________________
कर्माचे विज्ञान
गायीचा जन्म मिळाला, तर गायीचा जन्म भोगेल. तो पूर्ण झाला, त्यानंतर बकरीचा जन्म मिळेल, बकरीचाच जन्म मिळेल असे नाही, वाटेल तो जन्म, त्याचा हिशोब असेल त्याप्रमाणे मिळेल. डिझाइन असेल त्याप्रमाणे मिळेल. नंतर मग, गाढवाचा जन्म मिळेल. शंभर-दोनशे वर्ष असे भटकून येईल. म्हणजे सर्व डेबिट भोगले जाते. नंतर पुन्हा इथे मनुष्य जन्मात परत येतो. इत्तर सर्व ठिकाणी एका जन्मानंतर दुसरा जन्म होतो, तो तिथे कर्म केल्यामुळे होत नाही तर अगोदरचे कर्म भोगले गेले त्यामुळे होतो. हे एक आवरण गेले आणि दुसरे आवरण आले, दुसरे आवरण गेले आणि तिसरे आवरण आले. अशा प्रकारे सर्व आवरण भोगले जातात म्हणजे सर्व आठ जन्म पूर्ण होतात तेव्हा पुन्हा मनुष्य जन्मात येतो. जास्तीत जास्त आठ जन्म इतर गतित भटकून पुन्हा मनुष्यात येऊनच जातो. असा कर्माचा नियम आहे!
जिथे जातो, तिथे मनुष्याच्या लायकीचे कर्म त्याच्याजवळ शिल्लक राहतेच, देवगतित जातो तरीही. म्हणजे शिल्लक असल्यामुळे परत येतो. म्हणजे ही शिल्लक ठेऊन दुसरे सर्व कर्म भोगले जातात.
प्रश्नकर्ता : मनुष्यात येतो, त्या नंतर त्याचे जीवन कशाप्रकारे चालते? त्याचे जसे भाव असतील त्यानुसारच चालते? त्याच्या कोणकोणत्या कर्माच्या आधारावर त्याचे जीवन चालते?
दादाश्री : त्याच्याजवळ मनुष्यजन्माचे कर्म तर शिल्लक आहेच. ही शिल्लक तर आपल्याजवळ आहेच, पण देणे (कर्ज) झाले असेल तर ते भोगून झाल्यानंतर पुन्हा येथे या, असे म्हटले आहे. क्रेडिट झाले असेल तेव्हा क्रेडिट भोगून पुन्हा इथे या. ही शिल्लक तर आहेच आपल्याजवळ. ही शिल्लक कमी पडेल अशी नाही आहे. ही शिल्लक केव्हा सुटते? जेव्हा कर्तापद सुटेल तेव्हा सुटेल. तेव्हा मोक्षाला निघून जातो. अन्यथा कर्तापद सुटणारच नाही ना! अहंकार नष्ट झाला तरच सुटेल. अहंकार असतो म्हणून ती कर्म भोगून पुन्हा इथल्या इथेच येतो.
प्रश्नकर्ता : इतर सर्व योनिमधून पुन्हा मनुष्यात येतो, तर जेव्हा येतो तेव्हा कुठे जन्म घेतो? मासेवाल्यांच्या येथे घेतो की राजाच्या येथे घेतो?