहे सर्व, स्वत:ला दिसत नसल्यामुळे! भाजते तेव्हा विचारतो ना की, भाऊ तुम्हाला कसे भाजले? तेव्हा सांगतो, 'चुकून भाजलो, मुद्दाम भाजून घेईल का मी?' असे हे सर्व दु:खं आपल्या चूकांचा परिणाम आहे. चुक निघून गेली की मग झाले.
प्रश्नकर्ता : कर्म चिकट असतात, त्यामुळे आपल्याला दुःख भोगावे लागते का?
दादाश्री : आपणच केलेली कर्म आहेत, म्हणून आपलीच चुक आहे. इतर कोणाचीही चुक या जगात आहेच नाही. इत्तर सर्व तर, निमित्त मात्र आहेत. दुःख तुमचेच आहे. आणि ते समोरच्या, निमित्ताच्या हातून दिले जाते. वडील वारल्याचे पत्र पोस्टमन देऊन गेला, त्यात पोस्टमनचा काय दोष?
पूर्व जन्माचे ऋणानुबंधी प्रश्नकर्ता : आपले जे नातेवाईक असतात किंवा पत्नी असेल, मुले असतील, आज जे आपले नातेवाईक ऋणानुबंधी असतात, त्यांच्यासोबत आपला पूर्वजन्माचा काही संबंध असतो म्हणून एकत्र येतात का?
दादाश्री : खरं आहे, ऋणानुबंधाशिवाय तर काही असतच नाही ना! सर्व हिशोब आहे. एकतर आपण त्यांना दु:ख दिले आहे किंवा त्यांनी आपल्याला दुःख दिलेले आहे. उपकार केले असतील तर त्याचे फळ आता गोड येईल. दुःख दिले असेल, त्याचे फळ कडू येईल.
प्रश्नकर्ता : समजा की आता, मला एखादा व्यक्ती त्रास देत असेल आणि मला दु:ख होत असेल, तर हे जे दुःख मला होत आहे ते तर माझ्याच
Page #64
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
५१
कर्माचे फळ आहे. पण तिच व्यक्ती मला त्रास देते, म्हणजे त्यांनी मागच्या जन्मात माझ्यासोबत असा काही हिशोब बांधला असेल, म्हणून तोच मला त्रास देतो, असे काही आहे का?
दादाश्री : हो, आहे ना, सर्व हिशोब आहे. जेवढा हिशोब असेल तेवढया वेळा दुःख देईल. दोनचा हिशोब असेल तर दोन वेळा दु:ख देईल, तीनचा हिशोब असेल तर तीन वेळा देईल. ही मिरची दुःख नाही का देत?
प्रश्नकर्ता : हो, देते ना.
दादाश्री : तोंडाची आग-आग होते, नाही का? असे आहे हे सर्व. तो स्वतः त्रास देत नाही, पुद्गल देत आहे आणि आपण असे समजतो की तो देत आहे, तो पुन्हा, गुन्हा आहे.पुद्गल दुःख देतो. मिरची दुःख देते, तेव्हा मग कुठे टाकून देता का तिला?
मिरची एखादया दिवशी दुःख देते तेव्हा आपण समजून जायचे की भाऊ यात दोष दुःखी होणाऱ्याचा आहे. मिरची तर तिच्या स्वभावातच आहे.
प्रश्नकर्ता : आपण पण कोणाला त्रास दिला आणि त्याला दुःख झाले, तर काय करावे?
दादाश्री : आपल्याला प्रतिक्रमण करावे लागते. कपडे तर स्वच्छ ठेवावे लागतील ना! मळवायचे कशाला!
सर्वात उत्तम वर्तन, कोणाला किंचितमात्र पण दु:ख होणार नाही असे असायला हवे. तर आता दुःख होत आहे, त्याचे जर आपण प्रतिक्रमण केले तर अंतिम दशा येईल.
कोणी कोणाचे दुःख घेऊ शकतो? प्रश्नकर्ता : एक महान संत दोन वर्षांपूर्वी एका हॉस्पिटलमध्ये खूप वेदना भोगत होते. तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला असे का होत आहे? तर ते म्हणाले की मी खूप लोकांची दु:खं घेतलेली आहेत. म्हणून मला असे होत आहे. असे कोणी करू शकतो का?
Page #65
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
दादाश्री : कोणाचे दुःख कोणी घेऊ शकत नाही. हे तर बहाणे बनवतात, संतांच्या रूपात पूजनीय बनून ! स्वत:च्याच कॉझीझचे हे परिणाम आहेत. हे तर बहाणे बनवतात, स्वत:ची अब्रू राखण्यासाठी. मोठे आलेत दुःख घेणारे! शौचाला जाण्याची शक्ति नाही. ते काय दुःख घेणार होते ! कोणी कोणाचे दुःख घेऊच कसे शकतो?
प्रश्नकर्ता : मी सुद्धा नाही मानत. दुःख घेतलेच जाऊ शकत नाही.
दादाश्री : नाही, नाही! हे तर लोकांना मुर्ख बनवतात. कोणी घेऊच शकत नाही. म्हणजे हे सर्व जण, बहाणे तर बनवणार! तेव्हाच पूजले जातात ! मी तर तोंडावरच सांगून देतो की तुमचे दुःख तुम्हीच भोगत आहात. मग काय बघून असे बोलतात ? मोठे आले दुःख घेणारे.
प्रश्नकर्ता : दुःख देऊ तर शकतो ना?
५२
दादाश्री : तो दुःख घेऊ शकत नाही आणि जो कोणी आपल्याला दुःख देऊ शकतो, तो तर आपला इफेक्ट आहे. देऊ शकतो तो सुद्धा इफेक्ट आहे आणि घेऊ शकतो तो सुद्धा इफेक्ट आहे. इफेक्ट म्हणजे इट हॅपन्स, म्हणजे कोणी कर्ता नाही.
भयंकर रोग, पाप कर्मांमुळे
प्रश्नकर्ता : कोणताही रोग झाल्यामुळे मृत्यु होतो, तेव्हा लोक असे म्हणतात की पूर्व जन्माचे कोणते तरी पाप नडत आहे. ही खरी गोष्ट आहे?
दादाश्री : होय, पापामुळे रोग होतात आणि पाप नसेल तर रोग होत नाहीत. तु एखादया रोग्याला पाहिले आहे का?
प्रश्नकर्ता : माझी आई आताच दोन महिन्यांपूर्वी कॅन्सरने मरण
पावली.
दादाश्री : हे तर सर्व पापकर्माच्या उदयाने घडते. पापकर्माचा उदय असेल तेव्हा कॅन्सर होतो. हे सर्व हार्ट एटेक वगैरे पापकर्मामुळे होत असते. नुसती पापंच बांधली आहेत, या काळाच्या जीवांचा धंदाच हा, संपूर्ण दिवस
Page #66
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
५३
पापकर्मच करत राहतात. भान नाही म्हणून. जर भान राहिले असते तर असे केले नसते!
प्रश्नकर्ता : त्यांनी आयुष्यभर भक्ति केली होती, तरी त्यांना कॅन्सर का झाला?
दादाश्री : भक्ति केली, त्याचे फळ तर आता पुढे येईल, पुढील जन्मात मिळेल. हे मागील जन्माचे फळ आता मिळाले. आणि आता तुम्ही चांगले गहू पेरत आहात तर पुढील जन्मात तुम्हाला (चांगले) गहू मिळतील.
प्रश्नकर्ता : कर्म केल्यामुळे रोग होत असतील, तर ते औषधाने कसे बरे होतात?
दादाश्री : होय. त्या रोगात ते पापच केले आहे ना, ते पाप अजाणतेपणी केले होते. म्हणून ह्या औषधाने आराम मिळतो, आणि मदत होते. जाणून-बुजून केले असेल तर त्यावर औषध वगैरे काही मिळत नाही, औषध मिळतच नाही. अज्ञानतेमुळे करणारी माणसं आहेत, बिचारी! अज्ञानतेमुळे केलेली पापं सोडत नाहीत आणि जाणून-बुजून करणाऱ्यालाही सोडत नाहीत. परंतू अजाणतेपणी करणाऱ्याला थोडी तरी मदत मिळते आणि जाणून-बुजून करणाऱ्याला मिळत नाही.
हे आहेत दुसऱ्यांना त्रास देण्याचे परिणाम प्रश्नकर्ता : शरीराचे सुख-दु:ख आपण भोगत असतो ते व्याधि असेल किंवा असे काहीही येत असेल, ते पूर्वीच्या कोणत्या प्रकारच्या कर्माचे परिणाम असतात?
दादाश्री : यात तर असे आहे, कित्येक लोक समज नसल्यामुळे, मांजराला मारून टाकतात. कुत्र्याला मारून टाकतात, खूप दुःख देतात, हैराण करतात. ते तर दुःख देतात, त्यावेळी स्वत:ला भान नसते की याची जबाबदारी काय येईल? लहान वयात मांजरीच्या पिल्लांना मारून टाकतात. कुर्त्यांच्या पिल्लांना मारून टाकतात आणि दुसरे असे की डॉक्टर बेडकांना कापतात, त्याचे पडसाद त्यांच्या शरीरावर पडणार. जे तुम्ही करत आहात, त्याचेच पडसाद पडतील, हे सर्व पडसाद आहेत.
Page #67
--------------------------------------------------------------------------
________________
५४
कर्माचे विज्ञान
प्रश्नकर्ता : अर्थात् दुसऱ्यांच्या शरीराशी केलेल्या छेडखानीचे पडसाद उमटतात का?
दादाश्री : होय. तेच, कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख देणे, हे तुमच्याच शरीरावर येईल.
प्रश्नकर्ता : म्हणजे त्याने जेव्हा हे सर्व केले असेल, जीवांना चिरले असेल तेव्हा तर तो अज्ञान दशेत असेल ना! त्यावेळी त्याला असा वैरभाव पण नसेल, तरी सुद्धा त्याला भोगावे लागेल?
