________________
कर्माचे विज्ञान
दादाश्री : चांगली कर्म पण इथेच बांधली जातात आणि वाईट सुद्धा इथेच बांधली जातात.
हे मनुष्य कर्म बांधत असतात. त्यात जर लोकांना नुकसान करणारे, लोकांना दुःख देणारे कर्म असतील तर ते जनावर गतित आणि नर्कगतित जातात. लोकांना सुख देणारे कर्म असतील तर ते मनुष्यात येतात आणि देवगतित जातात. म्हणजे ते जसे कर्म करतात, त्यानुसार गति होत असते. आता गति झाली म्हणजे ते भोगून झाल्या नंतर पुन्हा इथे यायचे.
कर्म बांधण्याचा अधिकार फक्त माणसालाच आहे, इतर कोणालाही नाही, आणि ज्याला बांधण्याचा अधिकार आहे त्याला चारही गतित भटकावे लागते. आणि जर कर्म नाही केले, बिलकुल कर्मच नाही केले तर मोक्षाला जातो. मनुष्यातून मोक्षाला जाता येते. दुसऱ्या कोणत्याही योनीतून मोक्षाला जाऊ शकत नाही. कर्म करत नाही असे तुम्ही पाहिले का?
प्रश्नकर्ता : नाही, असे पाहिले नाही.
दादाश्री : तुम्ही पाहिले आहेत का कर्म न करणारे? यांनी पाहिले आहेत आणि तुम्ही नाही पहिलेत?!
हे जनावरे वगैरे जे सर्व आहेत ते खातात, पितात, मारामारी करतात, लढतात तरीही त्यांना कर्म बांधली जात नाहीत. अशी माणसांचीही कर्म बांधली जाणार नाही अशी स्थिती शक्य आहे परंतु जर 'स्वतः' कर्माचा कर्ता बनला नाही तर आणि कर्म भोगेल एवढेच! म्हणजे येथे, आमच्याकडे येवून 'सेल्फ रियलायझ' चे ज्ञान (आत्मज्ञान) प्राप्त करून घेतले तर मग त्यांचे कर्माचे कर्तेपण सुटून जाते, करायचेच सुटून जाते, नंतर भोगायचेच राहते. अहंकार असेल तो पर्यंत कर्माचा कर्ता.
आठ जन्मांपर्यंतची शिल्लक सोबत प्रश्नकर्ता : ज्या-ज्या योनीत कर्म बांधली जात नाहीत, फक्त पूर्व कर्मच भोगावी लागतात, तर त्या जीवाचा पुढील जन्म कशाप्रकारे होतो?
दादाश्री : हे इतके सर्व आहे की, माणूस इथून गेला, आणि