________________
४२
कर्माचे विज्ञान
दादाश्री : नाही, ह्याच जन्मात मिळते. विवाहात विघ्न आणता, हे तर प्रत्यक्षासारखेच म्हटले जाईल आणि प्रत्यक्षाचे फळ इथेच मिळते.
प्रश्नकर्ता : आपण एखाद्याच्या विवाहात विघ्न आणले, त्या अगोदरच आपला विवाह झालेला असेल, तर मग कुठून फळ मिळेल?
दादाश्री : नाही, हे असेच अशाच प्रकारचे फळ मिळेल, असे नाही. तुम्ही त्याचे जे मन दुखवले, तसेच तुमचे मन दुखवण्याचा मार्ग मिळेल. हे तर कोणाला मुली नसतील तर त्याला कशा प्रकारे फळ मिळेल? लोकांच्या मुलींच्या विवाहात अडचणी आणेल आणि स्वत:ला मुली नसतील तरी ह्या जन्मातच कर्माचे फळ मिळते. ह्या जन्मातच फळ मिळाल्या शिवाय राहत नाही. असे आहे ना, परोक्ष कर्माचे फळ पुढील जन्मात मिळते आणि प्रत्यक्ष कर्माचे फळ ह्या जन्मातच मिळते.
प्रश्नकर्ता : परोक्ष शब्दाचा अर्थ काय? दादाश्री : ज्याची आपल्याला जाणीव होत नाही असे कर्म.
प्रश्नकर्ता : एखाद्या माणसाचे दहा लाख रूपयांचे नुकसान करण्याचा मी भाव केला असेल तर माझे पुन्हा असेच नुकसान होणार का?
दादाश्री : नाही, नुकसान नाही. ते तर दुसऱ्या रूपात तुम्हाला तेवढेच दुःख होईल. जेवढे दुःख तुम्ही त्याला दिले तेवढेच दुःख तुम्हाला मिळेल. मग मुलगा पैसे खर्च करून तुम्हाला दु:खी करेल किंवा अश्या कोणत्याही प्रकारे तेवढेच दु:ख तुम्हाला होईल. तो सर्व हा हिशोब नाही, बाहेरचा हिशोब नाही. म्हणून येथे हे सर्व भिकारी बोलतात ना, रस्त्यात एक भिकारी बोलत होता, 'हे जे आम्ही भीक मागत आहोत, ते तर आम्ही जे तुम्हाला दिलेले तेच तुम्ही आम्हाला परत करत आहात.' तो तर असे उघडपणे बोलतो, 'तुम्ही जे देतात ते आम्ही दिलेले आहे तेच देतात आणि नाही तर आम्ही तुम्हाला देऊ.' असे बोलतात. दोघांपैकी एक तर होईल! नाही, असे नाही. तुम्ही कोणाच्या हृदयाला गारवा पोहोचवला असेल, तर तुमचे हृदयही गार होईल. तुम्ही जर त्याला दुखवले तर तुम्ही सुद्धा दुखावले जाणार, बस एवढेच. हे सर्व कर्म शेवटी राग-द्वेषात जातात. राग-द्वेषाचे