________________
कर्माचे विज्ञान
करतो की करावे लागते? दादाश्री : तुझ्यासोबत असे कधी घडते का, की तुझी इच्छा नसते तरीही तुला तसे काही करावे लागते? असे होते का कधीतरी? असे होते की नाही?
प्रश्नकर्ता : हो असे होते.
दादाश्री : लोकांनाही असे होत असेल की नाही? त्याचे कारण काय? की इच्छा नसते तरी सुद्धा करावे लागते त्याचे कारण काय? तर ते पूर्वकर्म केले होते त्याचा हा इफेक्ट (परिणाम) आला आहे. नाईलाजास्तव करावे लागते, त्याचे कारण काय?
जगातील लोक या इफेक्टलाच कॉझ (परिणामालाच कारण) म्हणतात. आणि ह्या इफेक्टला तर समजतच नाही ना! जगातले लोक याला कॉझ (कारण) म्हणतात, तर आपण सांगायचे ना की, माझी इच्छा नाही तरी पण कसे काय हे कार्य मी केले? आता ज्याची इच्छा नाही ते कर्म 'मी केले', हे तुम्ही कसे काय म्हणता? 'तुम्ही कर्म केले' असे जग कशामुळे म्हणते? त्याचे कारण हेच की दिसणाऱ्या क्रियेलाच जगातील लोक 'कर्म केले' असे म्हणतात. लोक म्हणतील ह्यानेच हे कर्म केले. तेव्हा ज्ञानी असे समजातात की हे तर परिणाम आले.
कोणी पाठविले पृथ्वीवर? प्रश्नकर्ता : आपण स्वत:च जन्माला आलो आहोत की आपल्याला कोणी पाठविणारा आहे?