________________
कर्माचे विज्ञान
दादाश्री : लोकांचा हिशोब, त्याच्यासोबतचा हिशोब नाही, लोकांनी गुन्हे केले होते त्यामुळे असे निमित्त मिळाले.
६७
लोकांनी गुन्हे केले होते, त्यामुळे असे कोणते तरी निमित्त भेटले आणि त्यांना मारून टाकले. ह्या सर्वांचे कर्म व्यक्तिगत नाही. हे व्यक्तिगत कर्म केव्हा म्हटले जाईल? असे तुम्ही सहज बोलत नसाल आणि तुम्हाला बघून मला आतून उफाळून आले, तर ते झाले व्यक्तिगत, दूर राहून काम झाले त्याला व्यक्तिगत म्हणत नाही.
हे म्हटले जाते सामूहिक कर्मोदय
प्रश्नकर्ता : आता ह्या जगात जे भूकंप होतात आणि ज्वालामुखी फुटतात, हे सर्व कोणती शक्ति करते?
दादाश्री : सर्व 'व्यवस्थित शक्ति. ' व्यवस्थित शक्ति सर्वकाही करते. एविडन्स मिळायला हवेत. सर्व एविडन्स जमले अथवा त्यात जर थोडेसे जरी कच्चे राहिले असेल तर ते ( बाकीचे ) एकत्रीत झाल्यावर लगेच फुटतात जोरात.
प्रश्नकर्ता: हे वादळ, तुफान वगैरे व्यवस्थीत पाठविते का?
दादाश्री : तर दुसरे कोण पाठवणार? हे वादळ तर संपूर्ण मुंबईत असेल, पण बरेच जण विचारतात 'वादळ आले की नाही?' असे विचारतात. ‘अरे मूर्खानो, काय बोलता?' तेव्हा तो म्हणतो, 'आम्ही अजूनपर्यंत पाहिले नाही, वादळ आमच्या येथे आलेच नाही.' हे असे असते सर्व. वादळ मुंबईत सर्वांना स्पर्शत नाही. कोणाला अमुक प्रकारे स्पर्शेल, कोणाचे तर संपूर्ण घरच उडवून टाकते, असे जोरदार एकदम आणि कोणाच्या चटया पडलेल्या असतील, तर त्यांना काही सुद्धा होत नाही. सर्व काही पद्धतीनुसार काम करत आहे. वादळ आले म्हणून काही भिती बाळगण्याची गरज नाही. सर्व 'व्यवस्थित शक्ती' पाठवते.
प्रश्नकर्ता : हे भूकंप होत असतात, सायक्लोन ( वादळ) येते, लढाया होतात, हे सर्व हानि - वृद्धिच्या आधारावर नाही का ?