________________
कर्माचे विज्ञान
५७
पुण्याचा जोर असेल तर तयार होऊन जाते. अन्यथा हातात आलेले पण हिसकावून घेतले जाते. म्हणून चांगले कर्म करा किंवा मग मुक्ति शोधा. दोन्हीपैकी एक मार्ग निवडा! या जगातून सुटण्याचा मार्ग शोधा, किंवा नेहमीसाठी चांगले कर्म करत रहा. पण माणसाला नेहमीसाठी चांगली कर्म करता येत नाहीत, वाम मार्गी चढूनच जातो. कुसंग मिळतच राहतो.
प्रश्नकर्ता : शुभ कर्म आणि अशुभ कर्म ओळखण्याचे थर्मामीटर कोणते?
दादाश्री : शुभ कर्म येते तेव्हा आपल्याला गोडी वाटते, शांती वाटते, वातावरण शांत वाटते आणि अशुभ कर्म येते तेव्हा कटूता उत्पन्न होते, मन बेचैन होते. अयुक्त कर्म तापवते आणि युक्त कर्म हृदयास आनंद देते.
__ मृत्यु नंतर सोबत काय जाते? प्रश्नकर्ता : शुभ आणि अशुभ जे कर्म आहेत, त्याचे जे परिणाम आहेत ते आता दुसऱ्या कोणत्याही योनीत गेले, तेथे त्यांना भोगावे लागते
ना?
दादाश्री : तेथे भोगावेच लागते. येथून मृत्यु होतो तेव्हा मूळ शुद्धात्मा जातो. त्यासोबत संपूर्ण आयुष्यभर जे शुभाशुभ कर्म केले, ते योजनारूपाने, ज्यास कारण शरीर म्हणजे कॉझल बॉडी म्हटले जाते, ते आणि सुक्ष्म बॉडी, म्हणजे इलेक्ट्रिकल बॉडी. हे सर्व सोबत जाणार. दुसरे काहीच जात नाही.
प्रश्नकर्ता : मनुष्य जन्म जो मिळतो, तो पुन्हा पुन्हा मिळत असतो की मग अमुक वेळेसाठी मनुष्यात येऊन पुन्हा दुसऱ्या योनीत त्याला जावे लागते?
दादाश्री : इथूनच सर्व योनीमध्ये जात असतात. आता जवळपास सत्तर टक्के माणसे चार पायात जाणार आहेत. इथून सत्तर टक्के! आणि लोकसंख्या झपाट्याने कमी होईल.
। अर्थात् मनुष्यातून जनावरही होऊ शकतो, देवही होऊ शकतो, नर्कगतीही मिळू शकते आणि पुन्हा मनुष्यही बनू शकतो. जशी कर्म केली