________________
कर्माचे विज्ञान
७९
पटेलला शिव्या देत आहे, पुद्गलला शिव्या देत आहे. आत्म्याला तर जाणू शकत नाही, ओळखू शकत नाही ना, म्हणून 'आम्ही' स्वीकारत नाही. 'आम्हाला' स्पर्शतच नाही, आम्ही वीतराग राहतो. आम्हाला त्याच्यावर रागद्वेष होत नाही. म्हणून मग एक अवतारी किंवा दोन अवतारी होऊन सर्व संपून जाईल.
वीतराग एवढेच सांगू इच्छितात की कर्म बाधक बनत नाही, तुझी अज्ञानता बाधक बनते! अज्ञानता कशाची? 'मी कोण आहे' याची. देह आहे तो पर्यंत कर्म तर होतच राहणार, पण अज्ञान गेले म्हणजे कर्म बांधणे बंद होऊन जाते!
कर्माची निर्जरा केव्हा होते? प्रश्नकर्ता : कर्म बांधणे केव्हा थांबते?
दादाश्री : 'मी शुद्धात्मा आहे' याचा अनुभव असायला हवा. म्हणजे तु शुद्धात्मा झाल्यानंतर कर्मबंधन थांबेल, मग कर्माची निर्जरा होत राहते आणि कर्म बांधणे थांबते!
कर्म बांधले जाणार नाही, त्यासाठी मार्ग कोणता? स्वभाव भावात येणे ते. 'ज्ञानी पुरूष' स्वत:च्या स्वरूपाचे भान करून देतात, त्यानंतर कर्म बांधले जात नाही. मग नवीन कर्म चार्ज होत नाहीत. जुनी कर्म डिस्चार्ज होत राहतात आणि सर्वच कर्म पूर्ण झाल्यावर शेवटी मोक्ष होतो!
ही कर्माची गोष्ट, तुम्हाला समजली का! जर कर्ता झाला तर कर्म बांधले जाते. आता कर्तापण सुटून जाईल, त्यामुळे मग नवीन कर्म बांधत नाही. म्हणजे आज तुम्ही कर्म बांधत आहात, पण जेव्हा मी तुमचे कर्तापण सोडवून देईल, तेव्हा मग तुम्हाला कर्मबंधन होणार नाही, आणि जुनी कर्म आहेत ती भोगून घ्यायची. म्हणजे जुना हिशोब चुकता होऊन जाईल आणि नवीन 'कॉझ' निर्माण होणार नाही. फक्त 'इफेक्ट'च राहील. नंतर इफेक्ट पण पूर्णपणे भोगवून गेला की मग संपूर्ण मोक्ष झाला!
- जय सच्चिदानंद