Book Title: Karmache Vignan
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 38
________________ कर्माचे विज्ञान प्रश्नकर्ता : मागच्या जन्मी आम्ही जी कर्म बांधली त्याचे ह्या जन्मात फळ आले, तर कर्माचा हा सगळा हिशोब कोण ठेवतो? त्याची वहीखाते कोण ठेवतो? दादाश्री : थंडी पडते तेव्हा पाईपच्या आत जे पाणी असते त्याचा बर्फ कोण बनवतो? ते तर थंड वातावरण झाले म्हणून. ओन्ली सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स! हे सर्व कर्म-बिर्म करतात, त्याचे फळ येते तेही एविडन्स आहे. तुला भूक कशामुळे लागते? सर्व सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहे. त्याच्यामुळे हे सर्व चालते! कर्मफळात 'ऑर्डर' चा आधार प्रश्नकर्ता : कोणत्या ऑडर (क्रम) मध्ये कर्माचे फळ येते? ज्या ऑडरमध्ये ते बांधले गेले असेल, त्याच ऑडरप्रमाणे त्याचे फळ येते? म्हणजे पहिले हे कर्म बांधले गेले, त्यानंतर हे कर्म बांधले गेले, नंतर हे कर्म बांधले गेले. पहिल्या नंबर वर हे कर्म बांधले गेले तर त्याचा डिस्चार्ज पण पहिल्या नंबरवरच येणार. नंतर दुसऱ्या नंबर वर हे कर्म बांधले गेले, तर त्याचा डिस्चार्ज, दुसऱ्या नंबरवरच येणार, असे आहे? दादाश्री : नाही, असे नाही. प्रश्नकर्ता : तर मग कसे आहे? हे जरा समजावून सांगा. दादाश्री : नाही, असे नाही. ते सर्व त्याच्या स्वभावाप्रमाणे सेट (मांडणी) होऊन जाते की हे दिवसा भोगण्याचे कर्म, हे रात्री भोगण्याचे कर्म, असे हे सर्व... सेट होऊन जाते. हे दुःखात भोगण्याचे कर्म, हे सुखात भोगण्याचे कर्म, असे सेट होते. अश्या प्रकारे त्याची सर्व मांडणी होते. प्रश्नकर्ता : ही मांडणी कोणत्या आधारावर होते? दादाश्री : स्वभावाच्या आधारावर. हे जे आपण सर्व एकत्र जमतो, ते तर सर्वांचे स्वभाव मिळते-जुळते असल्यामुळेच एकत्र जमतो, नाही तर जमणार नाही.

Loading...

Page Navigation
1 ... 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94