________________
४०
कर्माचे विज्ञान
प्रारब्ध भोगल्या नंतरच सुटका प्रश्नकर्ता : मुख्य तर आपलीच कर्म नडतात?
दादाश्री : तर मग दुसरे कोण? दुसरा कोणी करणारा नाही. बाहेरचे कोणी करणारे नाहीत. तुमचीच कर्म तुम्हाला त्रास देतात. शहाणी बायको करुन आणली आणि नंतर ती वेडी झाली. तर ते कोणी केले? ते तर पतीच्याच कर्माच्या उदयाने वेडी होते. म्हणून आपण मनात असे समजून जायचे की माझेच भोग आहेत, माझाच हिशोब आहे आणि मला तो हिशोब फेडून टाकायचा आहे. फसलो रे बाबा फसलो!
स्वतः भोगल्याशिवाय सुटका नाही. प्रारब्ध तर आम्हाला सुद्धा भोगावे लागतेच, सर्वांनाच, महावीर प्रभू सुद्धा भोगत होते. भगवान महावीरांना तर देवलोक त्रास द्यायचे, तेही भोगत होते. मोठ-मोठे देवलोक ढेकूण टाकत होते.
प्रश्नकर्ता : ते त्यांना प्रारब्ध भोगावे लागले ना?
दादाश्री : सुटकाच नाही ना! ते स्वतः समजायचे की जरी हे देवलोक करत असले तरी प्रारब्ध तर माझेच आहे.
कोणत्या कर्माने देहाला दुःख? प्रश्नकर्ता : कोणत्या कर्माच्या आधारावर शरीराचे रोग होतात?
दादाश्री : लुळा-पांगळा होतो ना! हो, हे सर्व काय झाले आहे? ते कशाचे फळ आहे? आपण जर कानाचा दुरूपयोग केला तर कानाला नुकसान होते. डोळ्यांचा दुरूपयोग केला तर डोळे जातात. नाकाचा दुरूपयोग केला तर नाक जाते, जीभेचा दुरूपयोग केला तर जीभ खराब होते. मेंदूचा दुरूपयोग केला तर मेंदू खराब होतो. पायाचा दुरूपयोग केला तर पाय तुटतो, हाताचा दुरूपयोग केला तर हात तुटतो. अर्थात ज्याचा दुरुपयोग केला जातो त्याचे फळ येथे भोगावे लागते.
निर्दोष मुलांनी का भोगायचे? प्रश्नकर्ता : पुष्कळ वेळा असे पाहण्यात येते की, लहान मुलं