________________
कर्माचे विज्ञान
दादाश्री : इथे मनुष्य योनित स्वतः जवळ जे सामान तयार ठेऊन गेला होता ना, ते आणि दुसरे हे जे कर्ज झाले आहे, ते कर्ज फेडून येतो आणि पुन्हा तिथल्या तिथेच येतो आणि त्या सामानापासून पुन्हा सुरु करतो. अर्थात् आपण जसे बाजारात जातो आणि तेथील सर्व कामं संपवून पुन्हा घरी परततो. त्याचप्रमाणे हे घर आहे. पुन्हा इथल्या इथेच यायचे. इथे हे घर आहे. इथे जेव्हा अहंकार समूळ नष्ट होईल, तेव्हा इथे पण नाही रहायचे. मोक्षाला निघून जायचे बस. इतर जन्मात अहंकार वापरला जात नाही. जिथे भोगायचे आहे, तिथे अहंकार वापरला जात नाही. म्हणून कर्मच बांधले जात नाही. ह्या रेड्याला, गाईला, कुणालाच अहंकार नसतो. दिसते खरे की हा घोडा अहंकारी आहे पण तो डिस्चार्ज अहंकार, खरा अहंकार नाही. खरा अहंकार असेल तर कर्म बांधले जाते. म्हणजे अहंकारामुळे पुन्हा इथे येत असतो. अहंकार जर संपला तर मोक्षाला जातो.
रिटर्न टिकिट घेतली आहे, प्राण्यांतून प्रश्नकर्ता : आपण सांगितले की कर्माचे फळ मिळते, तर हे जे प्राणी आहेत ते पुन्हा मनुष्यात येऊ शकतात का?
दादाश्री : तेच येतात. तेच आता आले आहेत, त्यांची संख्या वाढली आहे आणि तेच भेसळ करत आहेत ही सर्व.
प्रश्नकर्ता : त्या प्राण्यांनी कोणते सत्कर्म केले असतील की ते मनुष्य बनले?
दादाश्री : त्यांना सत्कर्म करावे लागत नाही. मी तुम्हाला समजावतो. एक माणूस कर्जदार झाला म्हणून कर्जबाजारी म्हटला जातो. लोक त्याला कर्जबाजारी म्हणतात; नंतर जर त्याने कर्ज फेडले तर त्याला कर्जबाजारी म्हणतील का?
प्रश्नकर्ता : नाही, मग नाही म्हणत.
दादाश्री : त्याचप्रमाणे इथून प्राण्यांमध्ये जातात ना, ते कर्ज फेडण्यासाठीच. कर्ज फेडून परत इथे येतो आणि जर देवगतित जातो तर क्रेडिट (जमा) भोगून पुन्हा इथेच येतो.