दादाश्री : चुकून, अज्ञान दशेत आगीत हात पडला ना, तर आग फळ देतेच. म्हणजे कोणीच सोडत नाही. अज्ञान की सज्ञान, जाणतेपणात किंवा अजाणतेपणात, भोगण्याची पद्धत वेगळी असते, परंतु सोडत वगैरे काही नाही! ही सर्व माणसं, जी दुःख भोगत आहेत, तो त्यांचा स्वत:चाच हिशोब आहे सर्व. म्हणून भगवंतांने म्हटले आहे की मन-वचन कायेने अहिंसेचे पालन कर. कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख होणार नाही, असे कर. जर तुला सुखी व्हायचे असेल तर!
प्रश्नकर्ता : कोणी महात्मा असेल तर त्याने डॉक्टर बनू नये का?
दादाश्री : बनले पाहिजे की नाही बनले पाहिजे, ही वेगळी गोष्ट आहे. ते तर त्याच्या प्रकृती अनुसार होतच राहील. बाकी, मनात असा भाव असायला हवा. म्हणजे मग डॉक्टरच्या लाईनमध्ये तो जाऊच शकणार नाही. कोणाला किंचितमात्र दुःख होऊ नये असा ज्याचा भाव आहे, तो मग बेडकाला का मारेल?
प्रश्नकर्ता : दुसऱ्या बाजूला डॉक्टरकी शिकून हजारो लोकांचे रोग दूर करून फायदा पण करतो ना?
दादाश्री : तो जगाचा व्यवहार आहे. त्याला फायदा म्हणत नाही.
मंद बुद्धीवाल्यांना कर्म बंधन कशाप्रकारे? प्रश्नकर्ता : जो चांगला माणूस असेल, तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात, एका मिनिटात कितीतरी विचार करून टाकतो. कर्म
Page #68
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
५५
बांधून टाकतो. आणि मंद बुद्धीवाल्याला तर काही समजच नसते म्हणून त्याला तर असे काही होतच नाही, निर्दोष असतो ना!
दादाश्री : ज्यांना समज आहे, ते समजचे कर्म बांधतात आणि ज्यांना समज नाही ते नासमजीचे कर्म बांधतात. परंतू समज नसलेल्यांचे कर्म खूप जाड असतात आणि समजवाले तर विवेकपूर्ण कर्म बांधतात. म्हणजे समज नसलेल्यांची कर्म जंगली सारखी असतात, जनावरा सारखी, त्याला समजच नसते, भानच नसते, त्यामुळे मग, कोणाला पाहिले की दगड मारण्यास तयार
होतो.
प्रश्नकर्ता : आपण अशा माणसांची दया ठेवायला नको का?
दादाश्री : ठेवायलाच पाहिजे. ज्याला समज नसते, त्याच्या प्रति दया भाव ठेवायला पाहिजे. त्याला काहीतरी मदत केली पाहिजे. मंदबुद्धीमुळे बिचारा तसा करत असतो, त्यात मग त्याचा काय दोष? त्याने जरी दगड मारला, तरी आपण त्याच्याशी वैर ठेवत नाही, त्याच्यावर करूणा ठेवली पाहिजे!
गरीब-श्रीमंत कोणत्या कर्माने? जे घडत असते, त्यासच न्याय मानले तर कल्याण होऊन जाईल.
प्रश्नकर्ता : तर दादा, तुम्हाला असे नाही वाटत की, दोन माणसे असतील, त्यातील एक माणूस बघतो की हा माणूस इतका खराब आहे, तरी पण इतक्या चांगल्या स्थितीत आहे आणि मी इतका धर्मपरायण (धर्मिष्ठ) आहे तरी असा दुःखी आहे. तर त्याचे मन धर्मापासून विमुख होऊन नाही जाणार का?
दादाश्री : असे आहे ना, हा जो दुःखी आहे तसे सर्वच धर्मपरायणवाले दुःखी नसतात. शेकडा पाच टक्के सुखीही असतात.
आज जे दुःख आले आहे, ते आपल्याच कर्माचा परिणाम आहे. आज तो सुखी आहे, आज त्याच्याजवळ पैसे आहेत आणि तो सुख भोगत आहे, हे त्याच्या कर्माचा परिणाम आहे. आणि आता तो जे खराब कर्म करत आहे
Page #69
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
त्याचा परिणाम येईल, तेव्हा तो भोगेल. आता आपण जे चांगले करीत आहोत, त्याचा परिणाम जेव्हा आपल्याला येईल तेव्हा आपण भोगू.
५६
प्रश्नकर्ता : दादा, ही तुमची गोष्ट खरी आहे. पण जर व्यवहारिक दृष्टीने पाहिले की, एक माणूस झोपडपट्टीत रहात असेल, उपाशी असेल, तहानलेला असेल आणि समोर राजवाड्यात एक माणूस रहात असेल. झोपडीवाला पाहतो की माझी दशा अशी का आहे? मी तर इतका प्रामाणिक आहे. नोकरी करतो. तरी माझ्या मुलांना खायला मिळत नाही. आणि हा माणूस तर इतके सारे उलटे काम करतो, तरी सुद्धा तो राजवाड्यात राहतो. तर त्याला राग येणार नाही का? तो कशाप्रकारे स्थिरता ठेऊ शकेल?
दादाश्री : आता जे दुःख भोगत आहे, ते तर पूर्वी जी परीक्षा दिली आहे, त्याचा परिणाम आलेला आहे आणि त्या राज महालात राहणाऱ्याने सुद्धा परीक्षा दिली आहे, त्याचा त्याला हा परिणाम आलेला आहे. तो पास झाला आहे आणि आता पुन्हा त्याची नापास होण्याची लक्षणे उभी झालेली आहेत. आणि ह्या गरीबाची पास होण्याची लक्षणे उभी झाली आहेत.
प्रश्नकर्ता : पण तो गरीब माणूस, त्याची स्वत:ची मानसिक स्थिती जो पर्यंत परिपक्व झाली नसेल तो पर्यंत त्याला कसे समजेल?
दादाश्री : हे त्याला मान्य होतच नाही. म्हणून ह्यात तर तो उलट जास्त पाप बांधतो. त्याने हे समजलेच पाहिजे की हे माझ्याच कर्माचे फळ आहे.
करतो चांगले आणि फळ खराब
प्रश्नकर्ता : आम्ही चांगले करतो पण त्याचे फळ चांगले मिळत नाही. याचा अर्थ असा निघतो की पूर्वजन्मात काही खराब कर्म केले असेल, ते त्याला कॅन्सल करून टाकते.
दादाश्री : होय, कॅन्सल करून टाकते. आम्ही ज्वारी तर पेरली आणि ती मोठी झाली आणि पूर्वजन्माचे आपले खराब कर्म उदयास आले तर शेवटचा पाऊस पडत नाही, म्हणून ज्वारी सुकून जाते, आणि जेव्हा
Page #70
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
५७
पुण्याचा जोर असेल तर तयार होऊन जाते. अन्यथा हातात आलेले पण हिसकावून घेतले जाते. म्हणून चांगले कर्म करा किंवा मग मुक्ति शोधा. दोन्हीपैकी एक मार्ग निवडा! या जगातून सुटण्याचा मार्ग शोधा, किंवा नेहमीसाठी चांगले कर्म करत रहा. पण माणसाला नेहमीसाठी चांगली कर्म करता येत नाहीत, वाम मार्गी चढूनच जातो. कुसंग मिळतच राहतो.
प्रश्नकर्ता : शुभ कर्म आणि अशुभ कर्म ओळखण्याचे थर्मामीटर कोणते?
दादाश्री : शुभ कर्म येते तेव्हा आपल्याला गोडी वाटते, शांती वाटते, वातावरण शांत वाटते आणि अशुभ कर्म येते तेव्हा कटूता उत्पन्न होते, मन बेचैन होते. अयुक्त कर्म तापवते आणि युक्त कर्म हृदयास आनंद देते.
__ मृत्यु नंतर सोबत काय जाते? प्रश्नकर्ता : शुभ आणि अशुभ जे कर्म आहेत, त्याचे जे परिणाम आहेत ते आता दुसऱ्या कोणत्याही योनीत गेले, तेथे त्यांना भोगावे लागते
ना?
दादाश्री : तेथे भोगावेच लागते. येथून मृत्यु होतो तेव्हा मूळ शुद्धात्मा जातो. त्यासोबत संपूर्ण आयुष्यभर जे शुभाशुभ कर्म केले, ते योजनारूपाने, ज्यास कारण शरीर म्हणजे कॉझल बॉडी म्हटले जाते, ते आणि सुक्ष्म बॉडी, म्हणजे इलेक्ट्रिकल बॉडी. हे सर्व सोबत जाणार. दुसरे काहीच जात नाही.
प्रश्नकर्ता : मनुष्य जन्म जो मिळतो, तो पुन्हा पुन्हा मिळत असतो की मग अमुक वेळेसाठी मनुष्यात येऊन पुन्हा दुसऱ्या योनीत त्याला जावे लागते?
दादाश्री : इथूनच सर्व योनीमध्ये जात असतात. आता जवळपास सत्तर टक्के माणसे चार पायात जाणार आहेत. इथून सत्तर टक्के! आणि लोकसंख्या झपाट्याने कमी होईल.
। अर्थात् मनुष्यातून जनावरही होऊ शकतो, देवही होऊ शकतो, नर्कगतीही मिळू शकते आणि पुन्हा मनुष्यही बनू शकतो. जशी कर्म केली
Page #71
--------------------------------------------------------------------------
________________
५८
कर्माचे विज्ञान
असतील त्याप्रमाणे जन्म मिळतो. सध्या लोक पाशवते समान कर्म करत आहेत का?
प्रश्नकर्ता : सध्या तर पुष्कळ लोक पाशवी कर्मच करत आहेत ना!
