________________
कर्माचे विज्ञान
प्रश्नकर्ता : होय, पण जे कर्म बांधले असतील, त्याचे फळ पुन्हा भोगावे लागते ना!
७८
दादाश्री : कर्म बांधले मग तर पुढचा जन्म झाल्याशिवाय राहणारच नाही. म्हणजे कर्म बांधले, तर पुढील जन्मात जावे लागते! पण ह्या जन्मातून, महावीरांना पुढील जन्मात जावे लागले नव्हते, तर काहीतरी मार्ग तर असेल ना, कर्म केले तरीही कर्म बांधले जाणार नाही असा ?
प्रश्नकर्ता : असेल.
दादाश्री : तुम्हाला अशी इच्छा होते का की, कर्म बांधले जाऊ नये? कर्म केले तरी कर्म बांधले जात नाही असे विज्ञान असते. असे विज्ञान जाणले तर मुक्त होतो.
बाधक आहे अज्ञानता, नाही कर्म रे...
प्रश्नकर्ता : आपल्या कर्माच्या फळामुळे हा जन्म मिळतो ना?
दादाश्री : होय, संपूर्ण आयुष्य कर्माचे फळ भोगायचे आहे! आणि जर राग-द्वेष केले तर त्याच्या पासून नवीन कर्म बांधले जातात. जर रागद्वेष नाही केले तर काहीही नाही.
कर्माची अडचण नाही, कर्म तर हे शरीर आहे म्हणून होणारच, पण राग-द्वेष करतो त्याची अडचण आहे. वीतरागींनी काय म्हटले आहे की वीतराग व्हा.
ह्या जगात कोणतेही काम करत आहात, त्यात कामाची किंमत नाही, पण त्यामागे राग-द्वेष झाले तरच पुढील जन्माचा हिशोब बांधला जातो. रागद्वेष होत नसतील तर तुम्ही जबाबदार नाहीत.
संपूर्ण देह, जन्मापासून ते मरेपर्यंत अनिवार्य आहे. यातून राग-द्वेष जे होतात, तेवढाच हिशोब बांधला जातो.
म्हणून वीतराग काय म्हणतात की वीतराग होऊन मोक्षात निघून जा. आम्हाला कोणी शिवी दिली तर आम्ही जाणतो की तो अंबालाल