________________
७४
कर्माचे विज्ञान
प्रश्नकर्ता : एखादी व्यक्ति कुणाचा खून करेल आणि नंतर पुन्हा भगवंताला पश्चाताप करून असे सांगेल, तर कशाप्रकारे कर्म सुटेल?
दादाश्री : होय, सुटेल. खून करून खूश होईल तर खराब कर्म बांधले जातात आणि खून करून असा पश्चाताप केल्याने कर्म हलके होतात!
प्रश्नकर्ता : वाटेल ते करेल तरी कर्म तर बांधलेच गेले ना?
दादाश्री : बांधले जाऊन सुटतही आहे. खून झाला ना, ते कर्म सुटले. त्यावेळी कर्म केव्हा बांधले जाते? तर मनात असे वाटले की, हा खून करायलाच पाहिजे. तर त्यामुळे पुन्हा नवीन कर्म बांधले गेले. हे कर्म पूर्ण सुटले किंवा सुटतेवेळी पश्चाताप केला ना, तर सुटता येईल. मारले, हेच खूप मोठे नुकसान करतो. हे मारले, त्यामुळे अपकिर्ती होईल, शरीरात विविध प्रकारचे रोग उत्पन्न होतील, भोगावे लागतील. इथल्या इथेच भोगायचे. नवीन चिकट कर्म बांधले जाणार नाही. हे कर्मफळ आहे, ते भोगायचे आहे. मारले ते कर्माच्या उदयानेच मारले. आहे आणि मारले म्हणून कर्मफळ भोगावे लागेल. पण हृदयापासून पश्चाताप करेल तर नवीन कर्म ढिले होऊन जातील. मारल्याने नवीन कर्म केव्हा बांधले जाते? की मारायलाच पाहिजे, हे बांधले नवीन कर्म. राजीखुशीने मारले तर चिकट कर्म बांधले जाते आणि पश्चातापपूर्वक केले तर कर्म ढिले होऊन जातात. उल्लासपुर्वक बांधलेले पाप कर्म पश्चातापाने नष्ट होतात.
एका गरीब माणसाला त्याची पत्नी आणि मुले त्रास देत असतील की तुम्ही आम्हाला मांसाहार खाऊ घालत नाही. तेव्हा तो म्हणतो, 'पैसे नाहीत, कुठून खाऊ घालू?' तर ते म्हणतील, 'हरीण मारून आणा.' तर त्याने चूपचाप जाऊन हरीण मारून आणले आणि खाऊ घातले. आता याचा त्याला दोष लागला. आणि तसेच एक राजाचा मुलगा होता, तो शिकार करायला गेला, आणि त्याने हरणाचे शिकार केले पण तो शिकार करून खूश झाला. आता हरीण तर त्या दोघांनीही मारले. ह्याने स्वत:च्या मौज-मजेसाठी मारले आणि त्या गरीब माणसाने खाण्यासाठी मारले. आता जो खात आहे, त्याला त्याचे फळ म्हणून तो मनुष्यातून प्राणी होतो, तो गरीब माणूस! आणि राजकुमार मौजमजेसाठी मारतो, तो खात नाही, समोरच्याला मारून टाकतो.