________________
कर्माचे विज्ञान
धिक्कारतील. पण जे पाशवी विचार केले, खराब संकल्प - विकल्प केले, की असे करायला हवे, तसे करायला हवे, असे उपभोगायला पाहिजे. अशा योजना केल्या. त्या योजना त्याला जनावरगतित घेऊन जातात. योजना आखतात ना आत ? नाही आखत का? त्या जनावरगतित घेऊन जातात.
६५
यात भोगणारा कोण?
प्रश्नकर्ता : चांगले कर्म केले तर पुण्य बांधले जाते आणि वाईट कर्म केले तर पाप. हे पाप-पुण्य कोण भोगत असतो शरीर की आत्मा ?
दादाश्री : हे पाप-पुण्य जो करत असतो तोच भोगत असतो. कोण भोगतो? अहंकारच करत असतो आणि अहंकारच भोगत असतो. शरीर भोगत नसते आणि आत्मा पण भोगत नसतो. हे अहंकार भोगत असतो. शरीरासोबतचा अहंकार असेल तर शरीरासोबत भोगतो. शरीराशिवाय केलेला अहंकार शरीराशिवाय भोगतो. फक्त मानसिक रूपानेच भोगतो.
प्रश्नकर्ता : मृत्यु नंतर स्वर्ग किंवा नर्क असे काही आहे का? दादाश्री : मृत्यु नंतर स्वर्ग आणि नर्क दोन्हीही आहे.
प्रश्नकर्ता : म्हणजे खराब कर्म केले असतील तर नर्कात कोण जातो? आत्मा जातो का ?
दादाश्री : अरे आत्मा आणि शरीर दोन्ही सोबतच असतात ना ! प्रश्नकर्ता : मरून जातो तेव्हा शरीर तर इथेच सुटून गेलेले असते
ना?
दादाश्री : नंतर तिथे नवीन शरीर बनते. नर्कात वेगळ्या प्रकारचे शरीर बनते, तिथे पाऱ्यासारखे शरीर असते.
प्रश्नकर्ता : तिथे शरीर भोगत असते की आत्मा भोगत असतो?
दादाश्री : अहंकार भोगत असतो. ज्याने नर्कगतिचे कर्म केलेले असते तोच भोगतो.