________________
कर्माचे विज्ञान
७१
मग तर कोणीही मोक्षाला गेलाच नसता. या इथे संपूर्ण दिवस पुण्य आणि पुण्यच असते. मग कोण जाईल मोक्षात? हा कायदाच असा आहे की, शंभर जमाही करतो आणि पाच उधारही करतो. बेरीज-वजाबाकी नाही करत. म्हणून माणसाने जे जमा केले असेल ते परत भोगावे लागते, ते पुण्य सुद्धा आवडत नाही मग, खूप पुण्य जमा केले असेल ना, दहा दिवस, पंधरा दिवस लग्न-समारंभ वगैरे चालू असतात त्यावेळी खाण्यापिण्याची चंगळ होते परंतु शेवटी तेही आवडत नाही, त्याचा कंटाळा येतो. खप पुण्यातही कंटाळा येतो. खूप पापातही कंटाळा येतो. पंधरा दिवसांपर्यंत सेन्ट आणि अत्तरे चोपडत असतील, खूप जेवण खाऊ घालत असतील, तरीही खिचडी खाण्यासाठी घरी पळून जातो. कारण की हे खरे सुख नाही. कल्पित सुख आहे. खऱ्या सुखाचा कधीही अभाव होत नाही. आत्म्याचे जे खरे सुख आहे, त्याचा अभाव कधीच होत नाही. हे तर कल्पित सुख आहे.
कर्मबंधनातून मुक्तिचा मार्ग प्रश्नकर्ता : पुर्नजन्मात कर्मबंधनातून सुटण्याचा मार्ग काय आहे? आम्हाला साधारणपणे असे माहित आहे की, आपण मागील जन्मी चांगले किंवा वाईट सगळे कर्म केलेलेच आहे, तर यापासून सुटका मिळवण्याचा मार्ग कोणता?
दादाश्री : जर एखादा तुला त्रास देत असेल, तर तू आता समजून जायचे की, मागील जन्मात मी त्यांच्यासोबत खराब कर्म केलेले आहेत, त्याचे हे फळ देत आहे. तर तुला शांती आणि समतेत राहून त्याचा निकाल लावायचा आहे. स्वतः शांत राहू शकत नाही आणि पुन्हा तू नवीन बीज टाकतो. अर्थात पूर्वजन्मीचे बंधन सोडण्याचा एकच मार्ग आहे, शांती आणि समता. त्याच्यासाठी खराब विचार सुद्धा यायला नको. आणि माझाच हिशोब मी भोगत आहे असे असायला हवे. तो जे करत आहे, ते माझ्या पापाच्या आधारावरच, मी माझेच पाप भोगत आहे, असे वाटायला पाहिजे, तरच सुटका होईल. आणि खरोखर तुमच्याच कर्माच्या उदयामुळे तो तुम्हाला दुःख देतो. तो तर निमित्तच आहे. संपूर्ण जग निमित्त आहे, दु:ख देणारा,