________________
कर्माचे विज्ञान
पहावेच लागेल ना? आपल्या हिशोबानेच आहे हे सर्व. एवढे थोडक्यात जरी समजलात, तरी खूप उपयोगी पडेल.
४५
जिथे आपले चिकट (प्रगाढ ) असेल तेथे आपल्याला चिकट कर्मांचा उदय येईल. आणि ते आपला चिकटपणा सोडवण्यासाठी येतात. सगळाच आपला हिशोब आहे. कोणी शिवी दिली तर तो काय अव्यवहार आहे? व्यवहार आहे. 'ज्ञानी' तर कोणी शिवी दिली तर स्वत: राजी होतात की, बंधनातून मुक्त झालो, तेव्हा अज्ञानी धक्का मारतो ( भांडतो) आणि नवे कर्म बांधतो. समोरचा माणूस शिव्या देतो, तो तर आपल्याच कर्माचा उदय आहे, समोरचा तर निमित्त मात्र आहे. अशी जागृती राहिली तर नवीन कर्म बांधले जाणार नाही. प्रत्येक कर्म त्याच्या निर्जरेचे निमित्त घेऊन आलेले असते. कोणा-कोणाच्या निमित्ताने निर्जरा ( आत्मप्रदेशापासून कर्मांचे वेगळे होणे) होईल हे नक्की असते. उदयकर्मात राग- -द्वेष करायचे नाही, त्याचे नाव धर्म.
स्वतः नेच पाडले अंतराय ?
प्रश्नकर्ता : आपण सत्संगला येत असतो तेव्हा एखादा माणूस अडचण उभी करतो. तर ती अडचण आपल्या कर्मामुळे आहे का?
दादाश्री : होय, तुमची चुक नसेल तर कोणी तुमचे नाव घेणार नाही. तुमच्या चूकांचाच परिणाम आहे. स्वत:नेच बांधलेले अंतराय कर्म आहेत. केलेल्या कर्मांचे सर्व हिशोब भोगायचे आहेत.
प्रश्नकर्ता : ही चुक आपण मागच्या जन्मी केली होती का?
दादाश्री : होय, मागच्या जन्मात.
प्रश्नकर्ता : आताचे माझे वर्तन त्यांच्यासोबत चांगले आहे. तरीही ते म्हणतात की, माझे वर्तन खराब आहे, तर हे मागील जन्माचे आहे का?
दादाश्री : मागील जन्माचे कर्म म्हणजे काय ? योजना रूपी केलेले असते. म्हणजे मनाच्या विचाराने कर्म केलेले असते. ते आता रूपकमध्ये येते आणि आपल्याला ते कार्य करावे लागते. करायचे नसेल तरीही करावेच