________________
कर्माचे विज्ञान
त्याचा परिणाम येईल, तेव्हा तो भोगेल. आता आपण जे चांगले करीत आहोत, त्याचा परिणाम जेव्हा आपल्याला येईल तेव्हा आपण भोगू.
५६
प्रश्नकर्ता : दादा, ही तुमची गोष्ट खरी आहे. पण जर व्यवहारिक दृष्टीने पाहिले की, एक माणूस झोपडपट्टीत रहात असेल, उपाशी असेल, तहानलेला असेल आणि समोर राजवाड्यात एक माणूस रहात असेल. झोपडीवाला पाहतो की माझी दशा अशी का आहे? मी तर इतका प्रामाणिक आहे. नोकरी करतो. तरी माझ्या मुलांना खायला मिळत नाही. आणि हा माणूस तर इतके सारे उलटे काम करतो, तरी सुद्धा तो राजवाड्यात राहतो. तर त्याला राग येणार नाही का? तो कशाप्रकारे स्थिरता ठेऊ शकेल?
दादाश्री : आता जे दुःख भोगत आहे, ते तर पूर्वी जी परीक्षा दिली आहे, त्याचा परिणाम आलेला आहे आणि त्या राज महालात राहणाऱ्याने सुद्धा परीक्षा दिली आहे, त्याचा त्याला हा परिणाम आलेला आहे. तो पास झाला आहे आणि आता पुन्हा त्याची नापास होण्याची लक्षणे उभी झालेली आहेत. आणि ह्या गरीबाची पास होण्याची लक्षणे उभी झाली आहेत.
प्रश्नकर्ता : पण तो गरीब माणूस, त्याची स्वत:ची मानसिक स्थिती जो पर्यंत परिपक्व झाली नसेल तो पर्यंत त्याला कसे समजेल?
दादाश्री : हे त्याला मान्य होतच नाही. म्हणून ह्यात तर तो उलट जास्त पाप बांधतो. त्याने हे समजलेच पाहिजे की हे माझ्याच कर्माचे फळ आहे.
करतो चांगले आणि फळ खराब
प्रश्नकर्ता : आम्ही चांगले करतो पण त्याचे फळ चांगले मिळत नाही. याचा अर्थ असा निघतो की पूर्वजन्मात काही खराब कर्म केले असेल, ते त्याला कॅन्सल करून टाकते.
दादाश्री : होय, कॅन्सल करून टाकते. आम्ही ज्वारी तर पेरली आणि ती मोठी झाली आणि पूर्वजन्माचे आपले खराब कर्म उदयास आले तर शेवटचा पाऊस पडत नाही, म्हणून ज्वारी सुकून जाते, आणि जेव्हा