________________
कर्माचे विज्ञान
लागते. आपली सुटकाच होऊ शकत नाही. असे कार्य करावे लागते ते मागील योजनाच्या आधारावर करत असतो आणि मग त्याचे फळ पुन्हा भोगावे लागते.
पति-पत्नीचा संघर्ष ढेकूण चावतात, ते तर बिचारे खूप चांगले आहेत पण हा नवरा बायकोला चावतो, बायको नवऱ्याला चावते, हे अतिशय दुःखदायी असते. चावतात की नाही?
प्रश्नकर्ता : चावतात.
दादाश्री : तर हे चावायचे बंद करायचे आहे. ढेकूण चावतात, ते तर चावून निघून जातात बिचारे. आत तृप्त झाले तर निघून जातात. पण पत्नी तर नेहमीच चावत असते. एक जण तर मला सांगत होता की, माझी पत्नी तर मला सापीण सारखी चावते! तर मेल्या, मग लग्न कशाला केले त्या सापीणसोबत? तर हा स्वतः साप नाही का? मुर्खा! अशीच काय सापीण येते? साप असेल तरच सापीण येईल ना!
प्रश्नकर्ता : त्याच्या कर्मात लिहिले असेल म्हणून त्याला भोगावेच लागते. म्हणून ती (पत्नी) चावते, त्यात पत्नीची चुक नाही!
दादाश्री : बस, म्हणजे हे कर्माचे दुःख भोगणे आहे सर्व. म्हणून अशी पत्नी मिळते, असा पती मिळतो, अशी सासू मिळते. नाहीतर या जगात किती चांगल्या चांगल्या सासवा असतात. चांगले पति असतात! पत्नी किती छान असते, आणि आपल्यालाच असे वाकडे का भेटलेत?
हा तर पत्नीसोबत भांडत राहतो. अरे, तुझ्या कर्माचा दोष. म्हणजे आपले लोक निमित्ताला चावायला धावतात. पत्नी, तर निमित्त आहे. निमित्ताला कशासाठी चावतोस? निमित्ताला चावल्यामुळे कोणाचे भले झाले आहे का कधी? वाईट गतीत जातात सर्व. तर लोकांची काय गती होईल, हे सांगितले जात नाही म्हणून तर भीत नाहीत. जर सांगितले ना की, चार पाय आणि वरून शेपूट मिळेल तर लगेच सरळ होतील.