दादाश्री : तर तिथली टिकिट मिळाली आहे, रिझर्वेशन झालेले आहे. म्हणजे भेसळ करत असेल, बिनहक्काचे खात असेल, उप भोगत असेल, खोटे बोलत असेल, चोऱ्या करत असेल, या सर्वांची निंदा करण्यात अर्थच काय आहे? ती त्यांची टिकीटे त्यांना मिळाली आहेत!
चार गतित भटकंती प्रश्नकर्ता : हे मनुष्य खालच्या योनित जातात खरे?
दादाश्री : मनुष्यातून नंतर तो 'देव' मध्ये, सर्वात मोठा देव बनून उभा राहतो, ह्या जगात टॉपमोस्ट. आणि नीच योनि म्हणजे कशी नीच योनि? घृणास्पद योनित जातो. त्याचे नाव ऐकताच घृणा उत्पन्न होते.
माणूस, मनुष्य जन्मातच कर्म बांधू शकतो. बाकी दुसऱ्या कोणत्याही जन्मात कर्म बांधत नाही. दुसऱ्या सर्व जन्मात तो कर्म भोगतो आणि या मनुष्य जन्मात कर्म बांधतोही खरे आणि भोगतोही खरे, दोन्हीही होतात. मागील कर्म भोगत जातो आणि नवे कर्म बांधत असतो. म्हणजे इथून चार गतित भटकायचे. इथूनच जावे लागते. ह्या गायी-म्हशी हे जे सर्व प्राणी दिसतात, हे देवलोक, त्यांनी फक्त कर्म भोगायचे, त्यांना कर्म करण्याचा अधिकार नसतो.
प्रश्नकर्ता : परंतु अधिकांश मनुष्याचे कर्म तर चांगले नसतातच ना?
दादाश्री : हे तर कलियुग आहे, दुषमकाळ आहे. म्हणून बहुतेक कर्म खराबच होत असतात.
प्रश्नकर्ता : म्हणजे येथे नवीन कर्म बांधले जाणारच ना?
दादाश्री : रात्रं दिवस बांधले जात आहेत. जुने भोगत जातो आणि नवीन बांधत जातो.
Page #72
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
५९
प्रश्नकर्ता : तर आता याच्यापेक्षा दुसरा एखादा चांगला जन्म मिळेल
खरा?
दादाश्री : कुठेच नाही. एवढाच चांगला आहे. दुसरे तर दोन प्रकारचे भव. इथे जर कर्ज झाले असेल, म्हणजे खराब कर्म बांधले गेले असतील, त्यास कर्ज म्हटले जाते. तेव्हा मग या प्राण्यांमध्ये जावे लागते, डेबिट भोगण्यासाठी. डेबिट जास्त झाले असेल तर नर्कगतीत जायचे, मग तेथे कर्ज फेडून म्हणजे डेबिट भोगून पुन्हा परत यायचे. इथे चांगले कर्म केले असतील, तर मोठे, उच्च प्रकारचे मनुष्य बनतात, तेथे संपूर्ण आयुष्य सुख असते. ते भोगून पुन्हा होता तसाचा तसाच आणि नाही तर देवगतित जातो, क्रेडिटचे सुख भोगण्यासाठी. पण क्रेडिट पूर्ण संपले, एक लाख रूपये पूर्ण झाले, खर्च झाले की मग पुन्हा परत इथे!
प्रश्नकर्ता : दुसऱ्या सर्व जन्मांपेक्षा मनुष्य जन्माचे आयुष्य जास्त आहे ना?
दादाश्री : नाही, असे काही नाही. या देवलोकांचे लाखो वर्षांचे आयुष्य असते.
प्रश्नकर्ता : पण देव होण्यासाठी तर जेव्हा ही सर्व कर्म पूर्ण होतील तेव्हा नंबर लागेल ना?
दादाश्री : नाही, असे काही नाही. जर कोणी सुपरह्युमन (महामानव) असेल तर देवच होतो. स्वतःचे सुख स्वतः भोगत नाही आणि दुसऱ्याला देवून टाकतो, त्याला सुपरह्युमन म्हणतात. तो देवगतित जातो!
प्रश्नकर्ता : स्वत:लाच सुख नसेल, तर तो दुसऱ्यांना कशा प्रकारे सुख देऊ शकेल?
दादाश्री : म्हणूनच नाही देऊ शकत ना, पण एखादा असा माणूस असेल, करोडोत एखादा माणूस जो स्वत:चे सुख दुसऱ्यांना देत असेल, तो देवगतित जातो. पूर्वी तर असे पुष्कळ लोक होते. शेकडा दोन-दोन, तीनतीन टक्के, पाच-पाच टक्के होते. आता तर कदाचित करोडोत दोन-चार निघतील. आता तर जरी कोणाला दुःख दिले नाही तरी चांगला म्हटला
Page #73
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
जाईल. दुसऱ्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख दिले नाही तर पुन्हा मनुष्यात येऊ शकेल. मनुष्यात चांगल्या ठिकाणी की, जिथे बंगला तयार असेल, गाड्या तयार असतील, तिथे जन्म होईल आणि पाशवी कर्म करेल, भेसळ करेल, लबाडी करेल, चोऱ्या करेल तर जनावरात जावे लागेल.
प्रश्नकर्ता : तर नियम काय आहे?
दादाश्री : जो अधोगतित जाणारा असेल तो तर पकडला जात नाही आणि जो ऊर्ध्वगतित जातो अशा मनुष्याचे कर्म हलके असतात, तर त्याला लगेचच पोलिसवाल्याकडून पकडवून देतात. त्यामुळे त्याचे पुढे वाम मार्गाला जाण्याचे थांबते आणि त्याचे भाव बदलतात. निसर्ग कोणास मदत करतो? की जो जड आहे, त्याला जड होऊ देतो आणि जो हलका आहे, त्याला हलके होऊ देतो. हलके कर्मवाला ऊर्ध्वगतित जातो, जड कर्मवाला अधोगतित जातो. असे निसर्गाचे नियम आहेत. आता जर एखादी व्यक्ति की ज्याने कधीही चोरी केली नसेल, त्याने जर एखाद्यावेळी चोरी केली, तर तो लगेचच पकडला जातो आणि सराईत चोर पकडला जात नाही. कारण की त्याचे कर्म भारी आहेत म्हणून त्यात पूर्ण मार्क्स पाहिजेत ना ! माइनस मार्क्स सुद्धा पूर्ण हवेत ना ! तरच जग चालेल ना?
मनुष्य जन्मातच बांधली जातात कर्म
प्रश्नकर्ता : म्हणूनच मी विचारतो की मनुष्य जन्माशिवाय दुसरा एखादा असा जन्म आहे की नाही ज्यात कमी कर्म बांधली जात असतील?
६०
दादाश्री : दुसऱ्या ठिकाणी कर्म बांधले जातच नाही. दुसऱ्या कुठल्याही जन्मात कर्म बांधले जात नाही, फक्त इथेच बांधली जातात, आणि जिथे कर्म बांधली जात नाहीत, तेथील लोक काय म्हणतात ? की इथे या जेलमध्ये कशाला आलात? कर्म बांधले जातात अशा जागेस तर मुक्तता म्हटली जाते. आणि ही तर (जिथे कर्म बांधली जात नाही) जेल म्हटले जाईल.
प्रश्नकर्ता : मनुष्यजन्मातच कर्म बांधले जाते. चांगली कर्म पण इथेच बांधली जातात ना?
Page #74
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
दादाश्री : चांगली कर्म पण इथेच बांधली जातात आणि वाईट सुद्धा इथेच बांधली जातात.
हे मनुष्य कर्म बांधत असतात. त्यात जर लोकांना नुकसान करणारे, लोकांना दुःख देणारे कर्म असतील तर ते जनावर गतित आणि नर्कगतित जातात. लोकांना सुख देणारे कर्म असतील तर ते मनुष्यात येतात आणि देवगतित जातात. म्हणजे ते जसे कर्म करतात, त्यानुसार गति होत असते. आता गति झाली म्हणजे ते भोगून झाल्या नंतर पुन्हा इथे यायचे.
कर्म बांधण्याचा अधिकार फक्त माणसालाच आहे, इतर कोणालाही नाही, आणि ज्याला बांधण्याचा अधिकार आहे त्याला चारही गतित भटकावे लागते. आणि जर कर्म नाही केले, बिलकुल कर्मच नाही केले तर मोक्षाला जातो. मनुष्यातून मोक्षाला जाता येते. दुसऱ्या कोणत्याही योनीतून मोक्षाला जाऊ शकत नाही. कर्म करत नाही असे तुम्ही पाहिले का?
प्रश्नकर्ता : नाही, असे पाहिले नाही.
दादाश्री : तुम्ही पाहिले आहेत का कर्म न करणारे? यांनी पाहिले आहेत आणि तुम्ही नाही पहिलेत?!
हे जनावरे वगैरे जे सर्व आहेत ते खातात, पितात, मारामारी करतात, लढतात तरीही त्यांना कर्म बांधली जात नाहीत. अशी माणसांचीही कर्म बांधली जाणार नाही अशी स्थिती शक्य आहे परंतु जर 'स्वतः' कर्माचा कर्ता बनला नाही तर आणि कर्म भोगेल एवढेच! म्हणजे येथे, आमच्याकडे येवून 'सेल्फ रियलायझ' चे ज्ञान (आत्मज्ञान) प्राप्त करून घेतले तर मग त्यांचे कर्माचे कर्तेपण सुटून जाते, करायचेच सुटून जाते, नंतर भोगायचेच राहते. अहंकार असेल तो पर्यंत कर्माचा कर्ता.
आठ जन्मांपर्यंतची शिल्लक सोबत प्रश्नकर्ता : ज्या-ज्या योनीत कर्म बांधली जात नाहीत, फक्त पूर्व कर्मच भोगावी लागतात, तर त्या जीवाचा पुढील जन्म कशाप्रकारे होतो?
