________________
कर्माचे विज्ञान
प्रत्येक जन्म मागील जन्माचे सार प्रश्नकर्ता : आता जी कर्म आहेत, ती अनंत जन्मांची आहेत?
दादाश्री : प्रत्येक जन्म, अनंत जन्मांच्या सार रूपाने असतो. सर्व जन्मांचे एकत्र जमा होत नाही. कारण की नियम असा आहे की परिपक्व काळात फळ पिकलेच पाहिजे, नाहीतर कितीतरी कर्म बाकी राहतील.
प्रश्नकर्ता : हे सर्व मागील जन्मासोबत जोडलेले आहे ना?
दादाश्री : हो, त्याचे असे आहे की एका जन्मात दोन कामं करू शकत नाही, कॉझीझ आणि इफेक्ट दोन्ही एकाच वेळी करू शकत नाही. कारण की, कॉझीझ आणि इफेक्ट या दोघांची मुदत एकत्र होणे हे कसे काय शक्य आहे? मुदत पूर्ण झाल्यानंतर कॉझीझ इफेक्टीव होतात. मुदत पूर्ण झाल्याशिवाय हे शक्य होत नाही. जसे की आंब्याचे झाड असते, तर त्याला मोहर आल्या नंतर एवढीशी कैरी येते. तिला पिकण्यास वेळ लागतो की नाही? आपण दुसऱ्या दिवशी ती कैरी लवकर पिकावी असा नवस जरी केला, तरी ती पिकेल का? म्हणजे आपण जे कर्म बांधत असतो त्याला परिपक्व होण्यासाठी शंभर वर्षे हवीत. तेव्हा ते फळ देण्यासाठी सन्मुख होते.
प्रश्नकर्ता : अर्थात् या जन्माचे जे कर्म आहे ते शेवटच्या जन्माचेच असतात की मागील अनंत जन्मांचे असतात?
दादाश्री : नाही, असे नसते या निसर्गाचे. निसर्ग तर खूप शुद्ध आहे. व्यापाऱ्यांना सुद्धा अशी पद्धत जमणार नाही, अशी सुंदर पद्धत आहे! आजपासून दहाव्या जन्मात जी कर्म झाली असतील त्यांचा हिशोब काढून तो नफा-तोटा पुढे खेचून आणला जातो, नवव्या जन्मात. आता त्यात सर्व कर्म येणार नाहीत तर फक्त ताळेबंधी (हिशोब) काढून कर्म येतात. नवव्यामधून आठव्यात, आठव्यामधून सातव्यात. अशा प्रकारे आत जितक्या वर्षांचे आयुष्य असेल तितक्याच वर्षाचे कर्म असतात. पण ते तश्या रूपाने आत येतात, परंतु ते एका जन्माचेच म्हटले जाईल. दोन जन्मांचे एकत्र असे म्हणू शकत नाही.
कर्म असे असतात की ते परिपक्व होण्यासाठी वेळ लागतो. काही