________________
कर्माचे विज्ञान
५९
प्रश्नकर्ता : तर आता याच्यापेक्षा दुसरा एखादा चांगला जन्म मिळेल
खरा?
दादाश्री : कुठेच नाही. एवढाच चांगला आहे. दुसरे तर दोन प्रकारचे भव. इथे जर कर्ज झाले असेल, म्हणजे खराब कर्म बांधले गेले असतील, त्यास कर्ज म्हटले जाते. तेव्हा मग या प्राण्यांमध्ये जावे लागते, डेबिट भोगण्यासाठी. डेबिट जास्त झाले असेल तर नर्कगतीत जायचे, मग तेथे कर्ज फेडून म्हणजे डेबिट भोगून पुन्हा परत यायचे. इथे चांगले कर्म केले असतील, तर मोठे, उच्च प्रकारचे मनुष्य बनतात, तेथे संपूर्ण आयुष्य सुख असते. ते भोगून पुन्हा होता तसाचा तसाच आणि नाही तर देवगतित जातो, क्रेडिटचे सुख भोगण्यासाठी. पण क्रेडिट पूर्ण संपले, एक लाख रूपये पूर्ण झाले, खर्च झाले की मग पुन्हा परत इथे!
प्रश्नकर्ता : दुसऱ्या सर्व जन्मांपेक्षा मनुष्य जन्माचे आयुष्य जास्त आहे ना?
दादाश्री : नाही, असे काही नाही. या देवलोकांचे लाखो वर्षांचे आयुष्य असते.
प्रश्नकर्ता : पण देव होण्यासाठी तर जेव्हा ही सर्व कर्म पूर्ण होतील तेव्हा नंबर लागेल ना?
दादाश्री : नाही, असे काही नाही. जर कोणी सुपरह्युमन (महामानव) असेल तर देवच होतो. स्वतःचे सुख स्वतः भोगत नाही आणि दुसऱ्याला देवून टाकतो, त्याला सुपरह्युमन म्हणतात. तो देवगतित जातो!
प्रश्नकर्ता : स्वत:लाच सुख नसेल, तर तो दुसऱ्यांना कशा प्रकारे सुख देऊ शकेल?
दादाश्री : म्हणूनच नाही देऊ शकत ना, पण एखादा असा माणूस असेल, करोडोत एखादा माणूस जो स्वत:चे सुख दुसऱ्यांना देत असेल, तो देवगतित जातो. पूर्वी तर असे पुष्कळ लोक होते. शेकडा दोन-दोन, तीनतीन टक्के, पाच-पाच टक्के होते. आता तर कदाचित करोडोत दोन-चार निघतील. आता तर जरी कोणाला दुःख दिले नाही तरी चांगला म्हटला