दादाश्री : हे इतके सर्व आहे की, माणूस इथून गेला, आणि
Page #75
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
गायीचा जन्म मिळाला, तर गायीचा जन्म भोगेल. तो पूर्ण झाला, त्यानंतर बकरीचा जन्म मिळेल, बकरीचाच जन्म मिळेल असे नाही, वाटेल तो जन्म, त्याचा हिशोब असेल त्याप्रमाणे मिळेल. डिझाइन असेल त्याप्रमाणे मिळेल. नंतर मग, गाढवाचा जन्म मिळेल. शंभर-दोनशे वर्ष असे भटकून येईल. म्हणजे सर्व डेबिट भोगले जाते. नंतर पुन्हा इथे मनुष्य जन्मात परत येतो. इत्तर सर्व ठिकाणी एका जन्मानंतर दुसरा जन्म होतो, तो तिथे कर्म केल्यामुळे होत नाही तर अगोदरचे कर्म भोगले गेले त्यामुळे होतो. हे एक आवरण गेले आणि दुसरे आवरण आले, दुसरे आवरण गेले आणि तिसरे आवरण आले. अशा प्रकारे सर्व आवरण भोगले जातात म्हणजे सर्व आठ जन्म पूर्ण होतात तेव्हा पुन्हा मनुष्य जन्मात येतो. जास्तीत जास्त आठ जन्म इतर गतित भटकून पुन्हा मनुष्यात येऊनच जातो. असा कर्माचा नियम आहे!
जिथे जातो, तिथे मनुष्याच्या लायकीचे कर्म त्याच्याजवळ शिल्लक राहतेच, देवगतित जातो तरीही. म्हणजे शिल्लक असल्यामुळे परत येतो. म्हणजे ही शिल्लक ठेऊन दुसरे सर्व कर्म भोगले जातात.
प्रश्नकर्ता : मनुष्यात येतो, त्या नंतर त्याचे जीवन कशाप्रकारे चालते? त्याचे जसे भाव असतील त्यानुसारच चालते? त्याच्या कोणकोणत्या कर्माच्या आधारावर त्याचे जीवन चालते?
दादाश्री : त्याच्याजवळ मनुष्यजन्माचे कर्म तर शिल्लक आहेच. ही शिल्लक तर आपल्याजवळ आहेच, पण देणे (कर्ज) झाले असेल तर ते भोगून झाल्यानंतर पुन्हा येथे या, असे म्हटले आहे. क्रेडिट झाले असेल तेव्हा क्रेडिट भोगून पुन्हा इथे या. ही शिल्लक तर आहेच आपल्याजवळ. ही शिल्लक कमी पडेल अशी नाही आहे. ही शिल्लक केव्हा सुटते? जेव्हा कर्तापद सुटेल तेव्हा सुटेल. तेव्हा मोक्षाला निघून जातो. अन्यथा कर्तापद सुटणारच नाही ना! अहंकार नष्ट झाला तरच सुटेल. अहंकार असतो म्हणून ती कर्म भोगून पुन्हा इथल्या इथेच येतो.
प्रश्नकर्ता : इतर सर्व योनिमधून पुन्हा मनुष्यात येतो, तर जेव्हा येतो तेव्हा कुठे जन्म घेतो? मासेवाल्यांच्या येथे घेतो की राजाच्या येथे घेतो?
Page #76
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
दादाश्री : इथे मनुष्य योनित स्वतः जवळ जे सामान तयार ठेऊन गेला होता ना, ते आणि दुसरे हे जे कर्ज झाले आहे, ते कर्ज फेडून येतो आणि पुन्हा तिथल्या तिथेच येतो आणि त्या सामानापासून पुन्हा सुरु करतो. अर्थात् आपण जसे बाजारात जातो आणि तेथील सर्व कामं संपवून पुन्हा घरी परततो. त्याचप्रमाणे हे घर आहे. पुन्हा इथल्या इथेच यायचे. इथे हे घर आहे. इथे जेव्हा अहंकार समूळ नष्ट होईल, तेव्हा इथे पण नाही रहायचे. मोक्षाला निघून जायचे बस. इतर जन्मात अहंकार वापरला जात नाही. जिथे भोगायचे आहे, तिथे अहंकार वापरला जात नाही. म्हणून कर्मच बांधले जात नाही. ह्या रेड्याला, गाईला, कुणालाच अहंकार नसतो. दिसते खरे की हा घोडा अहंकारी आहे पण तो डिस्चार्ज अहंकार, खरा अहंकार नाही. खरा अहंकार असेल तर कर्म बांधले जाते. म्हणजे अहंकारामुळे पुन्हा इथे येत असतो. अहंकार जर संपला तर मोक्षाला जातो.
रिटर्न टिकिट घेतली आहे, प्राण्यांतून प्रश्नकर्ता : आपण सांगितले की कर्माचे फळ मिळते, तर हे जे प्राणी आहेत ते पुन्हा मनुष्यात येऊ शकतात का?
दादाश्री : तेच येतात. तेच आता आले आहेत, त्यांची संख्या वाढली आहे आणि तेच भेसळ करत आहेत ही सर्व.
प्रश्नकर्ता : त्या प्राण्यांनी कोणते सत्कर्म केले असतील की ते मनुष्य बनले?
दादाश्री : त्यांना सत्कर्म करावे लागत नाही. मी तुम्हाला समजावतो. एक माणूस कर्जदार झाला म्हणून कर्जबाजारी म्हटला जातो. लोक त्याला कर्जबाजारी म्हणतात; नंतर जर त्याने कर्ज फेडले तर त्याला कर्जबाजारी म्हणतील का?
प्रश्नकर्ता : नाही, मग नाही म्हणत.
दादाश्री : त्याचप्रमाणे इथून प्राण्यांमध्ये जातात ना, ते कर्ज फेडण्यासाठीच. कर्ज फेडून परत इथे येतो आणि जर देवगतित जातो तर क्रेडिट (जमा) भोगून पुन्हा इथेच येतो.
Page #77
--------------------------------------------------------------------------
________________
६४
कर्माचे विज्ञान
असे आमंत्रित करतात अधोगतिस प्रश्नकर्ता : मनुष्याला जनावरांचाच जन्म मिळेल, हे कशाप्रकारे समजेल?
दादाश्री : त्यांची सर्व लक्षणेच सांगत असतात. आताचे त्याचे जे विचार आहेत ना, ते विचारच पाशवतेचे येतात. कसे येतात? कोणाचे भोगून घेऊ, कोणाचे खाऊन टाकू. कोणाचे असे करू? मृत्युच्या वेळी फोटो सुद्धा जनावरांचाच पडतो.
प्रश्नकर्ता : आंब्याची कोय जर आपण पेरली तर आंब्याचेच झाड होते, त्याचप्रमाणे जर मनुष्य मरतो तर मनुष्यातून पुन्हा मनुष्यच बनतो का?
दादाश्री : होय, मनुष्यातून पुन्हा अर्थात या मेटरनीटी वॉर्डमध्ये स्त्रीच्या पोटी कुत्रा जन्माला येत नाही. समजते आहे ना! पण मनुष्यात ज्याला सज्जनतेचे विचार असतात म्हणजे मानवतेचे गुण असतील तर मग पुन्हा तो मनुष्यात येतो. आणि स्वतःच्या हक्काचे जे असेल ते दुसऱ्यास उपभोगण्यासाठी देतो तो देवगतित जातो, तो सुपर ह्युमन म्हटला जातो. स्वत:ची स्त्री भोगण्यास हरकत नाही, ते हक्काचे म्हटले जाते, पण बिनहक्काचे भोगू नये. हे असे जे भोगण्याचे विचार आहेत तेच त्याची मनुष्यातून दुसऱ्या जन्मी जनावरात जाण्याची लक्षणे आहेत. तो व्हिसा आहे. आपण जर त्याचा व्हिसा पाहून घेतला ना, तर माहिती होते.
प्रश्नकर्ता : कर्माचा सिद्धांत असा आहे की, मनुष्याला त्याचे कर्म मनुष्य योनितच भोगावे लागतात?
दादाश्री : नाही. कर्म तर इथल्या इथे भोगायचे आहे. पण जे विचार केलेले असतील की कोणाचे भोगून घेऊ, कोणाचे पळवून घेऊ, की कोणाचे हे करून घेऊ, असे संकल्प-विकल्प केले असतील, ते मग त्याला तिथे घेऊन जातात. केलेली कर्म तर तो इथल्या इथे भोगून घेतो. पाशवी कर्म केले असेल ते तर इथल्या इथे भोगून घेतो. त्यात हरकत नाही. डोळ्यांना दिसेल असे पाशवी कर्म केले असतील ते इथल्या इथेच भोगावे लागतात. ते कशाप्रकारे भोगतो? लोकांमध्ये निंदा होईल, लोकं
Page #78
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
धिक्कारतील. पण जे पाशवी विचार केले, खराब संकल्प - विकल्प केले, की असे करायला हवे, तसे करायला हवे, असे उपभोगायला पाहिजे. अशा योजना केल्या. त्या योजना त्याला जनावरगतित घेऊन जातात. योजना आखतात ना आत ? नाही आखत का? त्या जनावरगतित घेऊन जातात.
६५
यात भोगणारा कोण?
प्रश्नकर्ता : चांगले कर्म केले तर पुण्य बांधले जाते आणि वाईट कर्म केले तर पाप. हे पाप-पुण्य कोण भोगत असतो शरीर की आत्मा ?
दादाश्री : हे पाप-पुण्य जो करत असतो तोच भोगत असतो. कोण भोगतो? अहंकारच करत असतो आणि अहंकारच भोगत असतो. शरीर भोगत नसते आणि आत्मा पण भोगत नसतो. हे अहंकार भोगत असतो. शरीरासोबतचा अहंकार असेल तर शरीरासोबत भोगतो. शरीराशिवाय केलेला अहंकार शरीराशिवाय भोगतो. फक्त मानसिक रूपानेच भोगतो.
प्रश्नकर्ता : मृत्यु नंतर स्वर्ग किंवा नर्क असे काही आहे का? दादाश्री : मृत्यु नंतर स्वर्ग आणि नर्क दोन्हीही आहे.
