________________
कर्माचे विज्ञान
५५
बांधून टाकतो. आणि मंद बुद्धीवाल्याला तर काही समजच नसते म्हणून त्याला तर असे काही होतच नाही, निर्दोष असतो ना!
दादाश्री : ज्यांना समज आहे, ते समजचे कर्म बांधतात आणि ज्यांना समज नाही ते नासमजीचे कर्म बांधतात. परंतू समज नसलेल्यांचे कर्म खूप जाड असतात आणि समजवाले तर विवेकपूर्ण कर्म बांधतात. म्हणजे समज नसलेल्यांची कर्म जंगली सारखी असतात, जनावरा सारखी, त्याला समजच नसते, भानच नसते, त्यामुळे मग, कोणाला पाहिले की दगड मारण्यास तयार
होतो.
प्रश्नकर्ता : आपण अशा माणसांची दया ठेवायला नको का?
दादाश्री : ठेवायलाच पाहिजे. ज्याला समज नसते, त्याच्या प्रति दया भाव ठेवायला पाहिजे. त्याला काहीतरी मदत केली पाहिजे. मंदबुद्धीमुळे बिचारा तसा करत असतो, त्यात मग त्याचा काय दोष? त्याने जरी दगड मारला, तरी आपण त्याच्याशी वैर ठेवत नाही, त्याच्यावर करूणा ठेवली पाहिजे!
गरीब-श्रीमंत कोणत्या कर्माने? जे घडत असते, त्यासच न्याय मानले तर कल्याण होऊन जाईल.
प्रश्नकर्ता : तर दादा, तुम्हाला असे नाही वाटत की, दोन माणसे असतील, त्यातील एक माणूस बघतो की हा माणूस इतका खराब आहे, तरी पण इतक्या चांगल्या स्थितीत आहे आणि मी इतका धर्मपरायण (धर्मिष्ठ) आहे तरी असा दुःखी आहे. तर त्याचे मन धर्मापासून विमुख होऊन नाही जाणार का?
दादाश्री : असे आहे ना, हा जो दुःखी आहे तसे सर्वच धर्मपरायणवाले दुःखी नसतात. शेकडा पाच टक्के सुखीही असतात.
आज जे दुःख आले आहे, ते आपल्याच कर्माचा परिणाम आहे. आज तो सुखी आहे, आज त्याच्याजवळ पैसे आहेत आणि तो सुख भोगत आहे, हे त्याच्या कर्माचा परिणाम आहे. आणि आता तो जे खराब कर्म करत आहे