________________
कर्माचे विज्ञान
६९
आहेत, दोनशे-पाचशेच्या संख्येत. जे पूर्वी कधीही इतके सर्व समुहात मरत असल्याचे पाहण्यात आले नव्हते तर एवढे सर्व पाप समुहात होत असेल?
दादाश्री : पूर्वी समुह नव्हतेच ना! आता तर लाल झेंडेवाले निघाले तर किती असतील? पांढरे झेंडेवाले किती असतील? हल्ली समुह आहेत म्हणून समुहांचे काम. पूर्वी समुह नव्हतेच ना!
__प्रश्नकर्ता : हं... अर्थात नैसर्गिक कोप, हा समुहाचाच परिणाम आहे ना! हा दुष्काळ पडणे, एखाद्या ठिकाणी खूप पूर येणे, एखाद्या ठिकाणी भूकंप होऊन लाखो लोक मृत्युमुखी पडणे.
दादाश्री : हे सर्व ह्या लोकांचाच परिणाम.
प्रश्नकर्ता : म्हणजे ज्यावेळी दंड मिळायचा असेल, तेव्हा वाटेल तिथून ओढून इथे येऊनच गेला असेल?
दादाश्री : हा निसर्गच त्याला तिथे घेऊन येतो आणि शिजवून टाकतो, शेकून टाकतो. त्याला विमानात आणून विमानाला पाडतो.
प्रश्नकर्ता : हो दादा, अशी उदाहरणे पाहण्यास मिळतात की जो जाणार असेल, तो काही कारणामुळे जात नाही आणि जो कधीही जात नसेल तो त्याचे टिकीट घेऊन विमानात जाऊन बसतो. नंतर विमान पडून तुटते.
दादाश्री : हिशोब आहे सर्व, पद्धतशीर न्याय. अगदी धर्माच्या काट्याप्रमाणे. कारण की त्याचा कोणी मालक नाही, मालक असेल तर अन्याय होईल.
प्रश्नकर्ता : एअर इंडियाचे विमान तुटले, ते सर्वांचे निमित्त होते, ते व्यवस्थीत होते का ? दादाश्री : हिशोबच, हिशोबाशिवाय काही घडत नाही.
पाप-पुण्याचे होत नाही प्लस-माइनस प्रश्नकर्ता : पापकर्म आणि पुण्यकर्माचे प्लस-माइनस (वजाबेरीज) होऊन नेटमध्ये रिझल्ट येतो का, भोगताना?