प्रश्नकर्ता : म्हणजे खराब कर्म केले असतील तर नर्कात कोण जातो? आत्मा जातो का ?
दादाश्री : अरे आत्मा आणि शरीर दोन्ही सोबतच असतात ना ! प्रश्नकर्ता : मरून जातो तेव्हा शरीर तर इथेच सुटून गेलेले असते
ना?
दादाश्री : नंतर तिथे नवीन शरीर बनते. नर्कात वेगळ्या प्रकारचे शरीर बनते, तिथे पाऱ्यासारखे शरीर असते.
प्रश्नकर्ता : तिथे शरीर भोगत असते की आत्मा भोगत असतो?
दादाश्री : अहंकार भोगत असतो. ज्याने नर्कगतिचे कर्म केलेले असते तोच भोगतो.
Page #79
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
हिटलरने कसे कर्म बांधले? हिटलरने ह्या लोकांना मारले, त्याचे फळ का नाही मिळाले? त्याने ज्यांना मारले, ते सर्व एकत्र कशामुळे जमले? त्याला ते प्लेन कुठून मिळाले? हे सर्व एकत्र कुठून झाले? एकत्र जमले तेव्हा मारले म्हणजे ते कर्मफळ होते त्या बिचाऱ्यांचे? त्याचेही फळ पुन्हा नर्कगति येईल. शास्त्रकारांनी पुढे सांगितले आहे की, इथे जे मरून गेले आणि जगात निंदनीय झाले आहेत ते नर्कगतित किंवा जनावरगतित जातील. जगात जर प्रशंसनीय झाले आणि त्यांची किर्ती सर्वत्र पसरली तर ते देवगतित किंवा जास्त झाले तर मनुष्यात जातात! म्हणजे ह्याचे पुन्हा फळ तर येतेच. म्हणजे हे लोकांच्या तराजूने पाहून घ्यावे.
सत्ताधीशचा हिशोब प्रजेसोबत प्रश्नकर्ता : एखाद्या देशाचे सत्ताधीश आहे, म्हणजे त्या देशाचे धर्मगुरू म्हणा, की आज संपूर्ण सत्ता त्यांच्याच हातात आहे. ते त्या देशाचे प्रमुख म्हटले जातात. तर आता लाखो लोक मरत आहेत. जगातील सर्व देशांनी त्याला विनंती केली की तुम्ही ह्याचे समाधान करा. पण तो समाधान करण्यास तयार नाही आणि लाखो लोकांचा संहार होतच आहे. हे कसे कर्म आहे? त्याच्यासोबत लाखो माणसांचा काय ऋणानुबंध आहे?
दादाश्री : ती माणसं तर त्यांचे कर्म भोगत आहे. कर्म बांधत नाही. पण ते सर्व भोगत आहेत.
प्रश्नकर्ता : आणि तो जो, मारत आहे त्याचे? दादाश्री : तो तर कर्म बांधत आहे. तो नर्कगतित जाईल.
प्रश्नकर्ता : हे जे सर्वजण मरत आहेत, त्याचे निमित्त तर मारणारा बनत आहे ना? ते कोणत्या कारणामुळे?
दादाश्री : निमित्त बनत आहे आणि म्हणूनच तर तो नर्कात जाईल.
प्रश्नकर्ता : नर्कात जाईल हे बरोबर आहे. पण हे घडले कशाप्रकारे? कोणत्या हिशोबाने घडले असेल?
Page #80
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
दादाश्री : लोकांचा हिशोब, त्याच्यासोबतचा हिशोब नाही, लोकांनी गुन्हे केले होते त्यामुळे असे निमित्त मिळाले.
६७
लोकांनी गुन्हे केले होते, त्यामुळे असे कोणते तरी निमित्त भेटले आणि त्यांना मारून टाकले. ह्या सर्वांचे कर्म व्यक्तिगत नाही. हे व्यक्तिगत कर्म केव्हा म्हटले जाईल? असे तुम्ही सहज बोलत नसाल आणि तुम्हाला बघून मला आतून उफाळून आले, तर ते झाले व्यक्तिगत, दूर राहून काम झाले त्याला व्यक्तिगत म्हणत नाही.
हे म्हटले जाते सामूहिक कर्मोदय
प्रश्नकर्ता : आता ह्या जगात जे भूकंप होतात आणि ज्वालामुखी फुटतात, हे सर्व कोणती शक्ति करते?
दादाश्री : सर्व 'व्यवस्थित शक्ति. ' व्यवस्थित शक्ति सर्वकाही करते. एविडन्स मिळायला हवेत. सर्व एविडन्स जमले अथवा त्यात जर थोडेसे जरी कच्चे राहिले असेल तर ते ( बाकीचे ) एकत्रीत झाल्यावर लगेच फुटतात जोरात.
प्रश्नकर्ता: हे वादळ, तुफान वगैरे व्यवस्थीत पाठविते का?
दादाश्री : तर दुसरे कोण पाठवणार? हे वादळ तर संपूर्ण मुंबईत असेल, पण बरेच जण विचारतात 'वादळ आले की नाही?' असे विचारतात. ‘अरे मूर्खानो, काय बोलता?' तेव्हा तो म्हणतो, 'आम्ही अजूनपर्यंत पाहिले नाही, वादळ आमच्या येथे आलेच नाही.' हे असे असते सर्व. वादळ मुंबईत सर्वांना स्पर्शत नाही. कोणाला अमुक प्रकारे स्पर्शेल, कोणाचे तर संपूर्ण घरच उडवून टाकते, असे जोरदार एकदम आणि कोणाच्या चटया पडलेल्या असतील, तर त्यांना काही सुद्धा होत नाही. सर्व काही पद्धतीनुसार काम करत आहे. वादळ आले म्हणून काही भिती बाळगण्याची गरज नाही. सर्व 'व्यवस्थित शक्ती' पाठवते.
प्रश्नकर्ता : हे भूकंप होत असतात, सायक्लोन ( वादळ) येते, लढाया होतात, हे सर्व हानि - वृद्धिच्या आधारावर नाही का ?
Page #81
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
दादाश्री : नाही, हे सर्व कर्माच्या उदयाच्या आधारावर आहे. सर्वजण उदय भोगत आहेत. मनुष्यांची वृद्धि होत असेल तरीही भूकंप होत राहतील. जर हानि-वृद्धिच्या आधारावर अवलंबून असेल तर होणार नाही ना?
प्रश्नकर्ता : म्हणजे ज्याला भोगायचे आहे त्याचा उदय का?
दादाश्री : मनुष्याचा उदय, प्राण्यांचा, सर्वांचाच. होय, सामूहिक उदय येतो. पहा ना, हिरोशिमा आणि नागासाकीचा उदय आला होता ना!
प्रश्नकर्ता : ज्याप्रमाणे एका व्यक्तीने पाप केले, त्याप्रमाणे सामूहिक पाप केले तर त्याचा बदला सामूहिक रित्या मिळतो का? एक व्यक्ति स्वतः एकटा चोरी करण्यास गेला आणि दहा व्यक्ति सोबत दरोडा टाकायला गेले, तर त्याचा दंड सामूहिक मिळत असेल का?
दादाश्री : होय. फळ संपूर्ण मिळेल, पण दहाही लोकांना कमीजास्त प्रमाणात. त्यांचे कसे भाव आहेत त्याआधारावर. एखादी व्यक्ति तर असे म्हणत असेल की या माझ्या काकांच्या घरी मला नाईलाजाने जावे लागले, असे त्याचे भाव असेल. म्हणजे जितका स्ट्राँग (मजबूत) भाव आहे, त्यानुसार सर्व हिशोब फेडायचे आहेत. अगदी करेक्ट. धर्मकाट्यासारखे.
प्रश्नकर्ता : पण जे हे नैसर्गिक कोप होत असतील, जसे की एखाद्या ठिकाणी विमान कोसळले आणि इतके जण मारले गेले, तसेच एखाद्या ठिकाणी ज्वालामुखी फुटला आणि दोन हजार लोक मृत्यु पावले. हे त्या सर्वांनी सोबत केलेल्या कर्मांच्या सामूहिक दंडाचा परिणाम असेल का?
दादाश्री : त्या सर्वांचा हिशोब आहे सगळा. फक्त हिशोबवाले त्यात पकडले जातात, दुसरा कोणीही पकडला जात नाही. आज इथून मुंबईला गेला असेल आणि दुसऱ्या दिवशी इथे भूकंप होईल आणि मुंबईवाले तिथून इथे आलेले असतील. ते मुंबईवाले इथे मरून जातात, म्हणजे असा सर्व हिशोब आहे.
प्रश्नकर्ता : म्हणजे आता जे इतके सर्व लोक जिथे-तिथे मरत
Page #82
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
६९
आहेत, दोनशे-पाचशेच्या संख्येत. जे पूर्वी कधीही इतके सर्व समुहात मरत असल्याचे पाहण्यात आले नव्हते तर एवढे सर्व पाप समुहात होत असेल?
दादाश्री : पूर्वी समुह नव्हतेच ना! आता तर लाल झेंडेवाले निघाले तर किती असतील? पांढरे झेंडेवाले किती असतील? हल्ली समुह आहेत म्हणून समुहांचे काम. पूर्वी समुह नव्हतेच ना!
__प्रश्नकर्ता : हं... अर्थात नैसर्गिक कोप, हा समुहाचाच परिणाम आहे ना! हा दुष्काळ पडणे, एखाद्या ठिकाणी खूप पूर येणे, एखाद्या ठिकाणी भूकंप होऊन लाखो लोक मृत्युमुखी पडणे.
दादाश्री : हे सर्व ह्या लोकांचाच परिणाम.
प्रश्नकर्ता : म्हणजे ज्यावेळी दंड मिळायचा असेल, तेव्हा वाटेल तिथून ओढून इथे येऊनच गेला असेल?
दादाश्री : हा निसर्गच त्याला तिथे घेऊन येतो आणि शिजवून टाकतो, शेकून टाकतो. त्याला विमानात आणून विमानाला पाडतो.
