________________
कर्माचे विज्ञान
चंदुभाऊ आहे.' ही तुमची राँग बिलीफ (चुकीची मान्यता) आहे, त्याने कर्म बांधली जातात.
भगवंताने सर्वात मोठे कर्म कशास म्हटले? रात्री 'मी चंदुभाऊ आहे' असे मानून झोपून गेलात आणि मग आत्म्याला पोत्यात टाकले, ते सर्वात मोठे कर्म ! कर्तापदाने कर्मबंधन
प्रश्नकर्ता : कर्म कशाने बांधली जातात? हे आणखी थोडे सविस्तर समजावून सांगा ना...
दादाश्री : कर्म कशाने बांधली जातात, ते तुम्हांला सांगू का ? तुम्ही कर्म करीत नाही, तरीही मानता की 'मी करतो' म्हणून तुमचे बंधन जात नाही. भगवंत सुद्धा कर्ता नाही. भगवंत कर्ता असते, तर त्यांना बंधन झाले असते. अर्थात भगवंत कर्ता नाहीत आणि तुम्ही सुद्धा कर्ता नाहीत. पण तुम्ही मानतात की ‘मी करतो' त्यामुळे कर्म बांधली जातात.
कॉलेजात पास झालात, ते दुसऱ्या शक्तिच्या आधारावर आणि तुम्ही म्हणता की मी पास झालो. हा आरोपित भाव आहे. त्यामुळे कर्मबांधले जाते. वेदांताने सुद्धा स्वीकारले निरिश्वरवाद
प्रश्नकर्ता : जर दुसऱ्या कोणत्या तरी शक्तीने होत असते, तर मग कोणी चोरी केली, हा काही गुन्हा नाही. आणि कोणी दान दिले तर, तो सुद्धा गुन्हा नाही. म्हणजे हे सर्व काही सारखेच म्हटले जाईल ना !
दादाश्री : हो. सारखेच म्हटले जाईल. पण मग ते सारखे ठेवत नाहीत ना. दान देणारा अशी छाती काढून फिरतो, म्हणून तर तो बांधला गेला आणि चोरी करणारा म्हणतो, की चांगल्या चांगल्यांची चोरी करतो पण 'मला कोणी पकडूच शकत नाही', म्हणून तो मुर्ख बांधला गेला. 'मी केले' असे म्हटले नाही, तर काहीही स्पर्शत नाही (कर्म बांधले जात नाही).
प्रश्नकर्ता : अशी एक मान्यता आहे की, प्राथमिक कक्षेत आपण असे मानत असतो की, ईश्वर कर्ता आहे. पुढे जाऊन वेदांमध्येही निरिश्वरवादा शिवाय काहीच नाही. उपनिषदामध्ये पण निरिश्वरवादच आहे.