________________
कर्माचे विज्ञान
जाईल. दुसऱ्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख दिले नाही तर पुन्हा मनुष्यात येऊ शकेल. मनुष्यात चांगल्या ठिकाणी की, जिथे बंगला तयार असेल, गाड्या तयार असतील, तिथे जन्म होईल आणि पाशवी कर्म करेल, भेसळ करेल, लबाडी करेल, चोऱ्या करेल तर जनावरात जावे लागेल.
प्रश्नकर्ता : तर नियम काय आहे?
दादाश्री : जो अधोगतित जाणारा असेल तो तर पकडला जात नाही आणि जो ऊर्ध्वगतित जातो अशा मनुष्याचे कर्म हलके असतात, तर त्याला लगेचच पोलिसवाल्याकडून पकडवून देतात. त्यामुळे त्याचे पुढे वाम मार्गाला जाण्याचे थांबते आणि त्याचे भाव बदलतात. निसर्ग कोणास मदत करतो? की जो जड आहे, त्याला जड होऊ देतो आणि जो हलका आहे, त्याला हलके होऊ देतो. हलके कर्मवाला ऊर्ध्वगतित जातो, जड कर्मवाला अधोगतित जातो. असे निसर्गाचे नियम आहेत. आता जर एखादी व्यक्ति की ज्याने कधीही चोरी केली नसेल, त्याने जर एखाद्यावेळी चोरी केली, तर तो लगेचच पकडला जातो आणि सराईत चोर पकडला जात नाही. कारण की त्याचे कर्म भारी आहेत म्हणून त्यात पूर्ण मार्क्स पाहिजेत ना ! माइनस मार्क्स सुद्धा पूर्ण हवेत ना ! तरच जग चालेल ना?
मनुष्य जन्मातच बांधली जातात कर्म
प्रश्नकर्ता : म्हणूनच मी विचारतो की मनुष्य जन्माशिवाय दुसरा एखादा असा जन्म आहे की नाही ज्यात कमी कर्म बांधली जात असतील?
६०
दादाश्री : दुसऱ्या ठिकाणी कर्म बांधले जातच नाही. दुसऱ्या कुठल्याही जन्मात कर्म बांधले जात नाही, फक्त इथेच बांधली जातात, आणि जिथे कर्म बांधली जात नाहीत, तेथील लोक काय म्हणतात ? की इथे या जेलमध्ये कशाला आलात? कर्म बांधले जातात अशा जागेस तर मुक्तता म्हटली जाते. आणि ही तर (जिथे कर्म बांधली जात नाही) जेल म्हटले जाईल.
प्रश्नकर्ता : मनुष्यजन्मातच कर्म बांधले जाते. चांगली कर्म पण इथेच बांधली जातात ना?