________________
कर्माचे विज्ञान
मारण्याचे मन झाले. तुमच्या कर्माचा उदय तुम्हाला दुसऱ्याकडून थोबाडीत मारवून घेतो, मारणारा तर निमित्त बनला. आता जर कोणी एक थोबाडीत मारली, तर आपण मनातल्या मनात म्हणायचे की आपला हिशोब संपला, मी जमा करून घेतो आणि जमा करूनही घ्यावे. पूर्वी दिलेले, तेच परत करून गेला. जमा करून टाकायचे, नवीन उधारी करायची नाही. आवडत असेल तर उधारी करा. आवडते का? नाही? तर मग नवीन उधारी करायची नाही.
७७
आपला पुण्याचा उदयकर्म असेल तर समोरची व्यक्ति चांगले बोलते आणि पापाचा उदयकर्म असेल तर समोरची व्यक्ति शिव्या देते. त्यात कोणाचा दोष? म्हणून आपण म्हणायचे की उदयकर्म माझाच आहे आणि समोरचा तर निमित्तच आहे. असे केल्याने आपल्या दोषांची निर्जरा होईल आणि नवीन कर्म बांधले जाणार नाही.
कर्म-अकर्म दशेची स्थिती
प्रश्नकर्ता : कोणतेही वाईट काम केले तर कर्म तर बांधलेच जाते असे मी मानतो.
दादाश्री : तर चांगल्या कर्माचे बंधन नाही का ?
प्रश्नकर्ता : चांगले आणि वाईट, दोन्हींपासून कर्म बांधले जाते ना?
दादाश्री : अरे! आता सुद्धा तुम्ही कर्म बांधत आहात! आता तुम्ही खूप पुण्याचे कर्म बांधत आहात ! पण कर्म कधीही बांधलेच जाणार नाही असा दिवस येतच नाही ना? याचे काय कारण असेल?
प्रश्नकर्ता : कोणती तरी प्रवृत्ती तर करतच असेल ना, चांगली किंवा
वाईट?
दादाश्री : होय, पण कर्म बांधले जाणार नाही, असा काही मार्ग नसेल का? भगवान महावीर कशाप्रकारे कर्म न बांधता सुटले असतील? हा देह आहे तर कर्म तर होतच राहणार ! शौचाला जावे लागेल, सर्व काही करावे लागत नाही का ?