प्रश्नकर्ता : हो दादा, अशी उदाहरणे पाहण्यास मिळतात की जो जाणार असेल, तो काही कारणामुळे जात नाही आणि जो कधीही जात नसेल तो त्याचे टिकीट घेऊन विमानात जाऊन बसतो. नंतर विमान पडून तुटते.
दादाश्री : हिशोब आहे सर्व, पद्धतशीर न्याय. अगदी धर्माच्या काट्याप्रमाणे. कारण की त्याचा कोणी मालक नाही, मालक असेल तर अन्याय होईल.
प्रश्नकर्ता : एअर इंडियाचे विमान तुटले, ते सर्वांचे निमित्त होते, ते व्यवस्थीत होते का ? दादाश्री : हिशोबच, हिशोबाशिवाय काही घडत नाही.
पाप-पुण्याचे होत नाही प्लस-माइनस प्रश्नकर्ता : पापकर्म आणि पुण्यकर्माचे प्लस-माइनस (वजाबेरीज) होऊन नेटमध्ये रिझल्ट येतो का, भोगताना?
Page #83
--------------------------------------------------------------------------
________________
७०
कर्माचे विज्ञान
दादाश्री : नाही, प्लस-माइनस होत नाही. पण त्याचे भोगणे कमी करू शकतो. हे जग आहे ना तेव्हापासून प्लस-माइनसचा नियमच नाही. नाहीतर अक्कलवाल्या लोकांनीच फायदा उठवून घेतला असता, कारण की शंभर पुण्य केले आणि दहा पापं केली, तर दहा कमी करून माझे नव्वद पुण्य आहेत ते जमा करून घ्या, असे म्हटले असते. तर अक्कलवाल्यांना सर्वांना तर मजा येईल. हे तर सांगतात, हे पुण्य भोग आणि नंतर ही दहा पापं भोग.
प्रश्नकर्ता : दादा, आमच्याकडून अहंकाराशिवाय कोणतेही सत्कर्म झाले किंवा एखाद्या संस्थेला, हॉस्पिटल इत्यादीला पैसे दिले तर आपल्या (वाईट) कर्मानुसार जे आपल्याला भोगावे लागणार आहे ते कमी होते, ही गोष्ट खरी आहे का?
दादाश्री : नाही, कमी होत नाही. कमी-जास्त होत नाही. त्याने दुसरे कर्म बांधले जातात. दुसरे पुण्याचे कर्म बांधले जाते. पण जर आपण एखाद्याला ठोसा मारून आलो (दुःख दिले) तर त्याचे फळ तर भोगावेच लागते, नाही तर हे सर्व व्यापारी लोक ते पाप कमी करून फक्त नफाच ठेवतील. हे असे नाही. नियम खूप सुंदर आहे. एक ठोसा मारला असेल, तर त्याचे फळ मिळेल. शंभर पुण्यातून दोन पापं कमी होणार नाहीत. दोन पापही राहणार आणि शंभर पुण्यही राहणार. दोन्हीही वेगवेगळे भोगायचे.
प्रश्नकर्ता : म्हणजे हे शुभकर्म करतो आणि अशुभ कर्म करतो, ह्या दोन्हींचे फळ वेगवेगळे मिळते का?
दादाश्री : अशुभला अशुभ फळ देतोच. शुभला शुभ फळ देईल. काहीही कमी-जास्त होत नाही. भगवंताकडे कायदा कसा आहे? की तुम्ही आज शुभ कर्म केले म्हणजे शंभर रूपये दान दिले, तर ते शंभर रूपये जमा करतील आणि एखाद्याला शिवी देऊन पाच रूपयाची उधारी केली, तर ती तुमच्या खात्यामध्ये उधारी लिहतील, ते पंच्याण्णव जमा नाही करणार. ते पाच उधार पण ठेवतात आणि शंभर जमा पण करतात. खूप पक्के आहेत. नाही तर ह्या व्यापारी लोकांना पुन्हा दुःखच नाही मिळणार. असे असेल ना तर जमा-उधार करून त्यांचे जमाच राहिले असते आणि
Page #84
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
७१
मग तर कोणीही मोक्षाला गेलाच नसता. या इथे संपूर्ण दिवस पुण्य आणि पुण्यच असते. मग कोण जाईल मोक्षात? हा कायदाच असा आहे की, शंभर जमाही करतो आणि पाच उधारही करतो. बेरीज-वजाबाकी नाही करत. म्हणून माणसाने जे जमा केले असेल ते परत भोगावे लागते, ते पुण्य सुद्धा आवडत नाही मग, खूप पुण्य जमा केले असेल ना, दहा दिवस, पंधरा दिवस लग्न-समारंभ वगैरे चालू असतात त्यावेळी खाण्यापिण्याची चंगळ होते परंतु शेवटी तेही आवडत नाही, त्याचा कंटाळा येतो. खप पुण्यातही कंटाळा येतो. खूप पापातही कंटाळा येतो. पंधरा दिवसांपर्यंत सेन्ट आणि अत्तरे चोपडत असतील, खूप जेवण खाऊ घालत असतील, तरीही खिचडी खाण्यासाठी घरी पळून जातो. कारण की हे खरे सुख नाही. कल्पित सुख आहे. खऱ्या सुखाचा कधीही अभाव होत नाही. आत्म्याचे जे खरे सुख आहे, त्याचा अभाव कधीच होत नाही. हे तर कल्पित सुख आहे.
कर्मबंधनातून मुक्तिचा मार्ग प्रश्नकर्ता : पुर्नजन्मात कर्मबंधनातून सुटण्याचा मार्ग काय आहे? आम्हाला साधारणपणे असे माहित आहे की, आपण मागील जन्मी चांगले किंवा वाईट सगळे कर्म केलेलेच आहे, तर यापासून सुटका मिळवण्याचा मार्ग कोणता?
दादाश्री : जर एखादा तुला त्रास देत असेल, तर तू आता समजून जायचे की, मागील जन्मात मी त्यांच्यासोबत खराब कर्म केलेले आहेत, त्याचे हे फळ देत आहे. तर तुला शांती आणि समतेत राहून त्याचा निकाल लावायचा आहे. स्वतः शांत राहू शकत नाही आणि पुन्हा तू नवीन बीज टाकतो. अर्थात पूर्वजन्मीचे बंधन सोडण्याचा एकच मार्ग आहे, शांती आणि समता. त्याच्यासाठी खराब विचार सुद्धा यायला नको. आणि माझाच हिशोब मी भोगत आहे असे असायला हवे. तो जे करत आहे, ते माझ्या पापाच्या आधारावरच, मी माझेच पाप भोगत आहे, असे वाटायला पाहिजे, तरच सुटका होईल. आणि खरोखर तुमच्याच कर्माच्या उदयामुळे तो तुम्हाला दुःख देतो. तो तर निमित्तच आहे. संपूर्ण जग निमित्त आहे, दु:ख देणारा,
Page #85
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
रस्त्यातून आपले शंभर डॉलर पळवणारा, सर्वच निमित्त आहेत. तुमचाच हिशोब आहे. तुम्हाला हे पहिल्या नंबरचे बक्षिस कुठून मिळाले? ह्यांना का मिळत नाही? शंभर डॉलर पळवून नेले, त्यास बक्षिस नाही म्हटले जाणार का?
कर्म भोगण्यात, प्रार्थनेचे महत्व प्रश्नकर्ता : दादा, मला असे विचारायचे आहे की जे प्रारब्ध बनून तयार झाले आहे की, कोणी आजारी पडणार आहे किंवा कोणाचे काही नुकसान होणार आहे, तर प्रार्थनेने ते बदलू शकते का?
दादाश्री : असे आहे की, प्रारब्धाचे भाग आहे, प्रारब्धाचे प्रकार असतात. एक प्रकार असा असतो की तो प्रार्थना केल्याने उडून जातो. दुसरा प्रकार असा आहे की तुम्ही जर साधारण पुरूषार्थ केला तर तो उडून जातो, आणि तिसरा प्रकार असा आहे की तुम्ही वाटेल तो पुरुषार्थ केला तरी तो भोगल्याशिवाय सुटकाच होत नाही. खूप चिकट असतो. जसे एखादा माणूस आपल्या कपड्यावर थुकला, त्यास असे धुवायला गेलो आणि ते डाग जर साधे असेल तर पाणी टाकल्यावर धुतले जाईल. परंतु तेच खूप चिकट असेल तर?
प्रश्नकर्ता : निघत नाही.
दादाश्री : अशाच प्रकारे कर्मही चिकट असतात. त्यांना निकाचित कर्म म्हटले आहे.
प्रश्नकर्ता : पण कर्म खूपच चिकट असेल तर प्रार्थनेने त्यावर काहीही फेरफार होत नाही का?
दादाश्री : काहीही बदल होत नाही. पण प्रार्थनेने त्यावेळी सुख वाटते.
प्रश्नकर्ता : भोगण्यासाठी शक्ति मिळते?
दादाश्री : नाही, हे जे तुम्हाला दु:ख आले आहे ना! प्रार्थनेमुळे दु:खात सुखाचा भाग वाटतो. पण प्रार्थना राहू शकेल, हे कठीण आहे. संयोग
Page #86
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
खराब असतील आणि मन जेव्हा बिघडलेले असते त्यावेळी प्रार्थना राहणे कठीण आहे. तेव्हा जर प्रार्थना राहिली तर अति उत्तम म्हटले जाईल. त्यावेळी दादा भगवानांसारख्यांना आठवून बोलवले, की जे स्वतः शरीरात रहात नाही, शरीराचे मालक होत नाहीत, त्यांना जर आठवून बोलावले तर राहू शकते, नाहीतर राहणार नाही.
प्रश्नकर्ता : नाहीतर त्या संयोगात प्रार्थना आठवतच नाही?
७३
दादाश्री : आठवणच येत नाही. आठवणच उडवून देते, सगळे भानच हरपून जाते.
