________________
कर्माचे विज्ञान
५३
पापकर्मच करत राहतात. भान नाही म्हणून. जर भान राहिले असते तर असे केले नसते!
प्रश्नकर्ता : त्यांनी आयुष्यभर भक्ति केली होती, तरी त्यांना कॅन्सर का झाला?
दादाश्री : भक्ति केली, त्याचे फळ तर आता पुढे येईल, पुढील जन्मात मिळेल. हे मागील जन्माचे फळ आता मिळाले. आणि आता तुम्ही चांगले गहू पेरत आहात तर पुढील जन्मात तुम्हाला (चांगले) गहू मिळतील.
प्रश्नकर्ता : कर्म केल्यामुळे रोग होत असतील, तर ते औषधाने कसे बरे होतात?
दादाश्री : होय. त्या रोगात ते पापच केले आहे ना, ते पाप अजाणतेपणी केले होते. म्हणून ह्या औषधाने आराम मिळतो, आणि मदत होते. जाणून-बुजून केले असेल तर त्यावर औषध वगैरे काही मिळत नाही, औषध मिळतच नाही. अज्ञानतेमुळे करणारी माणसं आहेत, बिचारी! अज्ञानतेमुळे केलेली पापं सोडत नाहीत आणि जाणून-बुजून करणाऱ्यालाही सोडत नाहीत. परंतू अजाणतेपणी करणाऱ्याला थोडी तरी मदत मिळते आणि जाणून-बुजून करणाऱ्याला मिळत नाही.
हे आहेत दुसऱ्यांना त्रास देण्याचे परिणाम प्रश्नकर्ता : शरीराचे सुख-दु:ख आपण भोगत असतो ते व्याधि असेल किंवा असे काहीही येत असेल, ते पूर्वीच्या कोणत्या प्रकारच्या कर्माचे परिणाम असतात?
दादाश्री : यात तर असे आहे, कित्येक लोक समज नसल्यामुळे, मांजराला मारून टाकतात. कुत्र्याला मारून टाकतात, खूप दुःख देतात, हैराण करतात. ते तर दुःख देतात, त्यावेळी स्वत:ला भान नसते की याची जबाबदारी काय येईल? लहान वयात मांजरीच्या पिल्लांना मारून टाकतात. कुर्त्यांच्या पिल्लांना मारून टाकतात आणि दुसरे असे की डॉक्टर बेडकांना कापतात, त्याचे पडसाद त्यांच्या शरीरावर पडणार. जे तुम्ही करत आहात, त्याचेच पडसाद पडतील, हे सर्व पडसाद आहेत.