________________
कर्माचे विज्ञान
स्वत:च्या कुठल्याही फायद्याशिवाय, स्वतःला कुठल्याही प्रकारे फायदा होत नाही आणि नाहक शिकार करून मारून टाकतो. म्हणून त्याचे फळ त्याला नर्कगति येते. कर्म एकच प्रकारचे पण भाव वेगवेगळे. गरीब माणसाला तर त्याची मुले हैराण करीत होती म्हणून बिचाऱ्याने हरणाला मारले. आणि हा राजकुमार तर स्वत:च्या मौजमजेसाठी जीवांना मारतो. शिकार करण्याचा छंद असतो ना! नंतर हरीण तिथल्या तिथे पडून राहिले, त्याचे त्याला काही पडलेले नाही. पण नंतर तो काय म्हणतो? पहा, कसा अचूक निशाणा लावला आणि त्याला खाली पाडले. हे वाहतूकीचे नियम आपण नाही समजलो, तर मग वाहतूकीत समोरासमोर मारूनच टाकतील ना! ते तर सर्वांनाच समजते! परंतु 'हे' समजेल असे नाही आहे, म्हणून आमच्या सारखे शिकवणारे हवेत.
फाशीच्या सजेचे न्यायाधीशाला काय बंधन?
एक न्यायाधीश मला म्हणत होता की, 'साहेब, तुम्ही मला ज्ञान तर दिले, पण मी कोर्टात 'देहांतदंडाची' (फाशीची) शिक्षा द्यावी की नाही?' तेव्हा मी त्याला सांगितले, 'त्याचे काय करणार, फाशीची शिक्षा नाही देणार तर?!' त्यावर तो म्हणाला, 'पण फाशीची शिक्षा दिली तर मला दोष लागेल. '
७५
मग मी त्याला पद्धत शिकवली की, तुम्ही असे म्हणायचे की, 'हे प्रभू, माझ्या वाट्याला असे काम कुठून आले? आणि त्याचे मनापासून प्रतिक्रमण करायचे. आणि दुसरे, सरकारी कायद्याप्रमाणे काम करत रहायचे.'
प्रश्नकर्ता : आम्ही कोणाला दु:ख पोहचवले आणि प्रतिक्रमण करून घेतले, पण त्याला जबरदस्त आघात - ठेच पोहचली असेल तर त्याच्याने कर्मबंधन होणार नाही का ?
दादाश्री : तुम्ही त्याच्या नावाचे प्रतिक्रमण करत रहायचे, आणि त्याला जेवढया प्रमाणात दुःख झाले असेल तेवढया प्रमाणात प्रतिक्रमण करावे लागेल. आपण तर प्रतिक्रमण करतच रहायचे, दुसरी जबाबदारी आपली नाही.