देवी- देवतांच्या नवसाचे बंधन
प्रश्नकर्ता : कोणत्याही देवी-देवतांजवळ नवस केल्याने कर्मबंधन होते का?
दादाश्री : नवस केल्याने कर्मबंधन अवश्य होते. नवस म्हणजे काय की आपण त्यांची मेहरबानी मागितली. म्हणून ते मेहरबानी करतातही, म्हणून तुम्ही त्यांना त्याच्या बदल्यात काहीतरी देतात आणि त्यामुळेच कर्म बांधले जाते.
प्रश्नकर्ता : संत पुरूषाच्या सहवासाने कर्मबंधन सुटतात का ?
दादाश्री : कर्मबंधन कमी होतात आणि पुण्याचे कर्म बांधले जातात पण ते त्याला नुकसान करत नाही. पापाचे बंधन बांधले जात नाही. जागृती कर्मबंधनाच्या समोर...
प्रश्नकर्ता : कर्म बांधले जाणार नाही यासाठी उपाय कोणता ?
दादाश्री : हे सांगितले ना, लगेच भगवंताला असे सांगून द्यावे, की अरेरे! मी असे-असे खराब विचार केले. आता हे जे पाहुणे आले आहेत ते तर त्यांचा हिशोब असेल तोपर्यंत राहतील. पण ' हे आता कुठून आले, मेले!' असे मला वाटले म्हणून मी तो हिशोब बांधला. त्याची मी क्षमा मागतो, पुन्हा असे करणार नाही.
Page #87
--------------------------------------------------------------------------
________________
७४
कर्माचे विज्ञान
प्रश्नकर्ता : एखादी व्यक्ति कुणाचा खून करेल आणि नंतर पुन्हा भगवंताला पश्चाताप करून असे सांगेल, तर कशाप्रकारे कर्म सुटेल?
दादाश्री : होय, सुटेल. खून करून खूश होईल तर खराब कर्म बांधले जातात आणि खून करून असा पश्चाताप केल्याने कर्म हलके होतात!
प्रश्नकर्ता : वाटेल ते करेल तरी कर्म तर बांधलेच गेले ना?
दादाश्री : बांधले जाऊन सुटतही आहे. खून झाला ना, ते कर्म सुटले. त्यावेळी कर्म केव्हा बांधले जाते? तर मनात असे वाटले की, हा खून करायलाच पाहिजे. तर त्यामुळे पुन्हा नवीन कर्म बांधले गेले. हे कर्म पूर्ण सुटले किंवा सुटतेवेळी पश्चाताप केला ना, तर सुटता येईल. मारले, हेच खूप मोठे नुकसान करतो. हे मारले, त्यामुळे अपकिर्ती होईल, शरीरात विविध प्रकारचे रोग उत्पन्न होतील, भोगावे लागतील. इथल्या इथेच भोगायचे. नवीन चिकट कर्म बांधले जाणार नाही. हे कर्मफळ आहे, ते भोगायचे आहे. मारले ते कर्माच्या उदयानेच मारले. आहे आणि मारले म्हणून कर्मफळ भोगावे लागेल. पण हृदयापासून पश्चाताप करेल तर नवीन कर्म ढिले होऊन जातील. मारल्याने नवीन कर्म केव्हा बांधले जाते? की मारायलाच पाहिजे, हे बांधले नवीन कर्म. राजीखुशीने मारले तर चिकट कर्म बांधले जाते आणि पश्चातापपूर्वक केले तर कर्म ढिले होऊन जातात. उल्लासपुर्वक बांधलेले पाप कर्म पश्चातापाने नष्ट होतात.
एका गरीब माणसाला त्याची पत्नी आणि मुले त्रास देत असतील की तुम्ही आम्हाला मांसाहार खाऊ घालत नाही. तेव्हा तो म्हणतो, 'पैसे नाहीत, कुठून खाऊ घालू?' तर ते म्हणतील, 'हरीण मारून आणा.' तर त्याने चूपचाप जाऊन हरीण मारून आणले आणि खाऊ घातले. आता याचा त्याला दोष लागला. आणि तसेच एक राजाचा मुलगा होता, तो शिकार करायला गेला, आणि त्याने हरणाचे शिकार केले पण तो शिकार करून खूश झाला. आता हरीण तर त्या दोघांनीही मारले. ह्याने स्वत:च्या मौज-मजेसाठी मारले आणि त्या गरीब माणसाने खाण्यासाठी मारले. आता जो खात आहे, त्याला त्याचे फळ म्हणून तो मनुष्यातून प्राणी होतो, तो गरीब माणूस! आणि राजकुमार मौजमजेसाठी मारतो, तो खात नाही, समोरच्याला मारून टाकतो.
Page #88
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
स्वत:च्या कुठल्याही फायद्याशिवाय, स्वतःला कुठल्याही प्रकारे फायदा होत नाही आणि नाहक शिकार करून मारून टाकतो. म्हणून त्याचे फळ त्याला नर्कगति येते. कर्म एकच प्रकारचे पण भाव वेगवेगळे. गरीब माणसाला तर त्याची मुले हैराण करीत होती म्हणून बिचाऱ्याने हरणाला मारले. आणि हा राजकुमार तर स्वत:च्या मौजमजेसाठी जीवांना मारतो. शिकार करण्याचा छंद असतो ना! नंतर हरीण तिथल्या तिथे पडून राहिले, त्याचे त्याला काही पडलेले नाही. पण नंतर तो काय म्हणतो? पहा, कसा अचूक निशाणा लावला आणि त्याला खाली पाडले. हे वाहतूकीचे नियम आपण नाही समजलो, तर मग वाहतूकीत समोरासमोर मारूनच टाकतील ना! ते तर सर्वांनाच समजते! परंतु 'हे' समजेल असे नाही आहे, म्हणून आमच्या सारखे शिकवणारे हवेत.
फाशीच्या सजेचे न्यायाधीशाला काय बंधन?
एक न्यायाधीश मला म्हणत होता की, 'साहेब, तुम्ही मला ज्ञान तर दिले, पण मी कोर्टात 'देहांतदंडाची' (फाशीची) शिक्षा द्यावी की नाही?' तेव्हा मी त्याला सांगितले, 'त्याचे काय करणार, फाशीची शिक्षा नाही देणार तर?!' त्यावर तो म्हणाला, 'पण फाशीची शिक्षा दिली तर मला दोष लागेल. '
७५
मग मी त्याला पद्धत शिकवली की, तुम्ही असे म्हणायचे की, 'हे प्रभू, माझ्या वाट्याला असे काम कुठून आले? आणि त्याचे मनापासून प्रतिक्रमण करायचे. आणि दुसरे, सरकारी कायद्याप्रमाणे काम करत रहायचे.'
प्रश्नकर्ता : आम्ही कोणाला दु:ख पोहचवले आणि प्रतिक्रमण करून घेतले, पण त्याला जबरदस्त आघात - ठेच पोहचली असेल तर त्याच्याने कर्मबंधन होणार नाही का ?
दादाश्री : तुम्ही त्याच्या नावाचे प्रतिक्रमण करत रहायचे, आणि त्याला जेवढया प्रमाणात दुःख झाले असेल तेवढया प्रमाणात प्रतिक्रमण करावे लागेल. आपण तर प्रतिक्रमण करतच रहायचे, दुसरी जबाबदारी आपली नाही.
Page #89
--------------------------------------------------------------------------
________________
७६
कर्माचे विज्ञान
नेहमीच, कोणत्याही कार्याचा पश्चाताप कराल, तर त्या कर्माचे फळ बारा आण्यांपर्यंत नष्ट होऊनच जाते. (त्या कार्याचे फळ ७५ टक्के नष्ट होते) मग जळालेली दोरी असते ना त्याच्यासारखे फळ मिळते. ती जळालेली दोरी पुढील जन्मी अशी हळूच कुंकर मारली, तर उडून जाते. कोणतीही क्रिया अशीच व्यर्थ तर जातच नाही. प्रतिक्रमण केल्याने ती दोरी जळते, पण पीळची डिझाईन तशीच रहाते. मग पुढील जन्मी काय करावे लागते? सहज असे केले, झटकली की उडून गेली.
जप-तपने कर्म बांधले जाते की संपते? प्रश्नकर्ता : जप-तपने कर्म बांधले जाते की संपते?
दादाश्री : त्याच्यात तर कर्म बांधलेच जाईल ना! प्रत्येक बाबतीत कर्मच बांधले जाते. रात्री झोपून गेलात तरी कर्म बांधले जाते आणि जपतप केले, त्यात तर मोठे कर्म बांधले जाते. पण ते पुण्याचे बांधले जातात. त्यामुळे पुढील जन्मी भौतिक सुख मिळते.
प्रश्नकर्ता : तर कर्म संपवण्यासाठी धर्माची शक्ति किती?
दादाश्री : धर्म-अधर्म दोन्हीही कर्म संपवून देतात. सांसारिक बांधलेल्या कर्मांना, जर विज्ञान असेल तर कर्माला त्वरित नष्ट करून देते. विज्ञान असेल तर कर्मांचा नाश होतो. धर्माने पुण्यकर्म बांधले जातात आणि अधर्माने पापकर्म बांधली जातात आणि आत्मज्ञानाने कर्म नष्ट होतात, भस्मीभूत होऊन जातात. ___ प्रश्नकर्ता : धर्म आणि अधर्म, दोन्हींना संपवत असेल तर त्याला धर्म कसे म्हणता येईल?
