________________
संपादकीय
अकल्पित, अनिर्धारितघटना सहसा टी.व्ही. किंवा वर्तमान पत्रातून वाचायला मिळतात जसे की, विमान कोसळून ४०० लोक ठार झाले, मोठा बॉम्ब-स्फोट झाला, आग लागली, भूकंप झाला, वादळ आले, हजारो लोक मारले गेले! कितीतरी अपघातात मारले गेले, काही आजाराने मेले, काही जन्मताच मृत्यु पावले! कित्येकांनी उपासमारीमुळे आत्महत्या केली, काही धर्मात्मा गलिच्छ वर्तन करताना पकडले गेले, कितीतरी भिकारी उपाशी मेले! पण संत, भक्त, ज्ञानींसारखे उच्च महात्मा निजानंदात जीवन जगत आहेत! दररोज दिल्लीतील घोटाळे उघडकीस येतात. अशा बातम्यांनी प्रत्येक माणसाच्या हृदयात एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते की, याचे रहस्य काय? याच्या मागे काही गुह्य कारण असेल का? निर्दोष बालक जन्मताच का अपंग झाले? हृदय द्रवित होऊन जाते, खूप विचारमंथन करूनही मनाचे समाधान होत नाही आणि शेवटी आपापली कर्म. असे मानून, असमाधानामुळे जड झालेल्या मनाने गप्प होतो. कर्म आहे असे म्हणतो, परंतु कर्म म्हणजे नेमके काय आहे? कशा प्रकारे कर्म बांधले जाते? त्याची सुरूवात कशी होते? पहिले कर्म कुठून सुरू झाले? कर्मातुन मुक्ती मिळू शकते का? कर्माचे भोग टाळले जाऊ शकतात का? भगवंत करत असतील की कर्म करवून घेत असतील? मृत्यु नंतर काय होते? कर्म कोण बांधत असेल? भोगतो कोण? आत्मा की देह?
आपली लोकं कर्म कशास म्हणतात? काम-धंदा करतो, सत्कार्य करतो, दान-धर्म करतो या सर्वांना 'कर्म केले' असे म्हणतात, ज्ञानी याला कर्म म्हणत नाहीत पण कर्मफळ म्हणतात. जे पाच इंद्रियांनी पाहू शकतो, अनुभवू शकतो ते सर्व स्थूळ आहे. ते कर्मफळ म्हणजे डिस्चार्ज (पूर्वी बांधलेले कर्म उदयास येणे) कर्म म्हटले जाते. मागच्या जन्मी जे चार्ज (नवीन कर्म बांधणे) केले होते ते आज डिस्चार्ज मध्ये आले, रुपकात आले आणि आता जे नवीन कर्म चार्ज करीत आहोत ते सुक्ष्मात होत असते व ते चार्जिंग पोईंट कुणालाही कळू शकेल असे नाही.
समजा एखाद्या शेठकडे एका संस्थेचे ट्रस्टी धर्मार्थ दान देण्यास दबाव टाकतात व शेठ पाच लाख रुपये दान म्हणून देतात. त्यानंतर त्या शेठचा