________________
कर्माचे विज्ञान
प्रश्नकर्ता : तुम्ही बिझनेस करता तेव्हा जे व्हायचे असते ते होतेच, तो इफेक्ट आहे. परंतु बिझनेस करण्यासाठी कॉझीझ तर करावे लागतात ना? तेव्हाच बिझनेस करू शकतो ना?
१४
दादाश्री : नाही, कॉझीझमध्ये इतर कोणत्याही रिलेटीव वस्तु वापरल्या जात नाहीत. बिझनेस तर शरीर चांगले असेल, डोकं चांगले चालत असेल, हे सर्व असेल तेव्हा होतो ना! सगळ्यांच्या आधारावर जे होत असेल, तो इफेक्ट आणि जो माणूस बसल्या बसल्या 'ह्याचे वाईट होईल, असे होईल.' असे करतो ते सर्व कॉझीझ, कारण की यात आधार किंवा इतर कोणत्याही वस्तुची गरज नसते.
प्रश्नकर्ता : आम्ही जो बिझनेस करत असतो, त्याला इफेक्ट म्हणतात का?
दादाश्री : इफेक्टच म्हणतात ना ! बिझनेस हा इफेक्टच आहे. परीक्षेचा परिणाम येतो, त्यात काही करावे लागते का? परीक्षेत करावे लागते, त्यास कॉझीझ म्हणतात. काहीतरी करावे लागते, परंतु तेही परिणामामध्ये काही करावे लागते का?
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : अशा प्रकारे यात काही करावे लागत नाही. हे सर्व होतच राहते. आपले शरीर वगैरे वापरले जाते आणि सर्व होतच राहते, कॉझमध्ये तर स्वत:ला करावे लागते. कर्ताभाव हे कॉज आहे. इतर सर्वकाही इफेक्ट आहे. भोक्ताभाव हे कॉज आहे.
प्रश्नकर्ता : जे भाव आहेत ते सर्व कॉझीझ, बरोबर.
दादाश्री : हो, जिथे दुसऱ्या कोणाच्याही मदतीची गरज भासत नाही. तुम्ही स्वयंपाक बनवता फर्स्ट क्लास, तो सर्व इफेक्ट आहे. आणि त्यात तुम्ही आत भाव करता की, 'मी किती छान स्वयंपाक बनवला, किती छान केला.' हा भाव तो तुमचा कॉझ. जर भाव केला नाही तर सर्व इफेक्टच आहे. ऐकू शकतो, पाहू शकतो, हे सर्व इफेक्ट्स आहेत. कॉझीझला पाहता येत नाही.