दादाश्री : धर्माने पुण्याचे कर्म बांधले जाते आणि अधर्माने पापकर्म बांधले जाते. आता कोणी थोबाडीत मारले तर काय होईल? कोणी तुमच्या थोबाडीत मारले तर तुम्ही काय कराल? त्याला दोन वाजवाल ना! डबल करून द्याल. नुकसान केल्याशिवाय देतात, डबल करून. तो तुमच्या पापाचा उदय झाला, म्हणूनच त्याला तुमच्या थोबाडीत
Page #90
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
मारण्याचे मन झाले. तुमच्या कर्माचा उदय तुम्हाला दुसऱ्याकडून थोबाडीत मारवून घेतो, मारणारा तर निमित्त बनला. आता जर कोणी एक थोबाडीत मारली, तर आपण मनातल्या मनात म्हणायचे की आपला हिशोब संपला, मी जमा करून घेतो आणि जमा करूनही घ्यावे. पूर्वी दिलेले, तेच परत करून गेला. जमा करून टाकायचे, नवीन उधारी करायची नाही. आवडत असेल तर उधारी करा. आवडते का? नाही? तर मग नवीन उधारी करायची नाही.
७७
आपला पुण्याचा उदयकर्म असेल तर समोरची व्यक्ति चांगले बोलते आणि पापाचा उदयकर्म असेल तर समोरची व्यक्ति शिव्या देते. त्यात कोणाचा दोष? म्हणून आपण म्हणायचे की उदयकर्म माझाच आहे आणि समोरचा तर निमित्तच आहे. असे केल्याने आपल्या दोषांची निर्जरा होईल आणि नवीन कर्म बांधले जाणार नाही.
कर्म-अकर्म दशेची स्थिती
प्रश्नकर्ता : कोणतेही वाईट काम केले तर कर्म तर बांधलेच जाते असे मी मानतो.
दादाश्री : तर चांगल्या कर्माचे बंधन नाही का ?
प्रश्नकर्ता : चांगले आणि वाईट, दोन्हींपासून कर्म बांधले जाते ना?
दादाश्री : अरे! आता सुद्धा तुम्ही कर्म बांधत आहात! आता तुम्ही खूप पुण्याचे कर्म बांधत आहात ! पण कर्म कधीही बांधलेच जाणार नाही असा दिवस येतच नाही ना? याचे काय कारण असेल?
प्रश्नकर्ता : कोणती तरी प्रवृत्ती तर करतच असेल ना, चांगली किंवा
वाईट?
दादाश्री : होय, पण कर्म बांधले जाणार नाही, असा काही मार्ग नसेल का? भगवान महावीर कशाप्रकारे कर्म न बांधता सुटले असतील? हा देह आहे तर कर्म तर होतच राहणार ! शौचाला जावे लागेल, सर्व काही करावे लागत नाही का ?
Page #91
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
प्रश्नकर्ता : होय, पण जे कर्म बांधले असतील, त्याचे फळ पुन्हा भोगावे लागते ना!
७८
दादाश्री : कर्म बांधले मग तर पुढचा जन्म झाल्याशिवाय राहणारच नाही. म्हणजे कर्म बांधले, तर पुढील जन्मात जावे लागते! पण ह्या जन्मातून, महावीरांना पुढील जन्मात जावे लागले नव्हते, तर काहीतरी मार्ग तर असेल ना, कर्म केले तरीही कर्म बांधले जाणार नाही असा ?
प्रश्नकर्ता : असेल.
दादाश्री : तुम्हाला अशी इच्छा होते का की, कर्म बांधले जाऊ नये? कर्म केले तरी कर्म बांधले जात नाही असे विज्ञान असते. असे विज्ञान जाणले तर मुक्त होतो.
बाधक आहे अज्ञानता, नाही कर्म रे...
प्रश्नकर्ता : आपल्या कर्माच्या फळामुळे हा जन्म मिळतो ना?
दादाश्री : होय, संपूर्ण आयुष्य कर्माचे फळ भोगायचे आहे! आणि जर राग-द्वेष केले तर त्याच्या पासून नवीन कर्म बांधले जातात. जर रागद्वेष नाही केले तर काहीही नाही.
कर्माची अडचण नाही, कर्म तर हे शरीर आहे म्हणून होणारच, पण राग-द्वेष करतो त्याची अडचण आहे. वीतरागींनी काय म्हटले आहे की वीतराग व्हा.
ह्या जगात कोणतेही काम करत आहात, त्यात कामाची किंमत नाही, पण त्यामागे राग-द्वेष झाले तरच पुढील जन्माचा हिशोब बांधला जातो. रागद्वेष होत नसतील तर तुम्ही जबाबदार नाहीत.
संपूर्ण देह, जन्मापासून ते मरेपर्यंत अनिवार्य आहे. यातून राग-द्वेष जे होतात, तेवढाच हिशोब बांधला जातो.
म्हणून वीतराग काय म्हणतात की वीतराग होऊन मोक्षात निघून जा. आम्हाला कोणी शिवी दिली तर आम्ही जाणतो की तो अंबालाल
Page #92
--------------------------------------------------------------------------
________________
कर्माचे विज्ञान
७९
पटेलला शिव्या देत आहे, पुद्गलला शिव्या देत आहे. आत्म्याला तर जाणू शकत नाही, ओळखू शकत नाही ना, म्हणून 'आम्ही' स्वीकारत नाही. 'आम्हाला' स्पर्शतच नाही, आम्ही वीतराग राहतो. आम्हाला त्याच्यावर रागद्वेष होत नाही. म्हणून मग एक अवतारी किंवा दोन अवतारी होऊन सर्व संपून जाईल.
वीतराग एवढेच सांगू इच्छितात की कर्म बाधक बनत नाही, तुझी अज्ञानता बाधक बनते! अज्ञानता कशाची? 'मी कोण आहे' याची. देह आहे तो पर्यंत कर्म तर होतच राहणार, पण अज्ञान गेले म्हणजे कर्म बांधणे बंद होऊन जाते!
कर्माची निर्जरा केव्हा होते? प्रश्नकर्ता : कर्म बांधणे केव्हा थांबते?
दादाश्री : 'मी शुद्धात्मा आहे' याचा अनुभव असायला हवा. म्हणजे तु शुद्धात्मा झाल्यानंतर कर्मबंधन थांबेल, मग कर्माची निर्जरा होत राहते आणि कर्म बांधणे थांबते!
कर्म बांधले जाणार नाही, त्यासाठी मार्ग कोणता? स्वभाव भावात येणे ते. 'ज्ञानी पुरूष' स्वत:च्या स्वरूपाचे भान करून देतात, त्यानंतर कर्म बांधले जात नाही. मग नवीन कर्म चार्ज होत नाहीत. जुनी कर्म डिस्चार्ज होत राहतात आणि सर्वच कर्म पूर्ण झाल्यावर शेवटी मोक्ष होतो!
ही कर्माची गोष्ट, तुम्हाला समजली का! जर कर्ता झाला तर कर्म बांधले जाते. आता कर्तापण सुटून जाईल, त्यामुळे मग नवीन कर्म बांधत नाही. म्हणजे आज तुम्ही कर्म बांधत आहात, पण जेव्हा मी तुमचे कर्तापण सोडवून देईल, तेव्हा मग तुम्हाला कर्मबंधन होणार नाही, आणि जुनी कर्म आहेत ती भोगून घ्यायची. म्हणजे जुना हिशोब चुकता होऊन जाईल आणि नवीन 'कॉझ' निर्माण होणार नाही. फक्त 'इफेक्ट'च राहील. नंतर इफेक्ट पण पूर्णपणे भोगवून गेला की मग संपूर्ण मोक्ष झाला!
- जय सच्चिदानंद
Page #93
--------------------------------------------------------------------------
________________
संपर्क सूत्र
दादा भगवान परिवार अडालज : त्रिमंदिर, सीमंधर सिटी, अहमदाबाद-कलोल हाईवे,
पोस्ट : अडालज, जि.-गांधीनगर, गुजरात - 382421.
फोन : (079) 39830100, E-mail : info@dadabhagwan.org अहमदाबादः दादा दर्शन, ५, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे
उस्मानपुरा, अहमदाबाद-380014. फोन : (079) 27540408 वडोदरा :दादा मंदिर, १७, मामाची पोल-मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन समोर,
सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335 गोधरा : त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन समोर, गोधरा
(जि.-पंचमहाल). फोन : (02672) 262300 राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद-राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी (सर्कल),
पोस्ट : मालियासण, जि.-राजकोट. फोन : 9924343478 सुरेन्द्रनगर : त्रिमंदिर, लोकविद्यालय जवळ, सुरेन्द्रनगर-राजकोट हाईवे, मुळी रोड.
फोन : 9879232877 अमरेली : त्रिमंदिर, लीलीया बायपास चोकडी, खारावाडी. फोन : 9924344460 मोरबी : त्रिमंदिर, पो-जेपुर (मोरबी), नवलखी रोड, ता-मोरबी, जि-राजकोट,
फोन : (02822) 297097 भुज : त्रिमंदिर, हिल गार्डनच्या मागे, एयरपोर्ट रोड. फोन : (02832) 290123 मुंबई : 9323528901
दिल्ली : 9810098564 कोलकता : 9830093230
चेन्नई : 9380159957 जयपुर : 9351408285
भोपाल : 9425024405 इन्दौर : 9039936173
जबलपुर : 9425160428 रायपुर : 9329644433
भिलाई : 9827481336 पटना :7352723132
अमरावती : 9422915064 : 9590979099
हैदराबाद : 9989877786 :9422660497
जालंधर : 9814063043 U.S.A. :DBVI Tel. : +1 877-505-DADA (3232), U.K. : +44 330-111-DADA (3232) Australia : +61 421127947 Kenya : +254 722 722 063
New Zealand : +64210376434 UAE : +971 557316937
Singapore : +6581129229 Website : www.dadabhagwan.org
Page #94
--------------------------------------------------------------------------
________________ कर्ताभाव से कर्मबंधन ! कर्म कसे बांधले जाते? 'मी करत आहे' हा कर्ताभाव आहे. करतो कोणी दुसरा आणि आरोपण करतो की मी केले. या कर्ताभावामुळे कर्म बांधले जाते. आता कर्ता कोण आहे' हे जाणून घ्यावे लागेल, ज्यामुळे मग कर्म बांधले जाणार नाही आणि मुक्ति मिळेल! -दादाश्री Marathi Printed in India dadabhagwan.org Price Rs25