________________
कर्माचे विज्ञान
हिटलरने कसे कर्म बांधले? हिटलरने ह्या लोकांना मारले, त्याचे फळ का नाही मिळाले? त्याने ज्यांना मारले, ते सर्व एकत्र कशामुळे जमले? त्याला ते प्लेन कुठून मिळाले? हे सर्व एकत्र कुठून झाले? एकत्र जमले तेव्हा मारले म्हणजे ते कर्मफळ होते त्या बिचाऱ्यांचे? त्याचेही फळ पुन्हा नर्कगति येईल. शास्त्रकारांनी पुढे सांगितले आहे की, इथे जे मरून गेले आणि जगात निंदनीय झाले आहेत ते नर्कगतित किंवा जनावरगतित जातील. जगात जर प्रशंसनीय झाले आणि त्यांची किर्ती सर्वत्र पसरली तर ते देवगतित किंवा जास्त झाले तर मनुष्यात जातात! म्हणजे ह्याचे पुन्हा फळ तर येतेच. म्हणजे हे लोकांच्या तराजूने पाहून घ्यावे.
सत्ताधीशचा हिशोब प्रजेसोबत प्रश्नकर्ता : एखाद्या देशाचे सत्ताधीश आहे, म्हणजे त्या देशाचे धर्मगुरू म्हणा, की आज संपूर्ण सत्ता त्यांच्याच हातात आहे. ते त्या देशाचे प्रमुख म्हटले जातात. तर आता लाखो लोक मरत आहेत. जगातील सर्व देशांनी त्याला विनंती केली की तुम्ही ह्याचे समाधान करा. पण तो समाधान करण्यास तयार नाही आणि लाखो लोकांचा संहार होतच आहे. हे कसे कर्म आहे? त्याच्यासोबत लाखो माणसांचा काय ऋणानुबंध आहे?
दादाश्री : ती माणसं तर त्यांचे कर्म भोगत आहे. कर्म बांधत नाही. पण ते सर्व भोगत आहेत.
प्रश्नकर्ता : आणि तो जो, मारत आहे त्याचे? दादाश्री : तो तर कर्म बांधत आहे. तो नर्कगतित जाईल.
प्रश्नकर्ता : हे जे सर्वजण मरत आहेत, त्याचे निमित्त तर मारणारा बनत आहे ना? ते कोणत्या कारणामुळे?
दादाश्री : निमित्त बनत आहे आणि म्हणूनच तर तो नर्कात जाईल.
प्रश्नकर्ता : नर्कात जाईल हे बरोबर आहे. पण हे घडले कशाप्रकारे? कोणत्या हिशोबाने घडले असेल?