________________
कर्माचे विज्ञान
सांगायचे, चूपचाप बस, एका कोपऱ्यात. बुद्धि पोहचू शकेल अशी नाही. ज्ञानानेच समजेल असे आहे.
१६
अंडे पहिले की कोंबडी. मूर्खा, ठेव ना बाजूला. आता हे बाजूला ठेऊन दुसरी पुढची गोष्ट कर ना ! नाही तर पुन्हा पुन्हा अंडे आणि कोंबडी व्हावे लागेल. पण हा त्याला सोडणार नाही. ज्याचे समाधान होत नाही ते सर्व गोल आहे. आपले लोक म्हणतात ना की हा भाऊ गोलगोल गोष्टी फिरवतो !
प्रश्नकर्ता : तरी सुद्धा हा प्रश्न राहतोच की जन्मा अगोदर कर्म कुठून आले? चौऱ्यांशी लाख फेरे सुरू झाले. हे पाप-पुण्य कुठून व केव्हापासून सुरू झाले.
दादाश्री : अनादिपासून.
प्रश्नकर्ता : त्याची काहीतरी सुरूवात तर असेल ना?
दादाश्री : जेव्हापासून बुद्धी सुरू झाली ना तेव्हापासून सुरूवात झाली आणि बुद्धी जेव्हा संपते तेव्हा तेथे पूर्ण होते, समजले ना? बाकी आहे तर अनादिपासून !
प्रश्नकर्ता : ही जी बुद्धी आहे ती कोणी दिली?
दादाश्री : कोण देणारा आहे? वरिष्ठ कोणीच नाही ना ! वरिष्ठ दुसरा कुणीही नाही. कोणी देणारा असेल तर मग तो वरिष्ठ झाला. वरिष्ठ ठरला म्हणजे तो कायम आपल्या माथी राहील. मग जगात मोक्ष उरणारच नाही. जेथे वरिष्ठ असेल तेथे मोक्ष असेल का?
प्रश्नकर्ता: परंतु सर्वात पहिले कोणते कर्म झाले ? ज्याच्यामुळे हे शरीर मिळाले?
दादाश्री : हे शरीर तर कोणीही दिलेले नाही. ही सर्व सहा तत्त्वे एकत्र आल्यामुळे, ते समोरासमोर जोडले गेल्यामुळे 'त्याला' ह्या सर्व अवस्था उत्पन्न झाल्या आहेत. अर्थात शरीर मिळालेले ही नाही. हे तर तसे तुम्हाला दिसते ती चुक आहे. भ्रांतीमुळे तसे दिसते. ही भ्रांती गेली ना, तर