________________
व आंबा मिळतो. दादाश्रींनी खुपच सुंदर स्पष्टीकरण केले आहे की ही सर्व तर फळं आहे. कर्मबीज तर आत सूक्ष्मात काम करते.
अनेकांना असा प्रश्न पडतो की पहिले कर्म कशा प्रकारे बांधले गेले असेल? पहिला देह की पहिले कर्म? पहिले अंडे की पहिली कोंबडी? अशा प्रकारची गोष्ट झाली ही! खरोखर, वास्तविकेत पहिले कर्म अशी कोणतीही वस्तूच नाही ह्या जगात! कर्म आणि आत्मा अनादिकाळापासून आहेत. ज्याला आपण कर्म म्हणत असतो ते जड तत्त्वाचे आहे आणि आत्मा चेतन तत्त्व आहे. दोन्ही तत्त्वे वेगळीच आहेत. आणि तत्त्व म्हणजे सनातन वस्तू म्हटली जाते. जे सनातन असते त्याचा आदि (प्रारंभ) कसा असू शकतो? हे तर आत्मा आणि जड तत्त्वाचे संयोग झाले आणि त्यात आरोपित भाव यांचे आरोपण होतच गेले. त्याचे हे फळ येऊन उभे राहिले. संयोग वियोगी स्वभावाचे आहेत. म्हणून संयोग येतात आणि जातात. त्यामुळे निरनिराळ्या प्रकारच्या अवस्था उत्पन्न होतात आणि जातात. त्यात राँग बिलीफ (चुकीची मान्यता) उभी राहते की 'हे मी आहे आणि हे माझे आहे' त्यामुळे हे रुपी जग भास्यमान होते. हे रहस्य जर समजले तर शुद्धात्मा आणि संयोग या दोनच वस्तु आहेत जगात. परंतु एवढे न समजल्यामुळे वेगवेगळ्या स्थूळ भाषेत कर्म, नशीब, प्रारब्ध हे सर्व म्हणावे लागते. पण विज्ञान एवढेच म्हणते, मात्र जे सर्व संयोग आहेत, त्यातून पर (वेगळे) होऊन गेले तर आत्म्यातच राहू शकतो! तर मग कर्मा सारखे काहीच उरणार नाही.
कर्म कशा प्रकारे बांधली जातात? कर्ताभावाने कर्म बांधली जातात. कर्ताभाव कशाला म्हणतात? करतो कोणीतरी आणि मानतो की 'मी करतो', त्याचे नाव कर्ताभाव. कर्ताभाव कशाने होतो? अहंकाराने. अहंकार कोणास म्हणतात? जो स्वत: नाही तिथे 'मी' पणाचे आरोपण करतो, त्याचे नाव
10