________________
कर्माचे विज्ञान
दादाश्री : कोणाचे दुःख कोणी घेऊ शकत नाही. हे तर बहाणे बनवतात, संतांच्या रूपात पूजनीय बनून ! स्वत:च्याच कॉझीझचे हे परिणाम आहेत. हे तर बहाणे बनवतात, स्वत:ची अब्रू राखण्यासाठी. मोठे आलेत दुःख घेणारे! शौचाला जाण्याची शक्ति नाही. ते काय दुःख घेणार होते ! कोणी कोणाचे दुःख घेऊच कसे शकतो?
प्रश्नकर्ता : मी सुद्धा नाही मानत. दुःख घेतलेच जाऊ शकत नाही.
दादाश्री : नाही, नाही! हे तर लोकांना मुर्ख बनवतात. कोणी घेऊच शकत नाही. म्हणजे हे सर्व जण, बहाणे तर बनवणार! तेव्हाच पूजले जातात ! मी तर तोंडावरच सांगून देतो की तुमचे दुःख तुम्हीच भोगत आहात. मग काय बघून असे बोलतात ? मोठे आले दुःख घेणारे.
प्रश्नकर्ता : दुःख देऊ तर शकतो ना?
५२
दादाश्री : तो दुःख घेऊ शकत नाही आणि जो कोणी आपल्याला दुःख देऊ शकतो, तो तर आपला इफेक्ट आहे. देऊ शकतो तो सुद्धा इफेक्ट आहे आणि घेऊ शकतो तो सुद्धा इफेक्ट आहे. इफेक्ट म्हणजे इट हॅपन्स, म्हणजे कोणी कर्ता नाही.
भयंकर रोग, पाप कर्मांमुळे
प्रश्नकर्ता : कोणताही रोग झाल्यामुळे मृत्यु होतो, तेव्हा लोक असे म्हणतात की पूर्व जन्माचे कोणते तरी पाप नडत आहे. ही खरी गोष्ट आहे?
दादाश्री : होय, पापामुळे रोग होतात आणि पाप नसेल तर रोग होत नाहीत. तु एखादया रोग्याला पाहिले आहे का?
प्रश्नकर्ता : माझी आई आताच दोन महिन्यांपूर्वी कॅन्सरने मरण
पावली.
दादाश्री : हे तर सर्व पापकर्माच्या उदयाने घडते. पापकर्माचा उदय असेल तेव्हा कॅन्सर होतो. हे सर्व हार्ट एटेक वगैरे पापकर्मामुळे होत असते. नुसती पापंच बांधली आहेत, या काळाच्या जीवांचा धंदाच हा, संपूर्ण दिवस